Home » Potato : तुम्ही देखील मोड आलेले बटाटे खात आहात? तर मग सावधान…..

Potato : तुम्ही देखील मोड आलेले बटाटे खात आहात? तर मग सावधान…..

by Jyotsna Kulkarni
0 comment
Potato
Share

आपल्या सगळ्यांच्या घरात सर्रास असणारी, प्रत्येक व्यक्तीची आवडती भाजी म्हणजे ‘बटाटा’. बटाटा न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक गृहिणीची आवडती भाजी म्हणजे बटाटा. बटाट्याचा वापर करून आपण नानाविध प्रकारच्या चविष्ट रेसिपी बनवू शकतो. असा हा बटाटा प्रत्येकाच्याच घरात स्टॉक म्हणून कायम असतो. मात्र आपण जर पाहिले तर कधी कधी बटाटे जुने झाले तर त्यांना कोंब येण्यास सुरुवात होते. आपण जेव्हा बटाटयाची भाजी करतो तेव्हा कोंब आलेले बटाटे असल्यास त्याचे कोंब काढून मग ते चिरून वापरतो. पण खरंच कोंब आलेले बटाटे खाण्यायोग्य असतात? हे बटाटे खाणे आपल्या आरोग्यास चालते? कोंब आलेले बटाटे घरात असतील तर त्याचे काय करावे? जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. (Patato)

सामान्यपणे मोड आलेले कडधान्य आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतात. मात्र मोड आलेले बटाटे वापरणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. तज्ज्ञांच्या मते जर आपण अंकुरलेले बटाटे खाल्ले तर त्यामुळे आपल्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. साधारणपणे, बटाटे जास्त काळ साठवून ठेवल्याने त्यावर अंकुर फुटतात. बटाट्यांवरील अंकुर विषारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कधीकधी यामुळे अन्नातून विषबाधा होते. त्यामुळे मानवी जीवनाला धोका आहे. (Health)

बटाट्यांवर तयार होणाऱ्या अंकुरांमध्ये ग्लायकोआल्कलॉइड्स नावाचे विषारी रासायनिक पदार्थ असतात. यामुळे आपल्याला त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तज्ज्ञांच्या मते, बटाटे जास्त काळ प्रकाश, उष्णता किंवा दमट वातावरणात ठेवले गेले तर त्यांच्यात नैसर्गिकरित्या काही विषारी घटक तयार होऊ लागतात. बटाट्याचा रंग हिरवट होणे किंवा त्याला अंकुर फुटणे म्हणजे त्यामध्ये या विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढल्याचे लक्षण असते. बऱ्याचदा बटाट्याच्या साठवणुकीच्या चुकीच्या पद्धतीमुळे बटाट्यांना मोड येण्याची दाट शक्यता असते. अंधार आणि दमट हवेमुळे बटाट्यांना कोंब येतात. स्वयंपाकघरातील दमट आणि ओले वातावरण त्यासाठी पूरक असल्यामुळे, स्वयंपाक घरात ठेवलेल्या बटाट्यांना लवकर मोड येतात. (Todays Marathi Headline)

Potato

बटाट्यांना मोड आल्यावर त्यात सोलानाइन नावाचे विषारी तत्व तयार होते. सोलानाइन हे एक ग्लायकोअल्कलॉइड आहे, ज्यामुळे बटाट्याचा रंग हिरवा होतो आणि त्याच्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे बटाटे लवकर मोड येतात. अशा बटाट्यांना हाताळताना आणि वापरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोंब फुटलेले किंवा हिरवे झालेले बटाटे फेकून देणेच चांगले. मात्र यामुळे अन्नाचा अपव्यय होईल म्हणून अनेकजण बटाट्याचे कोंब काढून त्याचा वापर केला जाऊ शकतो असा दावा करतात, पण तज्ञांच्या मते असे करणे अजिबात योग्य नाही. (Marathi Trending News)

बटाट्यातले विषारी घटक शरीरात जास्त प्रमाणात पोहोचले, तर अनेक लक्षणं दिसू लागतात. उलट्या, जुलाब आणि पोटदुखीसारख्या लक्षणांचा त्यात समावेश असतो. काही जणांमध्ये ही लक्षणं सौम्य असू शकतात, तर काहींमध्ये ती गंभीर स्वरूपाची असू शकतात. स्थिती अधिक गंभीर झाल्यास कमी रक्तदाब, ताप आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणं दिसतात. प्रमाणात सोलानाइन शरीरात गेल्यास ते गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे, मोड आलेले बटाटे खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. (Top Marathi News)

जर बटाट्याला थोडेसेच मोड आलेले असतील तर त्यातील अंकुर काढून टाकून ते वापरता येतात. अंकुर काढून टाकल्यावर बटाट्याची साल सोलून टाकावी आणि त्यातील हिरवट भाग काढून टाकावा. हे केल्याने बटाट्यातील सोलानाइनचे प्रमाण कमी होईल आणि त्याचे धोके कमी होतील. असे बटाटे शिजवून खाणे सुरक्षित आहे. (Latest Marathi Headline)

========

Glowing Skin Care : महागड्या क्रिम नव्हे तर या 3 पद्धतीने घरच्याघरी चेहऱ्याचे खुलवा सौंदर्य

========

बटाटे कागदात गुंडाळून ठेवा.त्यांना थंड आणि अंधाऱ्या जागेत साठवा.अधूनमधून हाताने हलवून बघा, जेणेकरून ओलावा राहणार नाही.बटाटे नेहमी सुती कपड्याच्या पिशवीत ठेवा. बटाट्यावर पाणी पडल्यास लगेच कोरडे पुसा. कांदा आणि बटाटा वेगळे ठेवा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या अनेक महिला कांदा आणि बटाटा एकत्र ठेवतात. पण असे कधीही करु नका. असे केल्यास दोघेही लवकर सडतात आणि बुरशी येण्याची शक्यता वाढते. दोन्ही भाज्या नेहमी हवेशीर जागेत आणि इतर भाज्यांपासून दूर ठेवा. तसेच बटाटे फ्रिजमध्ये ठेवणं टाळा, कारण त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.