Home » Ekadshi : षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची अशा पद्धतीने करा

Ekadshi : षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची अशा पद्धतीने करा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ekadshi
Share

येत्या १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी या नवीन वर्षातली पहिली ‘षटतिला एकादशी’ असणार आहे. एकादशी ही तिथी भगवान विष्णूला समर्पित असून, या दिवशी विष्णू पूजेला मोठे महत्त्व आहे. वर्षातल्या सर्व एकादशी व्रतांमध्ये षट्तिला एकादशीचे व्रत खास आहे. कारण या व्रतादरम्यान विष्णूची तीळाने पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी तिळाचे ६ उपाय पूजेत वापरले जातात. म्हणूनच या व्रताला षट्तिला एकादशी म्हणतात. (Ekadshi)

२०२६ सालातली पहिली षटतिला एकादशी बुधवार १४ जानेवारी रोजी आहे. या दिवशी मकर संक्रांतीचा सण देखील आहे. पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात मंगळवारी १३ जानेवारी रोजी दुपारी ०३.१७ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी १४ जानेवारी रोजी संपणार आहे. उदय तिथीनुसार षटतिला एकादशीचे व्रत १४ जानेवारी पाळले जाणार आहे. मुख्य म्हणजे यंदा षटतिला एकादशीच्या दिवशी एक खास योग तयार होत आहे. यावर्षी मकर संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी येत आहेत. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी व्रताचा दुर्मिळ योगायोग १४८ वर्षांनंतर घडणार आहे. (Marathi)

षटतिला एकादशीला सहा क्रिया केल्या जातात. तीळ स्नान, तीळ उटणे, तीळ हवन, तीळ तर्पण, तीळ अन्न आणि तीळ दान. या सहा क्रियांमुळेच या एकादशीला षटतिला एकादशी म्हटले जाते. या दिवशी तीळ पूजा, हवन, प्रसाद, स्नान, दान, अन्न आणि तर्पण मध्ये वापरले जातात. या दिवशी तीळ दान करण्याची परंपरा असल्याने याला षटतिला एकादशी म्हणतात. पुराणात असे ही सांगितले आहे की, या दिवशी जितके तीळ तुम्ही दान कराल, तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. (Todays Marathi Headline)

Ekadshi

षटतिला एकादशी पूजाविधी
एकादशीच्या एक दिवस आधी, दशमीच्या संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी साधे भोजन करावे. त्यानंतर काहीही खाऊ नका. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. स्नान करताना श्री विष्णूचे नामस्मरण करा. यानंतर पूजास्थान स्वच्छ करून दिवा लावावा. देवासमोर एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करावा. विष्णू देवाचा गंगाजलाने अभिषेक करा. पूजेत फूल आणि तुळशीची पाने अर्पण करा. यादिवशी व्रत करा. विष्णू पूजेदरम्यान देवाला सात्विक नैवेद्य अर्पण करा. यात तुळशी पत्राचा अवश्य समावेश करा. यानंतर त्यांना चंदन, फुले, अक्षता, कुंकू, धूप, नैवेद्य, तुळशी, पंचामृत इत्यादी अर्पण करा. षटतिला एकादशी व्रताची कथा वाचा. त्यानंतर आरती करावी. तिळापासून बनवलेल्या वस्तू देवाला अर्पण करा. (Top Marathi Headline)

शक्य असल्यास, उपवास करून उपवास ठेवा, जर राहणे शक्य नसेल तर आपण एका वेळी फळे घेऊ शकता. या दिवशी विधीवत पूजनासह व्रतकथा वाचन आणि ऐकण्याचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, कथेशिवाय व्रत अपूर्ण ठरते. त्यामुळे या दिवशी अवर्जून व्रत कथा वाचन करावे. पूजेच्या शेवटी भगवान विष्णूची आरती आणि पारणाच्या वेळी तिळाचे दान करण्याची परंपरा आहे. असे केल्याने विष्णूच्या आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. (Latest Marathi News)

शट्तिला एकादशी व्रताची कथा
पौराणिक कथेनुसार, एका शहरात एक ब्राह्मण स्त्री राहत होती. ती श्री हरी विष्णूची भक्त होती आणि नियमानुसार विष्णूचे सर्व व्रत पाळत असे. एकदा या ब्राह्मण महिलेने विष्णू पूजा करत महिनाभर व्रत केले. महिनाभर कडक उपवास केल्याने ब्राह्मण महिलेचे शरीर अशक्त झाले, परंतु या सोबत तिचे शरीर शुद्ध झाले. महिलेचे हे कठोर व्रत आणि भक्ती पाहून विष्णूला वाटले की, शरीर शुद्ध करून ही महिला वैकुंठाची प्राप्ती तर करू शकेल, पण तिचे मन तृप्त होणार नाही. कारण तिने उपवासात कोणतेही दान केले नव्हते. शास्त्रानुसार, दान केल्याशिवाय उपवासाचे पुण्य प्राप्त होत नाही. यामुळे या महिलेला विष्णुलोकात समाधान मिळणार नाही. त्यामुळे तिच्या पुण्याप्राप्तीसाठी स्वतः विष्णू दान घेण्यासाठी तिच्या घरी गेले. (Top Trending Headline)

श्री हरी विष्णू जेव्हा त्या ब्राह्मण महिलेच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले तेव्हा तिने दानात मातीचा एक गोळा दिला. हा मातीचा गोळा घेऊन श्री हरी विष्णू तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने ब्राह्मण महिलीचे निधन झाले. आणि ती थेट विष्णुलोकात पोहोचली. तिथे पोहचल्यानंतर तिला राहण्यासाठी एक झोपडी मिळाली, ज्यामध्ये आंब्याच्या झाडाशिवाय काहीही नव्हते. यावर ती म्हणाली इतके उपवास करून काय फायदा? वैकुंठात आल्यावरही हेच मिळाले. तेव्हा विष्णू म्हणाले की, तु मानवी जीवनात कधीही अन्न किंवा धन दान केले नाही आणि त्याचेच हे फळ आहे. हे ऐकून ती महिला पश्चाताप करू लागली आणि तिने यावर परमेश्वराकडे उपाय मागितला. (Marathi News)

=======

Ekadshi : जाणून घ्या नवीन वर्षातल्या पहिल्या षटतिला एकादशीची माहिती आणि मुहूर्त

Sankranti : जाणून घ्या यावेळच्या मकर संक्रांतीचे वाहन काय?

=======

तेव्हा विष्णू म्हणाले की, जेव्हा देव कन्या तुला भेटायला येतील तेव्हा, त्यांना षट्तिला एकादशी व्रताती विधी आणि नियम विचारा. जोपर्यंत ते तुम्हाला व्रताची विधी सांगत नाहीत तोपर्यंत झोपडीचा दरवाजा उघडू नका. त्या ब्राह्मण महिलेने विष्णूने सांगितल्याप्रमाणे केले. आणि देव कन्यांकडून व्रताची विधी जाणून घेत विधीवत पद्धतीने व्रत देखील केले. षट्तिला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे तिची झोपडी सर्व आवश्यक वस्तू, पैसा, धान्य इत्यादींनी भरून गेली आणि ती वृद्ध महिला देखील सुंदर झाली. तर विष्णूंनी शट्तिला एकादशी व्रताचा महिमा नारदजींना सांगताना, लोकांनी अज्ञान सोडून षट्तिला एकादशीचे व्रत करावे. या एकादशीचे व्रत करणाऱ्याला प्रत्येक जन्मी आरोग्य प्राप्त होते. या व्रताने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. तसेच षट्तिला एकादशीच्या दिवशी तीळ दान केल्याने सौभाग्य वाढते आणि दारिद्र्य दूर होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.