Home » Britain Prison : ब्रिटनच्या तुरुंगात शरिया कायदा !

Britain Prison : ब्रिटनच्या तुरुंगात शरिया कायदा !

by Team Gajawaja
0 comment
Britain Prison
Share

एकेकाळी जगावर राज्य करणा-या ब्रिटनमधून आलेल्या एका बातमीनं जगाला हादरुन सोडलं आहे. सध्या ब्रिटनमधील सर्वच प्रमुख तुरुंगामध्ये इस्लामी गुंडांच्या टोळ्यांचे राज्य आहे. या तुरुंगामध्ये शरिया कायदा लागू करण्यात येत असून येथील तुरुंग हे कट्टरपंथीयांनी ताब्यात घेतले आहेत. एवढेच नव्हे तर येथील अन्य कैद्याचे ब्रेनवॉशिंग करण्यात येत असून या कट्टरपंथीयांची एवढी दहशत आहे की, तुरुंग अधिकारी असहाय्य झाले आहेत. या तुरुंगात चक्क शरिया न्यायालये सुरू झाली आहेत. ब्रिटनच्या सर्वच तुरुंगामध्ये अशी परिस्थिती आहे. यावर वेळीच कडक कारवाई केली नाही, तर या तुरुंगातील कैद्यांपासून ते त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही गंभीर धोका असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. (Britain Prison)

ब्रिटीश तुरुंगांमध्ये मुस्लिम कैद्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. 2005 मध्ये 5500 असलेली मुस्लिम कैद्यांची संख्या 2024 पर्यंत 16000 एवढी झाली आहे. यातील कैदी हे चोरी, मारामारी, लूट, बलात्कार, अतिरेकी कारवाया अशा गुन्ह्यातील आरोपी आहेत. त्यापैकी अनेकजण वारंवार तुरुंगात येण्यासाठी ओळखले जातात. या कैद्यांसाठी ब्रिटनचे तुरुंग हे दुस-या घरासारखे झाले आहेत. त्यांची एवढी दहशत आहे की, तुरुंगातील सुरक्षा रक्षकही त्यांना घाबरुन असतात. या मुस्लिम कैद्यांच्या टोळ्या ब्रिटनच्या तुरुंगात ‘ब्रदरहुड’च्या नावाखाली टोळ्या चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे. या टोळ्या तुरुंगातून तस्करी, ड्रग्ज पासून अपहरणाचेही काम करतात. तुरुंगांमध्ये इस्लामिक अतिरेकी टोळ्यांचे वाढते वर्चस्व हा येथील तुरुंग प्रशासनासाठी धोक्याचा विषय झाला आहे. कारण या टोळीचे प्रमुख तुरुंग अधिका-यांना धमकवण्यासही मागे पुढे बघत नाहीत. (International News)

एचएमपी फ्रँकलँड तुरुंगात 12 एप्रिल रोजी असाच एक हल्ला तुरुंग अधिका-यांवर करण्यात आला आहे. 2017 च्या मँचेस्टर अरेना बॉम्बस्फोटातील दोषी हाशिम अबेदीने फ्रँकलँड तुरुंगात तीन तुरुंग अधिकाऱ्यांवर गरम तेल टाकून त्यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात हाशिमसह त्याचे अन्य साथीदारही सहभागी होते. ज्यांच्यावर हल्ला झाला, ते तीनही पोलीस अधिकारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा ब्रिटनच्या तुरुंगातील मुस्लिम कैद्यांच्या मनमानीविरुद्ध चिंता व्यक्त कऱण्यात आली आहे. या घटनेची चौकशी कऱण्यासाठी जी समिती नेमण्यात आली होती, त्यांनी दिलेला अहवाल हा भीतीदायक आहे. कारण ब्रिटनमधील प्रमुख तुरुंगामध्ये शरिया कायद्यानुसार वेगळी न्यायालये सुरु करण्यात आली आहेत. यात फ्रॅकलॅंड हा प्रमुख तुरुंगही आहे. यामध्ये अनेक कट्ट्रपंथीय कैदी असल्यानं तुरुंगातील वातावरण बदलले आहे. हे कट्टरपंथीय कैदी तुरुंगातील अन्य कैद्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार करतात. प्रसंगी त्यांचे ब्रेनवॉशिंग करुन त्यांना धर्म बदलण्यासही जबरदस्ती करत आहेत. (Britain Prison)

तुरुंगातील शरिया न्यायालये हा एक आणखी चिंतेचा विषय आहे. कारण यात जै कैदी कट्टरपंथीय कैद्यांना मान देत नाहीत, त्यांना शरिया कायद्यानुसार धार्मिक शिक्षा देण्यात येतात. याबाबत अनेकवेळा तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांनी तक्रार केली आहे. या कैद्यांच्या सांगण्यानुसार तुरुंगामध्ये कट्टरपंथीय इस्लामिक कैदी हे ड्रग्ज आणि पैशाचे व्यवसाय करतात. पण त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास ते तुरुंग अधिका-यांना धमकावून मारहाणही करतात. ब्रिटिश प्रिझन ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस स्टीव्ह गिलन यांनी सांगितली परिस्थिती अधिक भयाण आहे. त्यांच्या मते हे इस्मामिक कैदी आक्रमक असतात. प्रसंगी ते पोलीस अधिका-यांवरही हात उचलतात. त्यांनी तुरुंगामध्ये टोळ्या केल्या असून या टोळ्यांचा मोठा प्रभाव तुरुंगातील अन्य कैद्यावर असतो. यासर्वात पोलीस अधिकारीही असहाय्य झाले आहेत. (International News)

=======

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !

Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

या सर्वात धोकादायक आणि दहशतवादी कारवायांमध्ये पकडलेल्या कैद्यांना वेगळे ठेवण्यात यावे अशी मागणी आता ब्रिटनच्या तुरुंगामधून कऱण्यात येत आहे. तुरुंगातील सुरक्षा अधिका-यांवरील नियमातही शिथिलता आणण्याची मागणी करण्यात येत आहे. आक्रमक झालेल्या कैद्यांना रोखतानाही सुरक्षा रक्षकांना काही नियम पाळावे लागतात. या नियमांचा फायदा हे दहशतवादी घेत असून त्यामुळे सुरक्षा रक्षकांनाच मारहाण होण्याच्या घटना वाढत आहेत. इस्लामिक कैद्यांना ताब्यात ठेवण्यासाठी काय करता येईल, याबाबत आता ब्रिटनमधील प्रशासनात चर्चा चालू आहेत. (Britain Prison)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.