Home » शरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते – विवेक अग्निहोत्री

शरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते – विवेक अग्निहोत्री

by Team Gajawaja
0 comment
शरद पवार
Share

विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. रिलीज झाल्यानंतरच या चित्रपटाविषयी लोकांची क्रेझ बॉक्स ऑफिसवर चांगलीच पाहायला मिळाली. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करणारा हा चित्रपट काहींना आवडला, तर काहींना तो अजिबात आवडला नाही.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे (NCP) प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका कार्यक्रमादरम्यान ‘द काश्मीर फाइल्स’ ही द्वेष पसरवून धार्मिक भावना भडकवत आहे. शरद पवार यांनी चित्रपटाबद्दल काही बोलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.

यापूर्वीही ते म्हणाले होते की, एका व्यक्तीने हिंदूंवरील अत्याचार दाखवणारा चित्रपट बनवला आहे. बहुसंख्य समाज जनतेवर कसा अत्याचार करतो हे यातून दिसून येते. सत्ताधारीच याचा प्रचार करत आहेत, हे दुर्दैव आहे. त्यांच्या या विधानावर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया आपली दिली आहे.

The Kashmir Files' director Vivek Agnihotri gets 'Y' category security

====

हे देखील वाचा: लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

====

भारतीय राजकारणातील आजवरचा सर्वात भ्रष्ट नेता

विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवारांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती आणि आता त्यांनी पुन्हा त्याचं उत्तर दिलं आहे. विवेक म्हणाले की खोटे बोलणे खूप दांभिक आहे. भारतीय राजकारणातील आजवरचा सर्वात भ्रष्ट नेता हा खऱ्या आयुष्यातही सर्वात दांभिक व्यक्ती आहे. एक गोष्ट आहे की मी वैयक्तिकरित्या काश्मिरी पंडितांना काही वेगळे आणि सार्वजनिकरित्या काही वेगळेच म्हणतो. कर्म… पवार साहेब.. कर्म… कुणालाही सोडत नाही. 

Sharad Pawar says power comes and goes, some are anxious after losing Maha  polls | Latest News India - Hindustan Times

====

हे देखील वाचा: शिल्पा शेट्टीचं ओटीटी विश्वात पदार्पण

====

‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्चला थिएटरमध्ये आला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही, पण जसजसे दिवस सरत गेले तसतसे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई सुरूच ठेवली. या चित्रपटाने प्रदर्शित झालेल्या ‘राधे-श्याम’लाही तगडी टक्कर दिली. या चित्रपटानंतर आता विवेक लवकरच ‘द दिल्ली फाइल्स’ घेऊन येत आहे, ज्यामध्ये 84 शीख दंगलीचे सत्य दाखवले जाणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.