Home » घरात शनी देवांची मूर्ती न ठेवण्यामागे हे आहे कारण

घरात शनी देवांची मूर्ती न ठेवण्यामागे हे आहे कारण

हिंदू धर्मात बहुतांश देवी-देवतांच्या मूर्ती घरात पूजेसाठी ठेवल्या जातात. पण शनीदेव असे एकमेव देवता आहेत ज्यांची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवणे वर्जित आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक....

by Team Gajawaja
0 comment
Shani Dev
Share

Shani Dev : धार्मिक कथांनुसारस भगवान शनीदेव यांना न्यायाची देवता मानले जाते. शनिवार हा शनी देवांना समर्पित आहे. यांना प्रसन्न केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. दुसऱ्या बाजूला ज्या व्यक्तींवर शनी देव कोपतात त्यांच्या आयुष्यात नेहमीच संकट येतात. यामुळे शनीदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बहुतांशजण शनिवारी शनी देवांच्या मंदिरात जाऊन पूजा करतात.

हिंदू धर्मात बहुतांश देवी-देवतांची पूजा केली जाते. लोक आपले आराध्य दैवत असलेल्या देवाची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवून पूजा करतात. देवी-देवतांचे फोटो घरात असणे शुभ मानले जाते. पण हिंदू धर्मात ज्या घरात देवाची नियमित पूजा केली जाते तेथेच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. पण शनीदेव मात्र असे एकमेव देव आहेत त्यांची मूर्ती आपण घरात ठेवू शकत नाहीत.

धार्मिक मान्यतांनुसार, घरात शनीदेवांची मूर्ती किंवा फोटो ठेवणे अशुभ मानले जाते. शनीदेवांची मूर्ती घरात न ठेवण्यामागे एक पौराणिक कथा आहे. त्यानुसार शनीदेवांना श्राप दिला होता. त्या श्रापानुसार, शनीदेवांची ज्यांच्यावर दृष्टी पडेल त्याला संकटांचा सामना करावा लागेल.

पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, शनी देव भगवान श्रीकृष्णाचे फार मोठे भक्त होते. त्यांच्या भक्तीत नेहमीच शनीदेव लीन असायचे. एकदा शनीदेवांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी आली. त्यावेळीही शनीदेव श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होते. शनीदेवांच्या पत्नीने तिच्याशी त्यांनी बोलण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काही झाले नाही.

यामुळे शनीदेवांची पत्नी संतप्त झाली आणि शनीदेवांना तिने श्राप दिला. श्राप देताना शनीदेवांच्या पत्नीने म्हटले की, ज्यांच्यावर शनीदेवांची दृष्टी पडेल त्याचे सर्वकाही अमंगल होईल. त्यानंतर शनीदेवांना आपली चूक कळली आणि पत्नीला श्राम मागे घेण्यास सांगितले. पण पत्नीकडे श्राप मागे घेण्याची शक्ती नव्हती. याच कारणास्तव शनीदेव आपली डोक खाली करून चालतात. जेणेकरुन त्यांची दृष्टी एखाद्यावर पडून त्याचे अमंगल होऊ नये. (Shani Dev)

शनीदेवांची दृष्टी व्यक्तीवर पडू नये म्हणून त्यांचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवली जात नाही. म्हणून शनीदेवांची मंदिरात जाऊनच पूजा केली जाते. याशिवाय शनिदेवांची मूर्ती डोळ्यांनी पाहू नये केवळ त्यांचे चरणस्पर्श करावेत.


आणखी वाचा :
उत्तराखंडातील या मंदिरात डोळ्यांवर पट्टी बांधून देवाची केली जाते पूजा
घराच्या तिजोरित पारिजातकाचे फुल ठेवल्याने होतात हे लाभ
येथेच झाले जटायू आणि रावणाचे युद्ध

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.