Home » उत्तराखंडातील या मंदिरात डोळ्यांवर पट्टी बांधून देवाची केली जाते पूजा

उत्तराखंडातील या मंदिरात डोळ्यांवर पट्टी बांधून देवाची केली जाते पूजा

भारतातील काही मंदिरे अशी आहेत ज्यांचे रहस्य कोणालाच माहिती नाही. याशिवाय काही मंदिरे आपल्या अनोख्या मान्यतांसाठी ओखळली जातात. अशातच उत्तराखंडमधील एक मंदिर आहे.

by Team Gajawaja
0 comment
Spiritual
Share

Spiritual : भारतातील काही मंदिरे अशी आहेत ज्यांचे रहस्य कोणालाच माहिती नाही. याशिवाय काही मंदिरे आपल्या अनोख्या मान्यतांसाठी ओखळली जातात. अशातच उत्तराखंडमधील एक मंदिर आहे. या मंदिरात भाविकांना थेट दर्शनाची परवानगी नाही.

उत्तराखंडमधील लाटू मंदिरात भाविकांना थेट देवाचे दर्शन घेता येत नाही. कारण पुजारी गर्भगृहात भाविकांनी प्रवेश करण्याआधी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधतात. जाणून घेऊया या मंदिराबद्दल अधिक…..

उत्तराखंडमधील रहस्यमयी मंदिर
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात देवाल ब्लॉक वाना येथे लाटू मंदिर आहे. लाटू मंदिरामध्ये लाटू देवाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, येथील स्थानिक लोक लाटू देवाला उत्तराखंडची नंदा देवीचा धार्मिक भाऊ मानतात. अत्याधिक श्रद्धेने त्यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, या देवाकडे व्यक्त करण्यात आलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

Spiritual

Spiritual

पूजेवेळी डोळ्यांवर बांधली जाते पट्टी
असे मानले जाते की, लाटू मंदिरात नागराज आपल्या मणि सोबत विराजमान झाले आहेत. मणिच्या तेजामुळे भक्ताला अंधत्व येऊ शकते. यामुळे गर्भगृहात प्रवेश करण्याआधी भक्ताच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. याशिवाय पुजारी देखील आपल्या तोंडावर पूजा करताना पट्टी बांधतात. लाटू देवताच्या गर्भगृहातील मूर्तीचे दर्शन सामान्य भाविकांना थेट घेण्यास परवानगी नाही. केवळ पूजारीच मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जातात. (Spiritual)

या दिवशी खुले केले जाते मंदिर
लाटू मंदिराच्या गर्भगृहात संपूर्ण वर्षभर प्रवेश करता येत नाही. या मंदिराचा गर्भगृह केवळ वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला खोलला जातो. या दरम्यान पूजाऱ्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातो. ज्या दिवशी मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे खुले जातात तेव्हा मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते. लाटू मंदिरात विष्णू सहस्रनाम आणि भगवती चंडिकेचा पाठ वाचला जातो. मार्गशीर्ष अमावस्येला मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.


आणखी वाचा :
रामलल्लाच्या दागिन्यांवर दुर्मिळ हिरे माणिक
अयोध्येव्यतिरिक्त श्रीरामांची येथे आहेत भव्य मंदिरे
उत्तर प्रदेशचे नाव आर्यवर्त कधी होणार ?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.