Home » यांच्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकले नाही !

यांच्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकले नाही !

by Team Gajawaja
0 comment
Shalini Patil
Share

वसंतदादामुंळे मी मुख्यमंत्री होऊ शकले नाही, असा थेट आरोप त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी नुकताच केला. हा आरोप त्यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. इतकच नाही तर शिवसेनेचा जन्मच काँग्रेसच्या आशिर्वादाने झाला आणि त्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या बैठकीला गेले होते असा गौप्यस्फोटही शालिनीताई यांनी केला. आपले आत्मचरित्र संघर्ष या पुस्तकात शालिनीताईंनी अनेक गौप्यस्फोट केलेत. आज आपण एका अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत, जी या राज्याची, महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री झाली असती !

वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील. या दोघांच जेव्हा लग्न झालं तेव्हा राज्यात एकच गदारोळ झाला होता. कारण शालिनीताई या विधवा होत्या आणि त्यांना चार मुलेही होते. याशिवाय वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तर हयात होत्या त्यांना एक मुलगाही होता. पण वसंतदादा पाटील यांच्या पत्नी सतत आजारी असायच्या. आधारासाठी आपण दुसऱ्या लग्नाचा विचार करतोय असं म्हणत वसंतदादांनी शालिनीताईंना लग्नाची मागणी घातली. दोघांनी एका छोटेखानी कार्यक्रमात लग्न केलं. तेव्हापासून शालिनीताई काँग्रेसच्या बड्या नेत्या झाल्या. इतक्या की १९८० साली मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. १९८० साली इंदिरा गांधी जेव्हा पुन्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी शरद पवार यांचं पुलोद सरकार पाडलं. राज्यात नव्याने निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. यावेळी दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपादासाठी शालिनीताई पाटील यांचं नाव चर्चेत होतं. पण शालिनीताई पाटील यांच्या नावाला खुद्द वसंतदादा पाटील यांनीच विरोध केला. (Shalini Patil)

दिल्लीत इंदिरा गांधी यांनी शालिनीताई पाटील यांना बोलावून घेतलं होतं. पण महाराष्ट्रात इतका पाऊस होता की शालिनीताईंना दिल्लीत पोहोचायला २४ तास लागले. या २४ तासांत अनेक घडामोडी घडल्या. वंसतदादांनी हायकंमांडला सांगितलं की शालिनीताईंचं दुसरं लग्न झालंय त्यामुळे मराठा समाज त्यांच नेतृत्व मानणार नाही. शालिनीताईंना राज्यकारभार चालण्याचा अनुभव नाही आणि इतकंच नाही तर शालिनीताई यांच्या मुख्यंपत्रिपदासाठी आपलाच विरोध असेल असं वसंतदादांनी हायकमांडला सांगितलं. त्यामुळे शालिनीताई यांचं नाव मागे पडंल आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचं नाव पुढे आलं. (Shalini Patil)

शालिनीताई दिल्लीत आल्या पण तोपर्यंत उशीर झाला होता. शालिनीताई पाटील यांचं नाव आता मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. पण तेव्हाही वसंतदादा पाटील यांनी विरोध दर्शवला. तेव्हा यशवंतराव मोहिते यांनी वसंतदादा पाटील यांना फोन केला आणि सांगली साताऱ्याच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या मदतीचा प्रश्न आला तर त्यांनी मंत्रालयात कुणाकडे जायंच अशा प्रश्न केला. मोहिते यांनी वंसतदादा यांची समजूत काढली. आणि शालिनीताई पाटील यांना महसूलमंत्रीपद मिळालं. शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या आशिर्वादाने झाला असं अनेक तेव्हाचे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणायचे.

पण शालिनीताई पटील यांनी तर तशी कबुलीच दिलीये. शिवसेनेच्या स्थापनेसाठी शिवाजी पार्क इथे बाळासाहेबांच्या घरी एक बैठक झाली. या बैठकीला वंसतदादा पाटील आणि शालिनीताई उपस्थित होत्या. काही दिवसांनी मार्मिक साप्ताहिकाचा वर्धापनदिन षण्मुखानंद हॉलमध्ये स्थापन झाला. या कार्यक्रमालाही वंसतदादा आणि शालिनीताई पाटील उपस्थित होत्या. मराठा माणसाच्या हक्कासाठी काँग्रेस शिवसेनेच्या पाठीशी आहे असं वसंतदादा पाटील यांनी एकदा भाषणांत म्हटलं होतं. (Shalini Patil)

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यूही वसंतदादा पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असा थेट आरोप शालिनीताईंनी केलाय. यशवंतराव चव्हाण यांची जेव्हा तब्येत बिघडली तेव्हा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल. पण जेव्हा डॉक्टर त्यांना तपासायला आले तेव्हा वसंतदादा पाटील यांनी मुंबईहून डॉक्टर पाठवतो असं म्हटलं. त्यामुळे दिल्लीचे डॉक्टर दुखावले आणि निघून घेले. मुंबईहून डॉक्टर पाठवलाही वंसतदादा यांनी वेळ लावला आणि जेव्हा हे डॉक्टर आले तेव्हा यशवंतरावांची तब्येत बिघडली होती. आणि संध्याकाळी त्यांचं निधन झालं. वंसतदादा अधिक दक्षतेने वागले असते तर मुंबईचे डॉक्टर वेळेवर आले असते आणि् दिल्लीच्या डॉक्टरांचा अपमान केला नसता तर यशवंतराव चव्हाण यांचे आयुष्य अधिक वाढले असतं असा थेट आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. (Shalini Patil)

==================

हे देखील वाचा: अजित पवारांवर एवढी नामुष्की का ओढवली?

==================

वसंतदादा पाटील यांनी आपला दुस्वाःस केला अशी खंत शालिनीताई यांना वाटत होती. वसंतदादांनी आपल्याशी लग्न केलं पण पत्नी आणि पर्सनल सेक्रेटरी याच्या पलीकडे माझे स्वतंत्र राजकीय अस्तित्व त्यांना सहन झालं नाही. मी डबल ग्रॅज्युएट असल्याने त्यांनी मला विवाहाचा प्रस्ताव दिला. माझ्यामुळे घरात गृहिणी आली, घराला घरपण आलं शिवाय प्रपचांचा खर्च नोकरी करून मीच चालवायचा होता. इंग्रजी भाषेची उणीव असल्यामुळे त्यांचा असणारा अपुरेपणा आता दुर होणार होता. मी अडाणी असते तर त्यांनी मला विवाहाचा प्रस्ताव दिला नसता असंही शालिनीताई आपल्या आत्मचरित्रात म्हणाल्या आहेत. जर शालिनीताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या असत्या, तर देशाला इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राला शालिनीताई असं महिला नेतृत्व मिळालं असतं.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.