पौष महिन्यात साजरा होणारा शांकभरी नवरात्री उत्सव २८ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. देशभरातील शाकंभरी माता मंदिरात या निमित्त मोठा सोहळा साजरा होणरा आहे. शाकंभरी माता ही माता दुर्गेची एक रूप आहे. अन्नधान्य, फळे आणि भाज्यांची देवी म्हणून शाकंभरी मातेची पूजा केली जाते. शाकंभरी माता ही दुष्काळ आणि अन्नटंचाईपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी पृथ्वीवर आल्याचे सांगितले जाते. मातेच्या नावाचा अर्थही वैशिष्टपूर्ण आहे. ‘शाक’ म्हणजे, भाज्या आणि ‘भरी’ म्हणजे भरणारी, यावरून “शाकंभरी” असे मातेचे नाव आहे. शाकंभरी माता ही पोषण आणि विपुलतेचे प्रतीक मानली जाते. याच शाकंभरी मातेचा नवरात्रौत्सव साजरा करतांना मातेला भाज्या आणि फुलांचा नैवेद्य दाखवला जातो. (Shakambari Navratri)

एका वर्षात चार नवरात्र साजरे करण्यात येतात. चैत्र आणि शारदीय नवरात्र हे देवी दुर्गेला समर्पित आहेत. तर आषाढ आणि माघ महिन्यांतील गुप्त नवरात्रांमध्ये १० महाविद्यांची पूजा करतात. मात्र नवरात्र पौष महिन्यात देखील साजरी केली जाते, त्याला शाकंभरी नवरात्र म्हणून ओळखले जाते. शाकंभरी नवरात्र ही देवी शाकंभरीला समर्पित आहे. या वर्षी, शाकंभरी नवरात्रोत्सव २८ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होईल. ३ जानेवारी २०२६ रोजी या नवरात्रौत्सवाची सांगता होईल. हा नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा होतो. महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश सह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील काही भागातही हा शाकंभरी नवरात्रौत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो. (Social News)
शाकंभरी नवरात्रौत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पंधरवड्याच्या आठव्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. या नवरात्राचा पहिला दिवस बाणद अष्टमी म्हणून ओळखला जातो आणि शेवटचा दिवस शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, आई शाकंभरी ही देवी भगवतीचे एक रूप मानले जाते. आई शाकंभरीला वनस्पतींची देवी म्हणूनही पुजले जाते. पृथ्वीवर आलेला दुष्काळ आणि अन्नटंचाईपासून मुक्त करण्यासाठी देवी भगवतीने शाकंभरी म्हणून अवतार घेतला असल्याची आख्यायिका सांगितली जाते. शाकंभरी मातेला भाज्या, फळे आणि हिरव्या पानांची देवी म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळेच फळे आणि भाज्यांच्या हिरव्यागार वातावरणात माता बसल्याचे चित्र प्रचलित आहे. माता शाकंभरी देवीची उपासना आणि नवरात्रौत्सव करतांना कलशाची स्थापना केली जाते. तसेच यावेळी मातीच्या भांड्यात बार्लीचे बियाणे पेरण्यात येते. (Shakambari Navratri)

आठ दिवस या मातीच्या भांड्याची आणि त्यातील बियाणांची काळजी घेतली जाते. या काळात, देवीला हंगामी फळे, भाज्या, फुले अर्पण केली जातात. शाकंभरी पौर्णिमा हा उत्सवाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. यावेळी गंगा किंवा अन्य पवित्र नदीमध्ये स्नान करुन दानधर्म करण्यात येतो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, देवीची पूजा केल्यानंतर, हा कलश किती बहरला आहे, हे पाहिले जाते. या आठ दिवसांच्या उत्सवात शाकंभरी देवीची पूजा केल्याने भरपूर अन्न आणि संपत्ती मिळते, अशी धारणा आहे. शेतकरी कुटुंबात शाकंभरी देवीचा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे देवी शेतीला समृद्धीचा आशीर्वाद देते, आणि शेतीमधील पिक चांगले येते, असा विश्वास आहे. भारतात शाकंभरी देवीची तीन मुख्य शक्तीपीठे आहेत. त्यात राजस्थानमधील सांभर प्रमुख आहे. जयपूरजवळील हे मंदिर अंदाजे २,५०० वर्षे जुने असल्याचे मानले जाते. सहारनपूर मंदिर शिवालिक टेकड्यांमध्ये स्थित आहे आणि ते खूप प्राचीन आहे. चौहान राजवंशाची कुलदेवता म्हणून येथे शाकंभरी देवीला पूजले जाते. सर्वात जुने शक्तिपीठ म्हणून येथे देवी शाकंभरीची पूजा होते. (Social News)
========
हे देखील वाचा : Ekadshi : पौष महिन्यात येणाऱ्या सफला एकादशीची माहिती आणि महत्त्व
========
शाकंभरी नवरात्रौत्सवानिमित्त देशभरातील चौहान वंशीय या मंदिरात येऊन देवीला फळ-फुलांची आरास करतात. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथेही माता शाकंभरीचे मंदिर आहे. हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तीपीठ आहे, ज्याची गणना ५१ शक्तीपीठांमध्ये होते. देवी शाकंभरीसह, येथे भीमा देवी, भ्राम्री देवी आणि शताक्षी देवीच्या मूर्ती देखील आहेत. याशिवाय राजस्थानमध्ये उदयपूरवतीमध्ये साकराई माँ म्हणून माता शाकंभरीचे मंदिर आहे. या तीन प्रमुख पीठांव्यतिरिक्त, भारतात शाकंभरी मातेची इतर अनेक मंदिरे आणि स्थाने आहेत. या मंदिरांमध्ये शाकंभरी नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. (Shakambari Navratri)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
