Home » आजही शाहिद कपूरला ‘या’ सुपरहिट चित्रपटांना नकार दिल्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल

आजही शाहिद कपूरला ‘या’ सुपरहिट चित्रपटांना नकार दिल्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल

by Team Gajawaja
0 comment
shahid kapoor
Share

असं म्हणतात की, नशिबापेक्षा अधिक कोणालाच काही मिळत नाही. हा नियम सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच लागू होतो. आता तुम्ही म्हणाल या उक्तीचा आणि या बातमीचा काय संबंध आहे? अहो पूर्ण बातमी तर वाचा, मग येईल हळूहळू लक्षात. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत. प्रत्येक कलाकाराची आपली एक विशेष बाब आहे. आता शाहिद कपूरचेच (shahid kapoor) घ्या, आपल्या क्युट दिसण्यामुळे चॉकलेट बॉय इमेज कमावलेला शाहिद बॉलिवूडमधील उत्कृष्ट डान्सर असण्यासोबतच एक ताकदीचा अभिनेता देखील आहे. शाहिदने त्याच्या विविध भूमिकांमधून त्याच्यात असणाऱ्या प्रभावी अभिनेत्याचे दर्शन सर्वांना वेळोवेळी करून दिले. ॲक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडी आदी सर्वच प्रकारचे चित्रपट त्याने केले आहेत. काल, शुक्रवारी शाहीदचा ‘जर्सी’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास तीन वर्षांनी शाहिद मोठ्या पडद्यावर दिसला. याआधी तो ‘कबीर सिंग’मध्ये दिसला होता. हा चित्रपट तुफान गाजला आणि त्याने शाहिदला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटने अनेक रेकॉर्ड तयार केले. आता ‘जर्सी’ काय धमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी अनेक हिट चित्रपट देणाऱ्या शाहिदने त्याच्या या यशस्वी करिअरमध्ये अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटांना नकार देखील दिला आहे. मुख्य म्हणजे शाहिदने नकार दिलेले सर्वच चित्रपट तुफान गाजले आहेत. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही शाहिदने नकार दिलेल्या चित्रपटांची नावे.

बँग बँग

Bang Bang

ऋतिक रोशन आणि कॅटरिना कैफ यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. चित्रपटात प्रेक्षकांना ऋतिकची जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिसवर तब्बल १८१ कोटींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट आधी शाहिद कपूरला (shahid kapoor) ऑफर झाला होता. मात्र त्याने चित्रपटला नकार दिला आणि तो ऋतिकच्या झोळीत पडला. ऋतिकने देखील या संधीचे सोने केले आणि लोकप्रियता मिळवली.

रांझणा

Raanjhanaa

आनंद एल राय यांच्या ‘रांझणा’ या चित्रपटाने खूपच लोकप्रियता मिळवली. चित्रपटातील अतिशय श्रवणीय गाणी, दमदार कथा, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आदी सर्वच जमेच्या बाजू असणाऱ्या या चित्रपटने बक्कळ कमाई करत लोकांची वाहवा मिळवली. साऊथ स्टार असणाऱ्या धनुषचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. याआधी ही भूमिका शाहिद कपूरला (shahid kapoor) ऑफर करण्यात आली होती मात्र त्याने काही कारणाने याला नकार दिला आणि धनुषने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  

रंग दे बसंती

Rang De Basanti

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला एक नवी आणि वेगळी ओळख मिळवून दिली. आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात ‘सिद्धार्थ’ची भूमिका आधी शाहिद कपूरला (shahid kapoor) ऑफर करण्यात आली होती.  

रॉकस्टार

Rockstar

रणबीर कपूरच्या उत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून ‘रॉकस्टार’ चित्रपट ओळखला जातो. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाने अमाप लोकप्रियता मिळवली आणि तुफान कमाई देखील केली. या चित्रपटाने रणबीरला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. मात्र आधी ही भूमिका शाहिदला (shahid kapoor) ऑफर झाली होती तेव्हा त्याने ‘जब वी मेट’ चित्रपटाला निवडून ‘रॉकस्टार’ला नकार दिला होता.

=======

हे देखील वाचा – ‘त्या’ ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीवरुन बेबोला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

=======

शुद्ध देसी रोमान्स

Shuddh Desi Romance

यश राज प्रॉडक्शनच्या या चित्रपटाने देखील चांगलीच लोकप्रियता मिळवली. सुशांत सिंग, वाणी कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. मात्र यश राजने आधी ही भूमिका शाहिदला ऑफर केली होती, पण त्याने या चित्रपटाला नकार दिला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.