Home » विद्यार्थी चळवळ ते ‘काय झाडी’… डायलॉगने चर्चेत आलेले शाहाजीबापू कोण?

विद्यार्थी चळवळ ते ‘काय झाडी’… डायलॉगने चर्चेत आलेले शाहाजीबापू कोण?

by Team Gajawaja
0 comment
Shahajibapu Patil
Share

सोशल मीडियात सध्या गेल्या काही दिवसांपासून एकच डायलॉग अधिक ट्रेंन्ड होतोय तो म्हणजे, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्कोमधी हाय’. अशातच या डायलॉगचे गाणे सुद्धा आता आले असून त्यावर लोकांनी मिम्ससह गाणे ही काढले आहे. परंतु हा डायलॉग बोलणारे तर शहाजीबापू आहेत. परंतु शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) नक्की कोण आणि ते अचानक असे ट्रेंन्ड होऊ लागले आणि त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीतील प्रवास तुम्हाला माहिती आहे का? तर आज आपण त्यांच्याबद्दलच जाणून घेऊयात सविस्तर.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर गुवाहटी येथे होते. तेथे त्यांच्यासोबत काही आमदार ही आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडील आमदारांचा आकडा अधिक वाढेल असे ही म्हटले होते. मात्र त्याच दरम्यान शहाजीबापू पाटील सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत होते. तर शहाजीबापू पाटील हे सांगोला विधानसभेच्या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु आसाममध्ये असताना आपल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी फोन केला होता. त्यावेळी ते कॉलवर जे बोलत होते त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

हे देखील वाचा- सुरेश प्रभू: एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटेंट ते दमदार राजकिय नेत्याचा प्रवास

Shahajibapu Patil
Shahajibapu Patil

शहाजीबापू (Shahajibapu Patil) त्यांच्या डायलॉगमुळे ट्रेंन्ड होण्यापूर्वी त्यांच्यी राजकरणात एन्ट्री कधी झाली याबद्दल जाणून घेऊयात. खरंतर शहाजीबापू यांच्या राजकरणातील प्रवासाला सुरुवात ही काँग्रेसच्या एनएसयुआय पासून झाली होती. तेव्हा ते शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फार सक्रिय होते. एनएसयुआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ते युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास झाला. तेथूनच त्यांनी राजकरणात आपली एन्ट्री केली. १९९० च्या विधनसभा निवडणूकीत त्यांना युवक काँग्रेसच्या कोट्यामधून सांगोला विधानसभा मतदार संघात उमेदवारी मिळाली होती. परंतु त्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला.

सांगोला विधानसभा मतदार संघ व गणपतराव देशमुख यांच्याबद्दल राज्यातील सर्वांना माहिती आहे, १९६२ पासून गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सलग दोन वर्ष निवडून आले. परंतु १९९५ रोजी शहाजीबापू पाटील यांनी गणपतरावांचा पराभव केला आणि तेथून त्यांची विधानसभेत प्रवेश केला. तर आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसपासून केला असला तरीही नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांनी तेथे एन्ट्री केली. पण विधानसभेचे त्यांचे तिकिट कापल्याने त्यांनी १९९९ ची विधानसभा ही अपक्ष म्हणून लढवली. तेव्हा सुद्धा त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर पुन्हा २००४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २००४ ची विधानसभा निवडणूक लढवली. अखेर २०१४ च्या विधानसभेपूर्वी शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर १९९० पासून आजपर्यंत सात वेळा निवडणूक लढवून सुद्धा शहाजीबापू पाटील यांना फक्त दोन वेळेच विजय मिळाला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.