शाहरुख खानचे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) चित्रपटाचा टीझर आणि मोशन पोस्टर रिलीज करून त्याच्या चाहत्यांना खूश केले आहे. त्याच वेळी, या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे त्याचे चाहते आनंदा होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने रिलीजपूर्वीच कोटींचा व्यवसाय केला आहे. कसे काय तर वाचा..
100 कोटींहून अधिक कमाई केली
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की निर्मात्यांनी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म Netflix ला विकले आहेत. म्हणजेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळाने शाहरुख खानचा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेकर्स आणि OTT प्लॅटफॉर्म Netflix यांच्यात सुमारे 120 कोटी रुपयांची डील झाली आहे.
शाहरुख खानचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो संपूर्ण भारत स्तरावर प्रदर्शित होत आहे, ज्याची निर्मिती अभिनेत्याची पत्नी गौरी खान करत आहे. या चित्रपटाविषयी बोलताना शाहरुख खान म्हणाला, “जवान ही एक सार्वत्रिक कथा आहे जी भाषा, भौगोलिक क्षेत्राच्या पलीकडे आहे. हा चित्रपट सर्वांच्या आनंदासाठी आहे. हा चित्रपट बनवण्याचे श्रेय ऍटलीला जाते, जो माझ्यासाठीही एक चांगला अनुभव होता कारण मला अॅक्शन चित्रपट आवडतात. पुढे काय होणार आहे याची झलक या टीझरमधून पाहायला मिळते.
शाहरुख खानचे धमाकेदार कमबॅक
किंग खानच्या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच डंका वाजवला आहे असेच म्हणावे लागेल. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तो हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. शाहरुख खान आणि नयनतारा पहिल्यांदाच जवान या चित्रपटात एकत्र आले आहेत.
An action-packed 2023!!⁰Bringing #Jawan to you, an explosive entertainer in cinemas 2nd June 2023.⁰In Hindi, Tamil, Telugu, Malayalam and Kannada.
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 3, 2022
@gaurikhan @Atlee_dir @RedChilliesEnt https://t.co/3MWGKNwAwZ
====
हे देखील वाचा: भन्साळीचे ओटीटीवर पदार्पण, ‘हिरामंडी’च्या शूटिंगला सुरुवात
====
जवानच्या रिलीजपूर्वी शाहरुख खान पठाणसोबत सिने स्क्रीनवर कमबॅक करणार आहे. पठाणचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात किंग खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.