Home » शाहरुखानचा ‘डंकी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शाहरुखानचा ‘डंकी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

by Team Gajawaja
0 comment
डंकी
Share

सुपरस्टार शाहरुख खान आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार हिरानी ‘डंकी’ नावाच्या चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत. राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांनी एक व्हिडिओ शेअर करुन चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

3 इडियट्स, मुन्नाभाई फ्रँचायझी, पीके आणि संजू यांसारख्या मोठ्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांनी इंडस्ट्रीत नवीन बेंचमार्क सेट केल्यानंतर आता राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानसोबत त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

हा चित्रपट जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स एकत्रपणे सादर करणार आहेत. हा चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.

राजकुमार हिरानी, ​​अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. चित्रपटाच्या शेड्युल बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर शूट केला जाईल.

====

हे देखील वाचा: रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

====

काय म्हणाले राजकुमार हिरानी

राजकुमार हिरानी म्हणतात, “शाहरुख खान माझ्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच माझ्या इच्छांच्या यादीत असतो आणि मी यापूर्वी अनेकदा एकत्र काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, आम्ही ‘डंकी’ या चित्रपटाच्या भागीदारीमध्ये आहोत. त्यामुळे त्याची ती ऊर्जा, करिष्मा, त्याने चित्रपटात आणलेला विनोद आणि आकर्षण अतुलनीय आहे आणि ती जादू मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”

Shah Rukh Khan New Movie Update | Shah Rukh Khan Ki Latest Film | Shah Rukh  Khan Latest Updates

====

हे देखील वाचा: ग्लॅमरपासूर दूर असणारी कपूर गर्ल…

====

शाहरुखचा ‘डंकी’ सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘पठाण’ सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शाहरुखने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे,”राजकुमार हिरानीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे”


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.