Home » चोल वंशासंबंधित असलेल्या सेंगोलचा इतिहास

चोल वंशासंबंधित असलेल्या सेंगोलचा इतिहास

by Team Gajawaja
0 comment
Sengol History
Share

देशाला नवे संसद भवन मिळाले. त्याचसोबत त्यामध्ये सेंगोलची ही विधीगत पूजा करत स्थापना केली गेली. परंतु सेंगोल म्हणजे नक्की काय आणि याचा काय इतिहास आहे हेच आपण आज पाहणार आहोत. खरंतर सेंगोल चोल वंशासंबंधित असून इतिहासकारांच्या मते चोल वंशात जेव्हा सत्ता हस्तांतरित केली जायची तेव्हा सध्याचा राजा दुसऱ्या राजाला सेंगोल द्यायचा. याचा सत्तेच्या ताकदीचे केंद्र मानले जाते. (Sengol History)

खास गोष्ट अशी की, 14 ऑगस्च 1947 च्या मध्यरात्री जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यता आणि सत्ता हस्तांतरणाच्या रुपात प्रथम पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांना हा सेंगोल सोपवण्यात आला होता. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी त्यावेळची प्रक्रिया पुन्हा पार पाडली गेलीय

सेंगोल म्हणजे नक्की काय?
सेंगोलला राजदंड असे म्हटले जाते. याचा वापर चोल साम्राज्यात केला जायचा. जेव्हा चोल साम्राज्याच्या एखाद्या राजाने आपला उत्तराधिकारी जाहीर केल्यानंतर त्याला तो राजदंड दिला जायचा. ही चोल साम्राज्यापासून चालत आलेली परंपरा आहे. खासकरुन तमिळनाडूत आणि दक्षिणेच्या अन्य राज्यांमध्ये सेंगोलला न्यायप्रिय आणि निष्पक्ष शासनाचे प्रतीक मानले जाते. काही इतिहासकार मौर्य आणि गुप्त वंशात सुद्धा सेंगोलचा वापर करायचे असे सांगतात.

सेंगोल कसे निवडले गेले?
देशाला स्वातंत्र्य मिळणार होते, भारताचे अखेरचे वायसराय लॉर्ड माउंटबेन हे आपल्या अखेरच्या टास्कची तयारी करत होतो. हा टास्क भारताला सत्ता हस्तांतरित करण्याचा होता. कादोपत्री कामकाज पूर्ण झाले होते. परंतु प्रश्न असा होता की, अखेर भारताच्या स्वातंत्र्य आणि सत्ता हस्तांतरितासाठीचा लोगो काय असेल?

लॉर्ड माउंटबेन यांच्या या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते. अशातच जवाहर लाल नेहरु हे माजी राज्यपाल सी राज गोपालचारी यांच्याकडे गेले. तमिळनाडूशी संबंध असलेले सी गोपालचारी यांना भारताच्या ऐतिसाहिक आणि सांस्कृतिचे महत्व कळायचे. त्यांनी खुप विचार करुन नेहरुंना सेंगोलचे नाव सुचवले. (Sengol History)

Sengol History
Sengol History

जौहरी येथून तयार केला होता
जवाहर लाल नेहरु यांना हा विचार पटला. त्यांनी सी राज गोपालचारी यांच्यावरच त्याची जबाबदारी सोपविली. त्यानंतर तमिळनाडू मधील सर्वाधिक जुने मठ थिरुवावदुथुराईच्या 20 व्या गुरुमहा महासन्निधानम श्रीलाश्री अंबलवाणि देसिगर स्वामी यांच्याशी संपर्क साधला. ते आजारी होते. पण त्यांनी याची जबाबदारी स्विकारली. त्यांनी प्रसिद्ध जौहरी वुम्मिडी बंगारु कोसेंगोल बनवण्यास सांगितले. अखेर सोन्याचे सेंगोल तयार करण्यात आला. त्याच्या टोकावर नंदीला विराजमान केले. मठाकडून एका विशेष दलाला विशेष विमानाने नवी दिल्लीत पाठवण्यात आले. जेणेकरुन सेंगोलला माउंटबेन यांच्यापर्यंत पोहचवता येईल.

हेही वाचा- पाकिस्तानात शिवलिंगावर दूध अर्पण करणारी फातिमा भुट्टो कोण?

कसा झाला होता सोहळा
14 ऑगस्टच्या रात्री जवळजवळ 11 वाजून 45 मिनिटांनी सेंगोलला लॉर्ड माउंटबेन यांच्याकडे सोपवले. त्यानंतर माउंटबेन हे तमिळनाडूमधून आलेले श्री लाश्री अंबलवामि देसिगर स्वामींचे डिप्टी श्रीकुमारस्वामी तम्बिरन यांच्याकडे सोपविले. त्यांनी त्याला पवित्र जलने शुद्ध केले. तमिळ परंपरेनुसार थेवरममध्ये भजन ही गायले गेले. त्यावेळी उस्ताद टीएन राजरथिमन यांनी नादस्वरम वाजवले होते. श्री कुमारस्वामी थम्बिरन यांनी मध्यरात्रीच जवाहर लाल नेहरु यांच्या कपाळाला टिळा लावत तो सेंगोल त्यांच्याकडे सोपवल. हाच सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.