ज्या सणाची आपण सर्वच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वच आतुरतेने वाट बघत असतो तो दिवाळीचा सण आलाच. आज सर्वत्र वसुबारसचा सण साजरा होत आहे. आजच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. वसुबारसपासूनच दिवाळीची सुरुवात होते. आज प्रत्येक घरामध्ये आपल्या रितीनुसार गाय आणि वासराची पूजा केली जाईल. मागील कित्येक दिवसांपासून आपण दिवाळीची तयारी करत होतो तीच दिवाळी अखेर सुरु झाली. दिवाळी म्हटले की डोक्यात फराळ, फटाके, पणत्या, रांगोळी अशा सर्वच गोष्टी येतात. मात्र यासोबतच अजून एक गोष्ट जी दिवाळीचे मोठे वैशिष्ट्य मानली जाते ती म्हणजे, अभ्यंगस्नान. (Diwali 2025)
दिवाळीचे पाच दिवस पहाटे उठून केलेले अभ्यंगस्नान म्हणजे निव्वळ अद्भुत अनुभूती आहे. दिवाळीत अभ्यंगस्नानाला मोठे महत्व आहे. सुगंधीत तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला फार महत्त्व आहे. त्याला गंगा स्नान, थैला स्नान असेही म्हणतात.अनेक लोकं सकाळी लवकर उठून अंघोळ करायला कंटाळा करतात. मात्र या दिवशी पाहते उठून अंघोळ करण्याला मोठे महत्व आहे. अनेकांना वाटते की, अभ्यंगस्नान म्हणजे आपल्या धार्मिक आणि जुन्या रूढी परंपरा आहेत. म्हणून त्या पाळण्यास बरेच लोकं नकार देतात. पण असे नाहीये. अभ्यंगस्नानाला धार्मिक महत्व तर नक्कीच आहे, मात्र यासोबतच त्याला वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील मोठे महत्व आहे. अभ्यंगस्नान केल्याने अनेक कोणते फायदे होतात चला जाणून घेऊया. (Abhyangsnan)
अभ्यंगस्नानाचे महत्त्व
अभ्यंगस्नान हे दिवाळीतल्या चार दिवसांपैकी नरक चतुर्दशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाला आणि बलिप्रतिपदेला केलं जातं. हे स्नान शक्यतो ब्राम्ह मुहूर्तावर म्हणजेच सकाळी लवकर उठून साडेचार पासून ते सकाळी ७ च्या दरम्यान केले जाते. या दरम्यानच्या कालावधीमध्ये वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो. आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस अभ्यंगस्नान केल्याने शरीराला जास्त फायदे होतात. (Top Trending News)
अभ्यंग स्नानाला कोणत्या तेलाचा वापर करावा?
अभ्यंग स्नानात त्वचेला खोबऱ्याच्या, तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाचा वापर करावा. हे तेल अंगात मुरले की त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होते. उटण्यातील औषधी वनस्पती त्वचेसाठी उपयुक्त असतात. तेल लावून उटण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या कोरडेपणा तर कमी होतोच पण त्वचेला खाज येणे आणि पुरळ येण्यासारखा त्रास कमी होण्यासही मदत होते. (Marathi News)
अभ्यंगस्नानाचे फायदे
> उबदार तेल त्वचेमध्ये प्रवेश करते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. विशेषत: हिवाळ्यात जेव्हा त्वचा कोरडी आणि रुक्ष होते तेव्हा त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास यामुळे मदत होते. (Marathi Headline)
> कोमट तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते; ज्यामुळे त्वचेच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. चांगले रक्ताभिसरण म्हणजे त्वचेच्या पेशींना पोषक असा ऑक्सिजनचा पुरवठा सुधारणे.
> शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते. आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदातील तज्ज्ञ सांगतात.
> उटणं हे आयुर्वेदिक घटकांपासून बनवले जाते. त्यामुळं त्वचेवर त्याचा काहीच दुष्परिणाम होत नाही. नैसर्गिक घटक असल्यामुळं त्वचेचा पोतही सुधारतो. (Latest Marathi Headline)
> अभ्यंगस्नानाच्यावेळी उटणं लावायच्या आधी तिळाच्या तेलाने मॉलिश करावी. कारण तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते तसंच त्यामुळे त्वचादेखील मऊ राहते. (Top Marathi News)
> दिवाळीचा सण हा हिवाळ्यामध्ये येतो. अशा या थंड हवामानामुळं त्वचा कोरडी पडते अशावेळी उटण्याने अंघोळ केल्यास त्वचा मऊ आणि उजळते. गरज असल्यास तुम्ही उटण्यात गुलाबाच्या पाकळ्या, केशर किंवा संत्र्याच्या सालीची पावडरदेखील टाकू शकता.
> तुमच्या त्वचेच्या पोतनुसार तुम्ही उटण्याचा वापर करु शकता. त्वचा तेलकट असेल तर त्यात कच्चे दूध आणि पाणी टाकू शकता. त्वचा कोरडी असेल तर उटण्यात दूधासोबतच मध वापरा त्यामुळं त्वचा मऊ होईल. (Top Trending HEadline)
> अभ्यंगस्नान हे नकारात्मकतेवरुन सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतिक आहे. अभ्यंगस्नानाने शारीरिक फायदे मिळण्यासह मानसिक विश्रांतीही मिळते. तसेच या स्नानाने तणाव कमी होऊन, मन शांत होते आणि निरोगीपणाची भावना वाढते.
> अभ्यंगस्नान करताना केलेल्या तेलाच्या मालिशमुळे वापरल्या जाणाऱ्या सुगंधी उटण्यामुळे ताण कमी होतो. याचा सकारात्मक परिणाम हृदयावर होतो. हृदयाच्या नसा आणि रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्ताभिसरण सुरळीत होते. (Latest Marathi News)
=======
Dhantrayodashi : धनत्रयोदशीला ‘या’ गोष्टींची खरेदी ठरेल लाभदायक
Dhantrayodashi : धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप दान करण्याचे महत्व
=======
> अंगाचे मालिश आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणतात. अभ्यंगस्नान करताना रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन हायपरटेन्शन आणि रक्तदाबाचा त्रास कमी होतो. (Top Trending News)
> अभ्यंगस्नानात डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत संबंध अंगाची तेल लावून मालिश केली जाते. तेलाच्या मालिश आणि उटण्याच्या रवाळ दाण्यांनी आपले अकडलेले स्नायू आणि सांधे मोकळे होतात.
> शरीरातील जठर अग्निचे कार्य सुधारते. ज्यामुळे पचन चांगले होते. दिवाळीचा फराळ चांगल्या प्रकारे पचावा आणि कोणत्याही प्रकारे आरोग्य समस्या उद्भवू नये म्हणून पोट चांगले असणे गरजेचे असते. अभ्यंग स्नानामुळे ते होते. (Social News)
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics