गेल्या वर्षात सौदी अरब (Saudi Arabia) आणि रशियात आंतराळासंबंधित करार झाला. यामध्ये अन्य मुद्द्यांव्यतिरिक्त रशियाच्या आणि सौदी अरबच्या प्रवाशांना प्रशिक्षण देण्यावर ही सहमती दर्शवण्यात आली. नुकत्याच सौदी अरबने घोषणा केली आहे की, पुढील वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये ते आंतराळात एका महिलेला आंतराळवीर म्हणून पाठवणार आहेत. ही घोषणा काही दृष्टींनी फार महत्वाची मानली जात आहे. याचा संबंध अरब देशातील आंतराळ कार्यक्रमासंदर्भात गंभीर्य आणि महत्वाकांक्षी कार्यक्रम, सौदी अरब मधील महिलांसाठी होणारे बदल अशा पैलूंचा यामध्ये समावेश आहे.
पुढील वर्षात आंतराळात जाणार
सौदी अरबने नुकतीच घोषणा केली की, एक प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा सुरु करणार आहे. त्यामध्ये त्यांचे लक्ष्य हे आपल्याच नागरिकांना पुढील वर्षात आंतराळात पाठवण्याचे असणार आहे. यामध्ये एक महिलेचा सुद्धा समावेश असेल. सौदी अरब नुकताच सक्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञानाला अधिक प्रोत्साहन देऊ लागला आहे.
व्हिजन २०३० प्लॅन
सौदी अरबने एक विस्तृत आणि बहुआयामी व्हिजन २०३० प्लॅन अंतर्गत आपल्या अर्थव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था ही बहुतांश तेलावर निर्भर असल्याने ती कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे यासाठी काही तंत्रज्ञानाच्या नव्या कल्पनांना प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यामध्ये ग्रीन उर्जेवर काही कार्यमक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
महिलांना सुद्धा दिले जातेय प्रोत्साहन
सौदी अरब (Saudi Arabia) मधल क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्या पुढाकाराने ही योजना बनवण्यात आली आहे. त्यांनी स्वत: प्रयत्न सुरु केले आहेत की, जेणेकरुन मुस्लिम देशातील कार्यबळात महिलांना अधिकाधिक समावेश करुन घ्यायचा. यापूर्वी वर्ष २०१८ मध्ये सौदी अरबने महिलांना कार चालवण्याच्या निर्बंधापासून मुक्त केले होते.
हे देखील वाचा- इराण मधील ‘हे’ विचित्र कायदे ऐकून तुम्हालाच येईल राग
महिला करतील साम्राज्याचे प्रतिनिधित्व
सौदी अरब मधील स्पेस एजेंसी सौदी स्पेस कमीशनने एका विधानात असे म्हटले आहे की, सौदी आंतराळ प्रोग्राम, जो देशाच्या साम्राज्याचा महत्वाकांक्षी व्हिजन २०३० चा एक हिस्सा आहे. या आंतराळच्या प्रवासामध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश केला जाणार आहे. असे पहिल्यांदाच सौदी अरबच्या इतिहासात होणार आहे.
दरम्यान, जेव्हा आंतराळ आणि आंतराळवीरांबद्दल बोलले जाते तेव्हा यामध्ये अमेरिका, रशिया, युरोप, भारत आणि चीन सारख्या देशांचे नाव येते. मात्र आता या सूचीमध्ये मध्य पूर्व देश सुद्धा सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षात फेब्रुवारी मध्ये संयुक्त अरब अमीरातच्या एका विशेष आंतरळयान मंगळच्या कक्षेत सुरक्षितपणे पोहचले होते. जे मंगळावरील ध्रुवांवरील अभ्यास करत आहेत.