Home » सौदीतील मशिदींवरील लाउड स्पीकरला बंदी

सौदीतील मशिदींवरील लाउड स्पीकरला बंदी

by Team Gajawaja
0 comment
Saudi Arabia
Share

सौदी अरेबियात रमजानपूर्वीच कठोर नियम लागू करण्यात आल्याने संपूर्ण जगात नवा वाद सुरु झाला आहे. खासकरुन तमाम मुस्लिम बांधव यामुळे नाराज झाले आहेत. कारण सौदीच्या इस्लामिक मंत्रालयाने यंदाच्या वर्षी रमजानचा पवित्र महिना साजरा करण्यासाठी काही कठोर नियमांची घोषणा केली आहे. त्यामध्येच लाउड स्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय आहे. या निर्णयावरुन मुस्लिम बांधव हे इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे म्हणत आहेत. सोशल मीडियात ही या बद्दल विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. (Saudi Arabia)

सौदी सरकारच्या या घोषणेवर संपूर्ण जगभरातील मुस्लिम टीका करत आहेत. त्याचसोबत इस्लामचा प्रभाव कमी केला जात असल्याचे ही त्यांच्याकडून बोलले जात आहे. इस्लामिक धर्माचे जाणकर असे म्हणत आहेत की, वास्तवात हे परिवर्तन सौदीची नवी ओळख निर्माण व्हावी याच्या दिशेने प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र या बदलावाला इस्लाम धर्म प्राथिमिकता देत नाही. मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून इस्लाम धर्माच्या मार्गावर आयुष्य जगणाऱ्यांची जीवन शैली बदलण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

कशा-कशावर घातलीय बंदी?
-मस्जिदींसाठीच्या दानावर बंदी
-मस्जिद मध्ये सुर्यास्तानंतर इफ्तारावर बंदी
-दीर्घकालीन इबादतांवर नजर ठेवली जाणार
-मुलांना मस्जिदीत नमाज पठणास बंदी
-इबादत करत असलेल्या व्यक्तीला ओळखपत्र दाखवावे लागणार
-मक्का आणि मदीना मध्ये मुख्य मुस्लिमांव्यतिरिक्त नमाजाचे प्रसारण केले जाऊ शकत नाही
-जर मस्जिदीत कॅमेऱ्याचा वापर केल्यास तर त्यांना नमाज दरम्यान इमाम किंवा इबादत करणाऱ्या लोकांचे फोटो काढण्याची परवानगी नसणार
-उपवास करणाऱ्या लोकांच्या विरोधात पैसे जमा करु नये
-नव्या नियमांनुसार इफ्तारसाठी कोणतीही अस्थाई खोली अथवा टेंट लावू नये
-मशीदींच्या आतमध्ये इफ्तार होणार नाही

नवे नियम आणि प्रतिबंधाची कारणे
सौदी सरकाराच्या नव्या निर्णयांच्या घोषणेनंतर टीका करणाऱ्यांनी असा दावा केला आहे की, इस्लाम प्रवाभ कमी करण्याचा ही खतरनाक चाल आहे.त्यांचे असे म्हणणे आहे की, वास्तवात हा निर्णय परदेशी लोकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने आहे. पण हे इस्लामच्या हितासाठी नाही. कारण देशात हळू-हळू संगीत कार्यक्रमांना अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी प्रसिद्ध पश्चिमात्य कलाकारांना आमंत्रित केले जातेय. (Saudi Arabia)

हे देखील वाचा- इंडोनेशियाची राजधानी बदलली जाणार

सोशल मीडियात संतापाची लाट
ऐन रमजानपूर्वी सौदीतील अशा नियमांमुळे तमाम मुस्लिम बांधवांनी संताप व्यक्त केला आहे. बहुतांश लोकांचे असे मानणे आहे की, हा इबादत आणि उत्सवाचा काळ आहे. अशावेळी लोक एकत्रित येतात. यामुळे सामाजिकता वाढते, राष्ट्रीयता मजबूत होते. पण असे प्रतिबंध लोकांचा आनंद साजरा करण्यापासून अडवत आहेत. दरम्यान, बहुतांश लोकांनी यासाठी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल प्रत्येकजण आपले मतं सोशल मीडियात व्यक्त करत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.