सौदी अरेबियामध्ये उंट हा एक महत्त्वाचा प्राणी आहे. सौदीमध्ये या उंटाला वाळवंटातील जहाज म्हणून ओळखण्यात येते. तेथील जीवनाचा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिक म्हणूनही उंटाना या भागात जपण्यात येते. प्राचीन काळात या उंटांचा वापर चलन किंवा हुंडा म्हणूनही केला जात असे. आता ही प्रथा कमी झाली असली तरी, सौदीमध्ये कुणाच्या घरी किती उंट आहेत, यावरुन त्यांची श्रीमंती मोजली जाते. या उंटांची निगा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. सोबतच आपल्या कडील उंट किती चांगले आहेत, यासाठी उंटांचे प्रदर्शन आणि त्यांचा मेळाही सौदीच्या विविध भागात भरवण्यात येतो. या सर्वात सौदी किंग अब्दुल अजीज उंट मेळा हा सर्व सौदीमध्ये प्रसिदध आहे. ( Saudi Arabia Camel Race )

Saudi Arabia
३० दिवसांच्या किंग अब्दुल अजीज उंट मेळ्याचा नुकताच रियाधमध्ये समारोप झाला. यामध्ये इब्राहिम अल-मुहैदीब यांचा उंट शर्यतीमध्ये प्रथम आला. ही उंटाची शर्यत संपूर्ण सौदी अरेबियाची शान मानली जाते. कारण या शर्यतीमधील विजेत्यांना अतिशय अमुल्य अशी पारितोषिके देण्यात येतात. यावेळेच्या शर्यतीमधील विजेते इब्राहिम यांना चक्क खाजगी बेट मिळाले आहे. त्यांच्यासोबत अन्य विजेत्यांनाही महागडे मोबाईल आणि अन्य पारितोषिके मिळाली आहेत. ३० दिवसांच्या या सनम स्पर्धेत डिजिटल गेमद्वारे उंट संस्कृती आधुनिक तंत्रज्ञानासह एकत्रित करण्यात आली. सौदीमधील परंपरागत खेळ आणि बदलत्या सौदीमधील तरुणांच्या तंत्रज्ञानाचा हा मेळा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाला होता. ( Saudi Arabia Camel Race )
सौदी अरेबियातील रियाध येथे १० वा किंग अब्दुलअझीझ कॅमल मेळा नुकताच संपन्न झाला. हा मेळा गाजला तो त्यात वाटण्यात आलेल्या बक्षिसांमुळे. या मेळ्यामध्ये सौदी अरेबियाच्या सांस्कृतिला जोपासण्यात आले. शिवाय अलिकडच्या काळात सौदीमध्ये होत असलेल्या तांत्रिक प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. यावेळी झालेल्या उंट मेळा हा पर्यटकांसाठी सर्वात आकर्षणाचा बिंदू ठरला.
सौदीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्राणी हा उंट आहे. तेथील जनजीवन या उंटावर अवलंबून आहे. सौदीमध्ये उंटाचे पालनपोषण पारंपारिक पद्धतीनं करण्यात येत असे. आता त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. उंटाच्या दुधापासून जी उत्पादने तयार होतात, त्याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या सर्वांची माहिती या मेळ्यामध्ये देण्यात आली. वाळवंटातील जहाच असलेला उंट हा सौदीच्या कुटुंबाचा आर्थिक आधार म्हणून कसा उपयोगी होत आहे, याची माहिती यातून देण्यात आली. सौदी अरेबियातील रियाध येथे १० वा किंग अब्दुलअझीझ कॅमल मेळा नुकताच संपन्न झाला. हा मेळा गाजला तो त्यात वाटण्यात आलेल्या बक्षिसांमुळे. या मेळ्यामध्ये सौदी अरेबियाच्या सांस्कृतिला जोपासण्यात आले. शिवाय अलिकडच्या काळात सौदीमध्ये होत असलेल्या तांत्रिक प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. यावेळी झालेल्या उंट मेळा हा पर्यटकांसाठी सर्वात आकर्षणाचा बिंदू ठरला. ( Saudi Arabia Camel Race )
=======
हे देखील वाचा : Saudi Arabia : वाळवंटी देशाला वाळू आयात करण्याची वेळ
=======
सौदीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्राणी हा उंट आहे. तेथील जनजीवन या उंटावर अवलंबून आहे. सौदीमध्ये उंटाचे पालनपोषण पारंपारिक पद्धतीनं करण्यात येत असे. आता त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. उंटाच्या दुधापासून जी उत्पादने तयार होतात, त्याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या सर्वांची माहिती या मेळ्यामध्ये देण्यात आली. वाळवंटातील जहाच असलेला उंट हा सौदीच्या कुटुंबाचा आर्थिक आधार म्हणून कसा उपयोगी होत आहे, याची माहिती यातून देण्यात आली. ( Saudi Arabia Camel Race )
सई बने….
