Home » सर्वपित्री अमावस्येला काय दान करावे?

सर्वपित्री अमावस्येला काय दान करावे?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sarva Pitru Amavasya
Share

आज अर्थात २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. आपल्या धर्मात सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणून सर्वपित्री अमावस्या ओळखली जाते. आजच्या दिवशी आपल्या ज्या पितरांची पूर्वजांची मृत्यु तारीख माहित नाही त्यांचे श्राद्ध केले जाते. या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि दान केल्याने पितृदोष देखील दूर होऊ शकतो. सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वैगरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद मिळतो.

आपल्या शास्त्रानुसार ईशान्य दिशा पवित्र असल्याची मान्यता आहे. ही दिशा देवतांचे निवासस्थान मानले जाते. पितृपक्षात किंवा सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी पितरांची पूजा, स्मरण करावे. घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या दिशेला एक दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. घरात पैसा येतो आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते.

सर्वपित्री अमावस्या म्हणजे आपल्या पूर्वजांचे, पितरांचे स्मरण करणे आणि त्यांना श्रद्धांजली वाहणे. या दिवशी पूजा आणि दान केले तर त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते. या दिवशी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती होण्यास मदत होईल. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुळशी माळेचा 21 वेळा जप करावा.

Sarva Pitru Amavasya

सर्वपित्री अमावस्येला काय दान करावे

अन्नदान करणे 

पितृ अमावस्येला अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात आनंद मिळतो आणि सुख-शांती टिकून राहते असे मानले जाते. सर्व पितृ अमावस्येला अन्नदान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि दु:खापासून मुक्ती मिळते.

तीळ दान करणे 

सर्व पितृ अमावस्येला तीळ दान करणे खूप शुभ मानले जाते. अमावस्या तिथीला तीळ दान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असे मानले जाते.

फळे

अमावस्या तिथीला फळांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते.

गूळ

पितृ अमावस्येला गुळाचे दान करावे. असे केल्याने पितर संतुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात असे मानले जाते.

========

हे देखील वाचा : लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष

========

ब्राह्मणांना काय दान करावे 
सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध आणि तर्पण केल्यानंतर ब्राह्मणांनी भांडी, फळे, धान्य, कच्च्या भाज्या, धोतर-कुर्ता, पैसे, धोती-कुर्ता, पैसा, मिठाई इत्यादी वस्तू ब्राह्मणांना दान म्हणून द्याव्यात. जर ब्राह्मण विवाहित असेल तर त्याच्या पत्नीला साडी, शक्य असल्यास साधा दागिना इत्यादी द्या. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढते.

सर्व पितृ अमावस्येला ‘या’ गोष्टी करू नये

श्राद्धाचे भोजन रात्री कधीही घेऊ नये. या दिवशी घरात तामसिक भोजन करू नये. ब्राह्मण आणि कुटुंबातील सदस्यांनी ब्राह्मण भोजनाच्या वेळी मौन बाळगावे. केळीची पाने आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये श्राद्धाचे भोजन जेवायला देऊ नये. पान, चांदी, तांबे, कांस्य यापासून बनवलेल्या भांड्यांमध्ये जेवायला दिले जाऊ शकते. लक्षात ठेवा, कर्ज घेऊन श्राद्ध करू नये.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.