Home » स्वातंत्र्याच्या लढाईत महिलांच्या प्रतिनिधी राहिलेल्या ‘सरोजिनी नायडू’

स्वातंत्र्याच्या लढाईत महिलांच्या प्रतिनिधी राहिलेल्या ‘सरोजिनी नायडू’

by Team Gajawaja
0 comment
Sarojini Naidu
Share

हैदराबाद बंगाली परिवारात अघोरनाथ चट्टोपाध्यायन यांच्या घरी १३ फेब्रुवारी १८७९ मध्ये एका मुलीचा जन्म झाला होता. ८ भावंडांमधील सर्वाधिक लहान मुलगी बालपणापासूनच शिकण्यात-लिहिण्यात हुशार आणि कविता लिहिण्याची शौकिन होती. जी वयाच्या १२ व्या वर्षातच मेट्रिकुलेशनची परिक्षा पास केल्यानंतर १६ व्या वर्षात लंडन मधील कॅब्रिजमध्ये गेली. पण हे सर्व त्यांच्या आयुष्यातील अगदी लहान उपलब्धी ठरतील हे कोणास ठाऊक होते. ती दुसरी कोणी नसून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या प्रमुख महिला नेत्यांपैकी एक सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) होत्या. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

महिलांसाठी खास प्रयत्न
उच्च शिक्षणादरम्यान ही कविता लिहिण्याची आवड कायम होती. त्यांचे कविता संग्रहात त्यांना प्रसिद्ध मिळवून देत होते. वयाच्या १९ व्या वर्षात त्यांचा विवाह गोविंदराजूलू नायडू यांच्यासोबत झाला. इंग्लंडमध्ये महिलांचे शोषण पाहिल्यानंतर त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. जेथे कुठे गेल्या तेथील महिलांचे अधिकार आणि शिक्षणासाठी सशक्त आवाज उठवला.

एक कुशल नेता आणि वक्ता
सरोजिनी नायडू या एक कुशल वक्ता असण्याच्या रुपात फार प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या बोलण्यात न्याय देण्यासाठी तर्क अधिक असायचे. १९०५ मध्ये त्या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्या. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्यासाठी पुढे आल्या त्याचसोबत प्रत्येक ठिकाणी जाऊन सामान्य महिलांना स्वातंत्र्य चळवळीत येण्यासाठी प्रेरित केले.

काँग्रेस आणि जनसेवा
१९०६ मध्ये कलकत्ता मध्ये त्यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडियन सोशल कॉफ्रेंन्सला संबोधन हे सर्वांना फार आवडले होते. १९११ मध्ये पुराचा फटका बसलेल्या पीडितांसाठी केलेल्या कामांसाठी त्यांना कैसर-ए-हिंद पदक दिले गेले. त्यानंतर जलियनवाला बाग हत्याकांडाच्या विरोधात १९१९ मध्ये ते परत दिले.

Sarojini Naidu
Sarojini Naidu

महात्मा गांधींसोबत अनोखे नाते
सरोजनी नायडू या महात्मा गांधींना पहिल्यांदा १९१४ मध्ये इंग्लमध्ये भेटल्या. या भेटीदरम्यान, दोघे ही एकमेकांपासून खुप प्रभावित झाले होते. सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांच्यामध्ये देशाच्या सेवेप्रति उत्साह आणि उर्जा दिसून येत होती. दोघे एकमेकांना कधीकधी विचित्र नावाने ही हाक मारायचे. बापूने त्यांना नाइटएंगल ऑफ इंडिया असे म्हटले तर सरोजिनी नायडू त्यांना मिकी माऊस असे म्हणायच्या.

महात्मा गांधीच नव्हे तर त्यांनी गोपाल कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, सरला देवी चौधरानी सारख्या काही बड्या व्यक्तींची साथ होती. १९१६ मध्ये त्यांनी लखनौ कराराचे समर्थन केले होते, जे ब्रिटिश राजकीय सुधारासाठी हिंदू मुस्लिम मागण्यांचा संयुक्त मुद्दा होता. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषणाचे वेगळाच प्रभाव पडायचा. ज्यामध्ये त्या आपले बोलणे कवितांच्या माध्यमातून ही सांगायच्या.

हे देखील वाचा- समाजात महिलांच्या अस्तित्वाला हक्क मिळवून देणाऱ्या ‘सावित्री बाई फुले’

त्यानंतर १९१७ मध्ये वुमन्स इंडिया एसोसिएशनच्या संस्थापक झाल्या. त्याच वर्षात त्यांनी आपला मित्र एनी बेसेंट यांच्यासोबत लंडनमध्ये सार्वभौमिक मताधिकाराच्या समर्थनार्थ आपल्या भाषणाने जगाला प्रभावित केले. १९१९ मध्ये लंडनला जाऊन होमरुल लीगच्या हिस्स्याच्या रपात देशाच्या अधिकारांची मागणी केली. त्यानंतर त्या गांधीजी सोबत असहयोग आंदोलनाच्या हिस्सा झाल्या. सरोजनिनी नायडू यांना त्यांच्या कौशल्यामुळे १९२५ रोजी कानपुर काँग्रेस अधिवेशन मध्ये अध्यक्ष निवडले गेले. त्यांनी गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात भाग घेतला आणि चळवळींमध्ये महिला मोर्चांचे नेतृत्व ही केले. मीठाचा सत्याग्रहात ही महिलांच्या भागीदारीसाठी गांधीजींना त्यांनी मनवले. स्वातंत्र्य चळवळीत महिलांसाठी एक प्रभावी आवाज त्या बनल्या होत्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.