भारताच्या इतिहासात नद्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आपल्या देशात अनेक नद्या असल्या तरी त्यात गंगा, यमुना, गोदावरी, सिंधू, गोमती, नर्मदा, कावेरी या नद्यांची नावे सर्वांनाच माहिती आहेत. या नद्यांचे दर्शनही घेण्यात येते. मात्र भारतातील सर्वात रहस्यमय नदी म्हणून सरस्वती नदीकडे पहाण्यात येते. हिमालयात उगम पावणारी ही नदी कुठे गुप्त झाली आहे. आजपर्यंत अनेकांनी सरस्वती नदीला(sarasvati river) शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यंतरी हरियाणा सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्डानं सरस्वती नदीचा प्रवाह शोधण्याचा प्रयत्न केला.
सरस्वती नदीचे (sarasvati river) अस्तित्व राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात असल्याचे स्पष्ट झाले. कच्छच्या रणात सरस्वती नदीचे अनेक पुरावे या पथकाला सापडले. आता याच सरस्वती नदीचा प्रवाह राजस्थानच्या पवित्र अशा कपिलमुनी सरोवरात असल्याचा पुरावा संशोधकांना मिळाला आहे. राजस्थानचे हरिद्वार म्हणून या कपिलमुनी सरोवरचा उल्लेख करण्यात येतो. हजारो वर्षांपासून हा तलाव कधीही कोरडा झाला नाही. राजस्थानच्या रणरणत्या उन्हातही हा तलाव काठोकाठ भरलेला असतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, यात सरस्वती नदी गुप्तपणे येते असे काहींचे म्हणणे आहे. आता नव्या संशोधनानुसार त्याला पुष्टी मिळाली आहे.
कपिलमुनी सरोवर म्हणजेच कोलायत सरोवर हे राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील हजारो वर्षापासूनचे सरोवर आहे. धार्मिकदृष्ट्या हे सरोवर खूप महत्त्वाचे आहे. राजस्थानच्या वाळवंटातील ओएसिस म्हणूनही या सरोवराचा उल्लेख करण्यात येतो. कपिल मुनींचा आश्रम याच सरावोराकाठी होता, त्यांच्याच नावावरुन या सरोवराचे नाव कपिलमुनी सरोवर झाले. काही काळानंतर त्याला कोलायत सरोवर असे नाव पडले. आजही येथे कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.
विस्तृत असलेल्या या तलावाला जवळपास ५२ घाट बांधण्यात आले आहेत. यावरुनच हे सरोवर किती मोठे आहे याची कल्पना येते. यात प्राचीन कपिलमुनी सरोवरमध्ये सरस्वती नदीचा गुप्त प्रवाह सापडला आहे. सरस्वती नदीचे पाणी सरोवराच्या तळाशी असलेल्या गोल खड्ड्यांमध्ये जमा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कपिलमुनी सरोवरचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. कुरुक्षेत्र विकास मंडळाच्या अंतर्गत येणा-या या तलावातील पाण्याचे काही वर्षापासून परिक्षण चालू आहे. या तलावाचे पाणी हजारो वर्षात कधीही आटल्याची घटना झाली नाही. महाभारत आणि रामायण काळापासून असलेल्या या सरोवराचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आहे.(sarasvati river)
हे तलाव कधीही कोरडे झालेले नाही, कारण या तलावत गुप्तपणे सरस्वती नदी(sarasvati river) प्रवाहीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. यासंदर्भात कुरुक्षेत्र विकास मंडळानंही तपास केल्यावर सरस्वती नदीचा प्रवाह येथे प्रवाहीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या नावाने या तीर्थक्षेत्रावर घाट बांधण्यात येणार आहे. कुरुक्षेत्र विकास मंडळाच्या सहकार्याने तलावात विहीरही खोदण्यात येणार आहे. सध्या यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी सरस्वती नदी समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासले असून यासाठी या सरोवराच्या भागात 20 फूट लांबीची शिडी बसवण्यात आली आहे. या सर्वांसाठी ओएनजीसी आणि इस्रोचेही सहकार्य घेण्यात येत आहे.
कपिलमुनी सरोवराचा इतिहास महाभारत आणि रामायण काळाशी जोडलेला आहे. महाभागवत पुराणातही कपिलमुनी तीर्थाचा उल्लेख आहे. कपिल मुनींचे वडील कर्दम ऋषी होते, तर त्यांच्या आईचे नाव देवहुती होते. याच सरोवराच्या काठावर कपिल मुनींच्या आईला सांख्य दर्शनाचे ज्ञान झाले. कपिलमुनींनी पुढे याच सरोवराच्या काठावर तपश्चर्या केली. या भागाला त्याकाळी कपिलयात असे म्हणले जायचे. त्याचा अपभ्रंश नंतर कलयत असा झाला. कपिल मुनींनी याच सरोवराच्या काठी ज्ञान प्राप्त केल्यामुळे या तलावाला कपिलमुनी सरोवर अशीही ओळख मिळाली.
==========
हे देखील पहा : गंगा नदीतील डॉल्फिनची बहिण मिळाली…
==========
राजा शालिवानची कथाही या सरोवरासोबत सांगितली जाते. सहाव्या शतकातील शालिवान राजाला एक शाप मिळाला होता. त्यानुसार राजाचे शरीर रात्री दगडाचे होत असे. मात्र एकदा शिकार करतांना राजा कपिलमुनी तलावाजवळ आला. त्याचा एक बाण सरोवरात पडला. हा बाण राजानं एका हातानं काढला. त्या रात्री राजाचे सर्व शरीर दगडाचे झाले फक्त त्यानं कपिलमुनी सरोवराच्या पाण्यात घातलेला हात दगडाचा झाला नाही. ते पाहून राजाला त्याच्या गुरुंनी या तलावात स्नान करण्याचा आदेश दिला. त्यानंतर राजा शापमुक्त झाला. शालिवान राजानं मग याच सरोवराकाठी चार घाट बांधले. आजही त्यातले दोन काठ बघता येतात.
या कपिलमुनी सरोवराची ख्याती आजही कमी झालेली नाही. येथे पवित्र दिवशी स्नान करण्यासाठी हजारो भक्तांची पहाटेपासून गर्दी होते. महाकुंभ मेळ्यातही या सरोवरात स्नान करण्यासाठी अनेक साधुसंत येतात. आता त्याच कपिलमुनी सरोवरात भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अशा सरस्वती नदीचा(sarasvati river) २००६ पासून शोध घेण्यात येत आहे.
सई बने