मराठी मनोरंजनविश्वात काम करणारे अनेक कलाकार हिंदी, साऊथ किंवा इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. मराठी कलाकरांना देखील याचा मोठा फायदा होतो. आता तर आपले मराठी कलाकार विविध भाषांमध्ये काम करताना अगदी सर्रास पाहिले जातात. मराठी कलाकारांमधील प्रतिभा आणि त्यांची शिस्त यांमुळे मराठी कलाकारांना इतर भाषांमध्ये काम मिळते असे अनेकदा सांगितले जाते.
हिंदीमध्ये आजवर अनेक मराठी कलाकारांनी काम केले आहे. यातलेच एक मोठे नाव म्हणजे संतोष जुवेकर. मराठी सिनेविश्वात चित्रपट, मालिका, नाटक ही माध्यमं गाजवत असताना संतोषने हिंदीमध्ये देखील कमाल केली. येत्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित अशा ‘छावा’ सिनेमात देखील तो महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. यासोबतच संतोषच्या पदरात एक मोठा प्रोजेक्ट पडला आहे. प्रतिभावान दिग्दर्शक असणाऱ्या अनुराग कश्यपच्या एका प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे.
नुकतीच संतोषने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनुरागचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. सोबतच अनुरागसोबतच एक फोटो देखील शेअर केला आहे. संतोषने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले,
View this post on Instagram
“हा एक माथेफिरू दिग्दर्शक आहे. वेड्यासारखं काम करत राहायचं या माणसाच व्यसन आहे आणि या वेड्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचं वेड, स्वप्न माझं फार आधीपासून होतं. इतकं मनापासून पाहिलेलं स्वप्नं अखेर पूर्ण झालंच. मुझे AK (अनुराग कश्यप) बाबा का बुलावा आ ही गया. आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या शैलीत काम करण्याचा अनुभवही मी कमावलाय. अनुराग सरांबरोबर काम करण्याआधी त्यांची कामाची स्टाइल व कामाच्या पद्धती बद्दल ऐकून होतो. पण गेले काही दिवस त्यांच्याबरोबर काम करताना ह्याची देही ह्याची डोळा अनुभव घेतोय. माझ्यासाठी या सिनेमात काम करणं म्हणजे एक कार्यशाळा आहे.”
आभार मानत अभिनेत्याने लिहिलं की, अनुराग सर तुम्ही मला संधी दिल्याबद्दल खूप प्रेम. तुमच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न पूर्ण करून पुन्हा तुमच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे. खूप आदर आणि प्रेम सरजी (एके पापा) सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.”
======
हे देखील वाचा : पिठोरी अमावस्या व्रत, पूजा विधी आणि कथा
======
दरम्यान संतोषबद्दल बोलायचे झाले तर त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो मराठी इंडस्ट्रीमधला अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत झेंडा, मोरया, रेगे, शाळा, फक्त लढा म्हणा, एक तारा, गुण, डेटभेट, रावरंभा, मुंबई मेरी जान, भोसले, डार्लिंग आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच तो विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराजच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ सिनेमात दिसणार आहे.