कोणत्याही प्रकारच्या जेवणासाठी मीठ वापरले जाते. मीठ आपल्या जेवणाची चव वाढवते आणि ते सोडियमचा सर्वात प्रमुख स्रोत आहे. सोडियमच्या कारणास्तव कोशिका व्यवस्थितीत काम करतात. शरिरात असलेल्या फ्लूड्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन कायम ठेवण्याचे काम करते.वैज्ञानिक भाषेत मीठाला सोडियम क्लोराइड असे म्हटले जाते. (Salt Types and Benefits)
डब्लूएचओ हेल्दी राहण्यासाठई लोकांना दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला देतात. जे जवळजवळ एका चमचा समान असते. मात्र भारतात शासकीय आकडेवारीनुसार पाहिले असता लोक ११ ग्रॅम मीठ खातात. जे डब्लूएचओच्या सल्ल्यापेक्षा फार अधिक आहे. बाजारात विविध प्रकारचे मीठ मिळते. त्यामुळेच लोकांना कळत नाही अखेर कोणते मीठ आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असते.
किती प्रकारचे असते मीठ?
-टेबल सॉल्ट मीठ
हे मीठ सर्वांच्या किचनमध्ये आढळते. ते अगदी बारीक असते आणि त्यात कोणत्याही प्रकारचे अशुद्ध कण नसतात. असे मीठ तयार करण्यासाठी दीर्घकालीन प्रोसेस करावी लागते. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी असे मीठ फायदेशीर असल्याचे मानले जाते. मात्र या मीठाचे अधिक सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
-ब्लॅक सॉल्ट
सर्वसाधारण भाषेत याला काळं मीठ असे म्हटले जाते. हे तयार करण्यासाठी काही प्रकारचे मसाले आणि अन्य गोष्टींचा वापर केला जातो.काळं मीठ गरम ओवन मध्ये संपूर्ण दिवस ठेवले जाते. त्यामुळेच त्याचा रंग लाल आणि काळा दिसतो. हे काही समस्या जसे की, पोट फुगणे, कब्ज, अॅसिडिटी अशा समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो.
-पिंक सॉल्ट
सर्वसामान्यपणे या मीठाचा वापर उपवासावेळी केला जाते. याला इंग्रजीत पिंक सॉल्ट असे म्हटले जाते. कारण याचा रंग फिकट गुलाबी असतो. आपल्या शरीरासाठी गरजेचे असलेले जवळजवळ ४८ प्रकारचे मिनिरल्स आणि अन्य पोषक तत्त्वे या मीठात असता. याच्या सेवनाने शरीरातील काही समस्या दूर होतात. शरीरातील साखरेचा स्तर, रक्त कोशिकाांचा पी एच स्तर योग्य करणे आणि स्नायूं दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. (Salt Types and Benefits)
-सी सॉल्ट
हे मीठ समुद्राच्या पाण्याच्या वाफेपासून तयार केले जाते. ज्याला बाष्पीकरण असे म्हटले जाते. सोडियमच्या कमतरतेमुळे आणि आयोडिन अधिक असल्याने याची मागणी वाढत चालली आहे.
हेही वाचा- देशातील 70 टक्के लोकांना ‘या’ कारणास्तव सतावते पचनासंबंधित समस्या
कोणतं मीठ आरोग्यासाठी फायदेशीर असते?
बाजारात विविध प्रकारचे मीठ उपलब्ध असते. यामुळे जेवणाचा स्वाद वाढला जातो. कोणतं मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर ते म्हणजे सी सॉल्ट आणि पिंक सॉल्ट. कारण सी सॉल्टमधअये ९७-९९ टक्के सोडियम असते. त्याचसोबत आयोडिनचे प्रमाण अधिक असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच पिंक सॉल्ट मध्ये सोडिअम कमी असते. त्यात मॅग्नेशिअम आमि पोटॅशिअम सारखी खनिजे असतात. याच कारणास्तव ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. लोकांना असा सल्ला दिला जातो की, टेबल सॉल्ट ऐवजी पिंक सॉल्टचा वापर करावा.