Home » संगीतकार सलील कुलकर्णी यांचे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पदार्पण

संगीतकार सलील कुलकर्णी यांचे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पदार्पण

by Jyotsna Kulkarni
0 comment
Saleel Kulkarni New Hotel
Share

एकसाथ दोन नोकऱ्या करणारे, दोन व्यवसाय करणारे लोकं आपण बघतच असतो. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कामासोबतच इतरही वेगळ्या क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात सक्रिय असते. याला कलाकार देखील अपवाद नाही. आपण अनेकदा ऐकत असतो की, कलाविश्वात सक्रिय असणारे कलाकार विविध इतर क्षेत्रात देखील सक्रिय असतात. फॅब्रिक क्षेत्रात, मेकअप प्रोडक्ट, इलेक्ट्रॉनिक्स, शूज, परफ्युम, विविध फॅशन ऍक्सेसरीज आदी अनेक क्षेत्रांमध्ये हे कलाकार कार्यरत असतात.

बहुतकरून कलाकार हे हॉटेल क्षेत्रात काम करताना दिसतात. अनेक लहान-मोठे कलाकार स्वतःची हॉटेल चेन चालवताना दिसतात. मोठमोठ्या हॉटेल्ससोबतच कॅफे, रेस्टोरंट आदींचा देखील यात समावेश असतो. आता मनोरंजनविश्वातसोबतच इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकारांच्या यादी मराठी कलाकारांचा देखील समावेश झाला आहे. मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या सई ताम्हणकरने देखील नुकताच स्वतःचा ‘मॅडम एस’ नावाने ब्रँड सुरु केला आहे.

आता यात अजून एका कलाकाराच्या नावाची भर पडली आहे. गायक, संगीतकार, दिग्दर्शक अशी ओळख असणाऱ्या सलील कुलकर्णी यांनी देखील एका नवीन व्यवसायात पदार्पण केले आहे. सलील कुलकर्णी यांनी नुकतेच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली असून, याबद्दल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

सलील कुलकर्णी यांनी भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यात त्यांनी सांगितले की, “आज मला दोन चांगल्या बातम्या द्यायच्या आहेत. भारताने टी ट्वेंटीचा विश्वचषक जिंकल्यामुळे आपण सर्वजण छान आनंदी मूडमध्ये आहोत. सगळ्यांचे चेहरे हसरे आहेत. याचेच निमित्त साधत तुम्हाला मी आज दोन चांगल्या बातम्या देण्याचे ठरवले आहे. लहानपणापासून मला ज्या ज्या गोष्टींचे वेड होते, त्यात चित्रपट तर चित्रपट केला. मग टीव्ही तर त्यात रिअ‍ॅलिटी शो केला. असंख्य गाणी केली. पण यासोबतच मला अजून एक वेड होते आणि ते म्हणजे खाणं.”

पुढे सलील कुलकर्णी यांनी सांगितले, “मला नेहमीच असे वाटत होते की, खाण्यासंबंधित काहीतरी करायला पाहिजे. याचा विचार करत मी इथे (बँगलोर कँटीन) एक दिवस आलो. इथली चव चाखली. यांचा डोसा खाल्ला. कॉफी प्यायलो आणि असे जाणवले की, आपला यात सहभाग हवाच. त्यामुळे मी बँगलोर कँटीनशी जोडला जात आहे. आता माझा बँगलोर कँटीनमध्ये सहभाग असणार असून, लवकरच मी याच्या नवीन ब्रँचसह सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये येत आहे.”

अजून एक चांगली बातमी देताना त्यांनी सांगितले की, “दुसरी चांगली बातमी म्हणजे ‘एकदा काय झालं’च्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर बरेच लोकं मला विचार होते पुढचा चित्रपट कधी? मी एक चित्रपट लिहित होतो, पण ही बातमी नक्की कधी सांगावी हे समजत नव्हते. पण विश्वचषक जिंकल्याच्या निमित्ताने मी ही बातमी सांगत आहे की, नवीन चित्रपटाची गोष्ट लिहून तयार आहे. लवकरच आम्ही त्याचे नाव आणि इतर सगळ्या गोष्टी जाहीर करू. बँगलोर कँटिनविषयी देखील पुढच्या भागात बोलू.”

Saleel Kulkarni New Hotel

======

हे देखील वाचा : एकसारख्या नावामुळे गायक अरमान मलिकला मनस्ताप

=======

सलील कुलकर्णी यांनी ३० जूनला या दोन आनंदाच्या बातम्या जाहीर केल्या. त्यानंतर ६ जुलैला त्यांनी त्यांच्या ‘बँगलोर कँटिन’ची फ्रँचायझी सिंहगड रोडच्या खाऊगल्लीमध्ये सुरू केली आहे. सलील कुलकर्णीं यांनी त्यांच्या आईच्या हस्ते त्यांच्या हॉटेलचे उद्घाटन केले. याचा एक फोटो त्यांनी इन्स्टाग्रामला शेअर केला आणि लिहिले, “लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कँटिनचं उद्घाटन केलं. नक्की भेट द्या सिंहगड रोड खाऊगल्ली येथील बँगलोर कँटिनला.”

तत्पूर्वी सलील कुलकर्णी हे मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांनी अनेक उत्तम गाण्यांना संगीत दिले असून त्यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा संदीप खरे यांच्यासोबतच कार्यक्रम देखील तुफान गाजला. पुढे त्यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. मागील वर्षी त्यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.