एकेकाळी देशातील सर्वश्रेष्ठ व्यावसायिक घराण्यातील एक असलेल्या सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर कोकिला बेन रुग्णालयात उपचार सुरु होते. सहारा प्रमुखचे सुब्रत रॉय यांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा केली जायची. पण एक काळ असा आला होता जेव्हा त्यांना तुरुंगात जावे लागले होते. (Sahara Scam)
मीडिया रिपोर्ट्सनुसार सर्व खेळ एका लेटरचा होता. ज्याने सहारा ग्रुपला एका उंचीवर खाली जमिनीवर आणले. या लेटरमध्ये सहारामध्ये सुरु असलेल्या घोटाळ्याचा खुलासा करण्यात आला होता. २०१० मध्ये ४ जानेवारीला रोशन लाल नावाने नॅशनल हाउसिंग बँकेला एक लेटर मिळाले होते. या लेटरमध्ये लाल यांनी असे लिहिले होते की, ते इंदौर मधील स्थानिक रहिवाशी असून ते पेशाने सीए आहेत. त्यामध्ये त्यांनी सहारा इंडिया रियल इस्टेट कॉर्पोपेशन आणि सहारा हाउसिंग इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनकडून जारी करण्यात आलेल्या बॉन्ड्सचा तपास करावा अशी विनंती केली होती. रोशनलाल यांचा असा आरोप होता की, सहारा ग्रुपच्या कंपन्यांचे बॉन्ड नियमांच्या विरोधात जारी करण्यात आले आहेत. बँकेने ही चिठ्ठी कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबीला सुद्धा फॉरवर्ड केली.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सेबीला अहमदाबाद मधील एक एडवोकेसी ग्रुप प्रोफेशनल ग्रुप फॉर इनवेस्ट प्रोटेक्शन कडून एक नोट मिळाली होती. तर सेबीने २४ नोब्हेंबर २०१० रोजी सहारा ग्रुपवर जनतेचे पैसे घेण्यास बंदी घातली होती. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले गेले होते. येथे सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने सहारा ग्रुपला गुंतवणूकदारांचे २४,०२९ कोटी रुपये १५ टक्के व्याजाने परत देण्याचा आदेश दिला होता.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात असे म्हटले होते की, सहारा ग्रुपच्या कंपन्यांनी सेबीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. कोर्टाने असे म्हटले की, अशा लोकांकडून सुद्धा पैसे जमा करण्यात आले जे बँकिंगचा फायदा घेऊ शकत नाहीत. तर सहारा ग्रुपच्या कंपन्या गुंतवणूकदारांना पेमेंट करण्यास असमर्थ ठरल्या. याच कारण त्यांना ४ मार्च २०१४ रोजी तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. कोर्टाने त्यांना गुंतवणूकादारांचे २४ हजार कोटी रुपये व्याजासह परत देण्याचा आदेश दिला होता. याच कारणास्तव सुब्रत रॉय यांच्या खासगी आयुष्यासह त्यांचा व्यवसाय अत्यंत वाईटरित्या प्रभावित झाला होता. (Sahara Scam)
तर ६ मे २०१६ रोजी त्यांच्या आईच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी सुब्रत रॉय यांना पॅरोल दिली गेली होती. त्यानंतरच सुब्रत रॉय यांचा पॅरोल वाढत गेला. या केसवर सरकारच्या संसदेत एक प्रश्नाच्या उत्तरेत असे म्हटले होते की, सहारा इंडिया रियल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेडने १९,४००.८७ कोटी रुपये आणि सहार हाउसिंग इनवेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने ६३८०.५० कोटी रुपये जमा केले होते. या पैशांबद्दल सहाराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांना पैसे परत करायचे होते. पण ते पैसे सेबीकडे अडकले गेले होते. (Sahara Scam)
रिपोर्ट्सनुसार सहाराने काही टप्प्यात सेबीला जमा झालेल्या पैशांचा मोठा हिस्सा दिला. पण पूर्ण रक्कम देण्यास असमर्थ ठरले. याच दरम्यान सहारा ग्रुपच्या कंपन्या आणि त्यांच्या डायरेक्टर्सच्या विरोधात काही राज्यात खटले दाखल होत गेले. मात्र सहारा ग्रुपला अशावेळी दिलासा मिळाला जेव्हा केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठई एक पोर्टल सुरु केले.
हेही वाचा- केवळ राजकरणच नव्हे तर क्रिकेट आणि कॉर्पोरेटमध्ये ही शरद पवारांची होते चर्चा