Home » Ryo Tatsuki : एका कॉमिक्समधील भविष्यवाणीनं जपानमध्ये हडकंप !

Ryo Tatsuki : एका कॉमिक्समधील भविष्यवाणीनं जपानमध्ये हडकंप !

by Team Gajawaja
0 comment
Ryo Tatsuki
Share

जपानमध्ये 2011 मध्ये 9.0 एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. हा जपानच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप होता. यामुळे आलेल्या त्सुनामीमुळे 18000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय लाखो जपानी नागरिक बेपत्ता झाले. या भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हा भूकंप 1900 नंतर जगातील तिसरा सर्वात मोठा भूकंप म्हणून नोंदवला गेला. 14 वर्षापूर्वी झालेल्या या भूकंपाच्या आठवणी आता जपानमध्ये काढल्या जात आहेत. त्याला कारण म्हणजे, जपानी मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांची महाभयंकर भूकंपाची भविष्यवाणी. (Ryo Tatsuki)

या भविष्यवाणीनुसार जपानच्या किना-यावर 2011 मध्ये झालेल्या भूकंपापेक्षा तिप्पट तिव्रतेचा भूकंप होणार आहे. या भूकंपामुळे जपानचे भौगोलिक क्षेत्रही बदलणार असून या देशाची किती हानी होईल, याची गिनती करता येणार नाही. र्यो तात्सुकी  यांच्या या भविष्यवाणीमुळे जपानी नागरिक हादरुन गेले आहेत. कारण र्यो तात्सुकी यांना जपानचे बाबा वेंगा म्हणून ओळखले जाते. त्यांनी 2011 च्या भूकंपाचीही भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितलेल्या जागीच या भूकंपाचा केंद्रबिंदूही होता. त्यामुळे र्यो तात्सुकी यांची भविष्यवाणी जाहीर झाल्यावर जपानमधील सर्वच उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. मुख्यतः जपानचा पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. जगभरातील नागरिकांनी जपानमध्ये पर्यटनासाठी हॉटेल बुकींग केले होते. मात्र आता हे बुकींग रद्द करण्यात येत आहेत. शिवाय समुद्रकिना-यावर असलेल्या हॉटेल आणि अन्य जागाही खाली करण्यात येत आहेत. (International News)

जपानमध्ये सध्या र्यो तात्सुकी यांच्या भविष्यवाणीची दहशत आहे. र्यो तात्सुकी हे स्थानिक मंगा कलाकार आहेत. म्हणजेच कॉमिक्स आणि कार्टून तयार करणारे कलाकार आहेत. र्यो तात्सुकी यांनी 1999 मध्ये एक कॉमिक्स प्रकाशित केले, त्याला त्यांनी नाव दिले होते, मी पाहिलेले भविष्य. या कॉमिक्समध्ये त्यांनी मार्च 2011 मध्ये जपानमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचे भविष्य सांगितले होते. शिवाय या आपत्तीमध्ये मोठी वित्त आणि जनहानीही होणार असल्याचे भविष्य र्यो तात्सुकी यांनी सांगितले होते. (Ryo Tatsuki)

र्यो तात्सुकी यांनी सांगितलेल्या भविष्यानुसार जपानमध्ये 2011 मध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप आला आणि जपानची मोठी हानी झाली. याच र्यो तात्सुकी यांच्या कॉमिकची शेवटची आवृत्ती 2021 मध्ये प्रकाशित झाली आहे. या आवृत्तीमध्ये जपानमध्ये 2025 जुलैमध्ये प्रलयकारी भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत र्यो तात्सुकी यांनी सांगितेल्या भविष्यवाणी सत्यात उतरल्या आहेत. त्यामुळे जसजसा जुलै महिना जवळ येऊ लागला आहे, तशी जपानी नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. जपानमध्ये र्यो तात्सुकी यांना बाबा वेंगा किंवा नॉस्ट्रेडमस म्हणून ओळखण्यात येते. त्यांनी ज्या गोष्टींची भविष्यवाणी केली आहे, त्या सत्यात उतरल्या आहेत. त्याप्रमाणे जुलै महिन्यात जपानमध्ये भूकंप होणार आहे, यावर आता जपानी नागरिकच विश्वास ठेऊ लागले आहेत. (International News)

र्यो तात्सुकी यांच्या भविष्यवाणीनुसार 2025 मध्ये येणारा भूकंप हा 2011 च्या भूकंपापेक्षा तिप्पट तीव्रतेचा असणार आहे. यामुळे जपानचा भौगोलिक भागही बदलणार आहे. येवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप आल्यास त्सुनामीची तीव्रता किती असेल, अशा आशयाचे मेसेज सध्या जपानमध्ये सर्वाधिक व्हायरल होत आहेत. या सर्वांचा परिणाम जपानच्या पर्यटन व्यवसायाला झाला आहे. जपानसोबत हॉंगकॉंग येथेही असाच भूकंप येणार असल्याची भविष्यवाणी आहे. त्यामुळे या दोन्ही देशातील पर्यटन व्यवसाय सध्या पूर्णपणे ठप्प होण्याचा मार्गावर आहे. जपानला जाण्याचा विचार करणाऱ्या किंवा तेथील आधीच तिकिटे आणि हॉटेल बुक केलेल्या नागिरकांनी आपली तिकिटे रद्द करायला सुरुवात केली आहेत. यात हवाई वाहतुकीची तिकिटेही रद्द झाली आहेत. (Ryo Tatsuki)

=======

हे देखील वाचा : Noah Ark : रहस्य एका बोटीचे !

Covid-19 : तो परत येतोय !

=======

र्यो तात्सुकी यांनी याआधी राजकुमारी डायना आणि गायक फ्रेडी मॅककरी यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. शिवाय कोविडबद्दल आधीच भाकीत केले होते. त्यांच्या या भविष्यवाणी त्यांच्या कॉमिकमध्ये येत असत. त्यामुळे हे कॉमिक जपान, थायलंड आणि चीनमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 2011 च्या भूकंपाची भविष्यवाणी ज्या कॉमिकमध्ये केली होती, त्याच्या 9 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. आता त्याहून अधिक मागणी 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या शेवटच्या कॉमिकच्या प्रतींना आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.