Home » रुद्राक्ष आणि भद्राक्ष मधील फरक काय?

रुद्राक्ष आणि भद्राक्ष मधील फरक काय?

by Team Gajawaja
0 comment
Rudraksha Bhadraksha
Share

सनातन धर्मात रुद्राक्षचे फार महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार रुद्राक्षची निर्मिती शंकराने केली होती. याचा वापर मंत्रांचा जाप करण्यासाठी होतो. या व्यतिरिक्त आजकाल रुद्राक्षाची आभूषण सुद्धा अंगावर घातली जातात. रुद्राक्ष मुख्यत: नेपाळ आणि भारतात आढळतात. रुद्राक्ष हे काही मुखी असतात. ज्यांचे विविध महत्व सांगितले जाते. हे अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान असतात. अशातच जाणून घेऊयात रुद्राक्ष आणि भद्राक्ष मधील फरक नक्की काय आहे? (Rudraksha Bhadraksha)

भद्राक्ष म्हणजे काय?
भद्राक्ष हा एक प्रकारच्या मोतीसारखा असतो. जो रुद्राक्ष प्रमाणेच हलका आणि आकाराने थोडा वेगळा असतो. तो रुद्राक्षापेक्षा आकाराने अगदी लहान आणि त्याचा आकार हा अंडाकार असतो. भद्राक्ष हा फक्त भारतातच आढळून येतात. ते थोडे जाड-पातळ असतात आणि रुद्राक्षापेक्षा कमी तीव्रतेचे असतात.

Rudraksha Bhadraksha
Rudraksha Bhadraksha

रुद्राक्ष आणि भद्राक्ष मधील फरक काय?
-खरंतर भद्राक्षलाच रुद्राक्षाचे रुप मानले जाते. परंतु ते रुद्राक्षापेक्षा निम्मे असतात.
-भद्राक्षाची गुणवत्ता ही रुद्राक्षापेक्षा थोडी कमी असते.
-भद्राक्ष अंडाकार असतो तर रुद्राक्ष हा गोलाकार असतो.
-भद्राक्षामध्ये छिद्र नसतो तर रुद्राक्षमध्ये छिद्र असतो.
-भद्राक्ष हा भारतात आढळून येतो तर रुद्राक्ष नेपाळ आणि भारतात आढळतो.
-वजनाने रुद्राक्ष हा भद्राक्षापेक्षा थोडा हलका असतो
-रुद्राक्ष हा शार्प आणि भरगच्च असतो. याच्या तुलनेत भद्राक्ष थोडा पातळ आणि कमी भरगच्च असतो.
-रुद्राक्षाचा उपयोग जाप आणि आभूषणांसाठी केला जातो. तर भद्राक्षांचा वापर हा फक्त आभूषणांसाठी होतो.
-रुद्राक्षला जर तुम्ही पाण्यात टाकले तर तो बुडतो. मात्र भद्राक्ष हा पाण्यात टाकल्यानंतर तो हळूहळू खाली जातो.

हे देखील वाचा- नरकासुराचा नरक कुठे आहे ?

दरम्यान, रुद्राक्ष हा शब्द रुद्र, म्हणजेच शंकराचे दुसरे नाव आहे आणि अक्ष म्हणजे अश्रू. तर आपण जसे वरती पाहिले की, रुद्राक्ष हे विविध पद्धतीचे असतात आणि त्याचे वेगवेगळे महत्व आहे. त्यानुसारच काही रुद्राक्षांबद्दल ही पुढील माहिती नक्की तुमच्या कामी येईल.

-एक मुखी रुद्राक्ष हा शंकराचे प्रतिनिधित्व करतो. या रुद्राक्षाचा स्वामी सूर्य ग्रह आहे. यामुळे मनुष्याची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
-द्विमुखी रुद्राक्ष मूळ रुपात शंकर आणि पार्वती यांच्या मिलनाचे प्रतिनिधित्व करतात. या रुद्राक्षाचा स्वामी चंद्र ग्रह आहे. हा रुद्राक्ष नेत्र रोग आणि अन्य आरोग्याच्या समस्या ठिक करण्यास मदत करतो.
-त्रिमुखी रुद्राक्ष हा अग्नि देव आणि त्रिदेव देवता म्हणजेच भगवान शंकर, भगवान विष्णू आणि भगवान ब्रम्हा यांचे प्रतीक आहे. यामुळे तणाव आणि चिंतेसंबंधित मुद्द्यावरुन त्रस्त असलेल्यांसाठी दिलासा मिळतो. (Rudraksha Bhadraksha)
-चारमुखी रुद्राक्ष हा हिंदू देवी सरस्वती आणि भगवान ब्रम्ह यांचे प्रतिनिधित्व करते. हा रुद्राक्ष संपूर्ण शरिर ठीक करण्यास मदत करतो. त्याचसोबत व्यक्तीची विचार करण्याची क्षमता ही वाढवतो.
-पंचमुखी रुद्राक्ष हा मानवाच्या शरिरातील पाच तत्वांचे प्रतीक आहे. यामुळे लोक सुखी आणि आनंदमय आयुष्य जगतात आणि आपली पाप धुतली जावीत यासाठी त्याचा वापर करतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.