रशियाचे माजी वाहतूक मंत्री रोमन स्टारोवोइट यांचा मृतदेह एका गाडीत आढळून आला आहे. स्टारोवोइट यांनी आत्महत्या करण्याआधी काही तास आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. पुतिन यांनी स्टारोवोइट यांना त्यांच्या पदावरुन डच्चू दिला होता. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही होते. शिवाय रशियामध्ये काही दिवसापूर्वी युक्रेनकडून जो ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता, त्यातील संशयीत म्हणूनही स्टारोवोइट यांचे नाव घेण्यात येत होते. अशात त्यांची पुतिन यांनी भेट घेतली. या त्यांच्या भेटीत काय बोलणे झाले, याची माहिती नाही. मात्र त्यानंतर लगेच रोमन स्टारोवोइट यांनी स्वतःच्या गाडीमध्ये बसून आत्महत्या केली. या सर्व घटनेमुळे पुन्हा पुतिन यांची रशियाच्या अधिकारी आणि मंत्र्यांवर असलेली पकड चर्चेत आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन त्यांच्या जवळच्या लोकांवरही विश्वास ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना कोणावर संशय आल्यास त्या व्यक्तिचा मृत्यू निश्चित मानण्यात येतो. रोमन स्टारोवोइट यांच्या आत्महत्येकडेही याच नजरेतून बघण्यात येत आहे. (Russia)
रशियाचे माजी वाहतूक मंत्री रोमन स्टारोवॉयट यांनी त्यांच्या गाडीत आत्महत्या केल्यामुळे रशियात खळबळ उडाली आहे. व्लादिमीर पुतिन यांनी काढून टाकल्यानंतर एका दिवसानंतर रोमन स्टारोवोइट यांनी स्वतःवर गोळी झाडली. स्टारोवोइट यांचा मृतदेह त्यांच्या गाडीमध्येच काही काळ पडून होता, काही तासानंतर स्टारोवोइट यांचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला. पुतिन यांनी स्टारोवोइट यांना एका भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पदावरुन काढून टाकले होते. शिवाय त्यांचे युक्रेनसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा संशयही पुतिन यांना होता. त्यातूनच त्यांची स्टारोवोइट यांच्यावर नाराजी होती, यातूनच स्टारोवोइट यांनी आत्महत्या केली किंवा त्यांची हत्या झाली असावी. पुतिन यांच्या विरोधात जाणा-या अनेकांचा असाच गुढ मृत्यू झाला आहे. त्या आत्महत्या की हत्या हे गुढ कधीही उघड झाले नाही, स्टारोवोइट यांची आत्महत्याही त्याच प्रकारे ओळखली जाणार आहे. (International News)
रशियाचे माजी वाहतूक मंत्री रोमन स्टारोवोइट यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बडतर्फ करण्यात आले होते. युक्रेनच्या सीमेवरील कुर्स्क प्रदेशाचे गव्हर्नर म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केले होते. या कार्यकाळावर खुश होत पुतिन यांनी स्टारोवोइट यांची मे 2024 मध्ये वाहतूक मंत्री म्हणून नियुक्ती केली होती. या नियुक्तीनंतर स्टारोवोइट यांनी संपूर्ण रशियात रस्त्यांचे मोठे जाळे तयार केले होते. पण या सर्वात त्यांचे युक्रेनसोबत मैत्रीचे संबंध असल्याचा आरोप कायम करण्यात आला. कुर्स्क भागेच गव्हर्नर असतांना त्यांनी युक्रेनच्या अधिका-यांबरोबर मैत्री केल्याचेही बोलले जात होते. (Russia)
यातूनच रशियातील अंतर्गत माहिती युक्रेनमध्ये जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. हे असतांनाच रशियाच्या विमान वाहतूक आणि जहाजबांधणी क्षेत्रात निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार केल्याचा ठपका स्टारोवोइट यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. यानंतर त्यांनी पुतिन यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर काही तासातच त्यांनी आत्महत्या केली. स्टारोवोइट यांच्या जागी आता उपपरिवहन मंत्री आंद्रेई निकितिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोमन स्टारोवोइट हे रशियामध्ये लोकप्रिय नेते होते. एकेकाळी व्लादेमीर पुतिन यांच्या जवळचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळेच त्यांना कुर्स्क प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण रशियावर युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या चौकशीमध्ये रशियातून युक्रेनला स्टारोवोइट यांनी मदत केल्याचा संशय व्यक्त झाला होता. स्टारोवोइट यांच्या आत्महत्येपूर्वीच परिवहन मंत्रालयाचे अधिकारी आंद्रेई कोर्नेचुक यांचेही त्यांच्या कार्यालयात निधन झाले. (International News)
=============
हे ही वाचा : Elon Musk : द अमेरिका पार्टी !
America : आता सोशल मीडिया अकाऊंट पाहून अमेरिका देणार विद्यार्थ्यांना व्हिजा
=============
त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या विभागामार्फत युक्रेनला रशियातील विमानांबाबत अचूक माहिती पुरवल्याचा संशय होता, त्याचा तपास सुरु झाल्यावर या विभागातील अन्य काही अधिकारी गायब झाल्याचीही माहिती आहे. त्यातूनच स्टारोवोइट यांनी आत्महत्येचा पर्याय स्विकारल्याचे सांगण्यात येते. पुतिन हे आपल्या विरोधकांना कधीही माफ करत नाहीत. दुस-या देशात पळून गेलेल्या त्यांच्या अनेक राजकीय विरोधकांचाही रहस्यमय पद्धतीनं मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्टारोवोइट यांच्या मृत्यूचे गुढ कधीही उघड होणार नाही. (Russia)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics