Home » Rohit Sharma : रोहित शर्माच्या ‘त्या’ पोस्टमागील खरे कारण आले समोर

Rohit Sharma : रोहित शर्माच्या ‘त्या’ पोस्टमागील खरे कारण आले समोर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rohit Sharma
Share

आजच्या काळात भारताचे नाव क्रिकेटच्या खेळात खूपच उंचावले आहे. जगातील अतिशय स्ट्रॉंग टीम म्हणून टीम इंडियाकडे पाहिले जाते. क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत भारतीय क्रिकेट संघाने भारतचे नाव क्रिकेटच्या विश्वात मोठे केले आहे. आज क्रिकेटबद्दल बोलताना भारतीय क्रिकेटर्सबद्दल बोलणे देखील अनिवार्य आहे. या क्रिकेटर्सशिवाय काहीच शक्य नव्हते. अगदी बिशन सिंग बेदी, कपिल देव यांच्यापासून ते गावस्कर, द्रविड, सेहवाग, तेंडुलकर यांच्यापर्यंत सर्वच क्रिकेटसने भारतीय क्रिकेटला जगभरात नावलौकिक मिळून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. असेच एक आजच्या टीममधील महत्वाचे नाव म्हणजे रोहित शर्मा. (Rohit Sharma)

आजच्या भारतीय क्रिकेट संघातील सर्वात मोठा खेळाडू म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते. रोहितने त्याच्या तुफानी खेळीने क्रिकेटविश्वात अनेक मोठमोठे रेकॉर्ड तयार केले आहे. भारतीय टीमचा ओपनर म्हणून रोहितला ओळखले जाते. रोहित टीम इंडियाचा कॅप्टन असण्यासोबतच कमालीचा बॅट्समन देखील आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. नुकतीच रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. मात्र या पोस्टवरून आता त्याच्या फॅन्सने नेटकऱ्यांनी तो एकदिवसीय क्रिकेटमधून देखील निवृत्त होत असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र खरंच रोहितने निवृत्ती घेतली की त्याच्या पोस्टमागे वेगळेच कारण आहे? (Todays Marathi Headline)

Rohit Sharma

रोहित शर्माने २३ जून रोजी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित शर्माने क्रिकेटच्या हेल्मेटचा फोटो ठेवलेला दिसला. या हेल्मेटवर भारताचा तिरंगा देखील दिसत आहे. या हेल्मेटवर रोहित शर्माने ‘फॉरएव्हर ग्रेटफूल..’ असे लिहित २३ जून ही तारीख देखील टाकली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आजच्या दिवशी वनडे क्रिकेटमधील आपला प्रवास थांबवत असून, तो निवृत्ती घेत आहे, असे काही जणांना वाटले. त्यामुळे रोहित शर्माने आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली असल्याचे म्हटले जात आहे. पण या पोस्टमागे हेच कारण होते का? (Top Trending News)

रोहित शर्मासाठी २३ जून ही तारीख सर्वात खास आहे. कारण याच दिवशी रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रोहित शर्माने २३ जून २००७ या दिवशी भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करत होत रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. या सामन्याला आणि रोहितच्या कारकिर्दीला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे रोहित शर्माने या दिवसाला उजाळा देण्यासाठी ही पोस्ट केली आहे. मात्र अनेकांनी या पोस्टचा अर्थ वेगळा घेतला आणि रोहितच्या निवृत्तीची अफवा पसरवली. (Latest Marathi News)

========

हे देखील वाचा : Ambuba Yatra : अंबुबाची मेळ्याचे रहस्य !

========

दरम्यान मागील १८ वर्षांपासून रोहित शर्माने उकृष्ट कामगिरी केली आहे. ६७ कसोटी आणि २७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्तीनंतर २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी रोहित शर्मा सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अठरा वर्ष पूर्ण केल्याबद्दल रोहितने इन्स्टास्टोरी शेअर केली. (Social Meadia)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.