Home » कोरियन ग्लास स्किनसाठी घरच्याघरी असा तयार करा Rice Face Pack

कोरियन ग्लास स्किनसाठी घरच्याघरी असा तयार करा Rice Face Pack

तांदूळचा वापर करून फेस पॅक तयार केल्याने चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. अशातच तुम्ही या फेसपॅकमध्ये दूध आणि दही देखील मिक्स करू शकता.

by Team Gajawaja
0 comment
Rice Face Pack
Share

Rice Face Pack : तांदूळचा वापर प्रत्येक भारतीयाच्या घरात केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, दररोज खाल्ल्या जाणाऱ्या तांदूळचा वापर तुम्ही स्किन केअरमध्ये करू शकता. अशातच तुम्ही कोरियन तरुणींप्रमाणे ग्लोइंग आणि ग्लासी स्किन मिळवण्यासाठी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये तांदूळचा वापर करू शकता. खरंतर तांदूळमध्ये अँटी-ऑक्सिटेंड गुणधर्म असतात. ज्यामुळे ते स्किन केअर रुटीनमध्ये वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

स्किन केअरसाठी उत्तम
तांदूळचा स्किन केअरमध्ये वापर करण्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणजे याचा पॅक तयार करून घ्या. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो येईल. याशिवाय पिंपल्सची समस्या दूर होईल. तांदूळचा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये दूध आणि मधाचा वापर करू शकता.

Can The Viral Korean Rice Mask Give You Glass Skin? - HELLO! India

अशा प्रकारे तयार करा फेस पॅक
तांदूळचा फेस पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम शिजवलेले तांदूळ व्यवस्थितीत स्मॅश करून घ्या. यानंतर त्याची पेस्ट तयार करून यामध्ये दूध आणि मध मिक्स करा. तांदूळचा हा फेसपॅक तयार केल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. फेसपॅक 20 मिनिटे कमीत कमी चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. (Rice Face Pack)

तांदूळच्या पाण्याचा वापर
स्किन केअरमध्ये तुम्ही तांदूळचे पाणी वापरू शकता. यासाठी तांदूळ धुताना त्याचे पाणी स्टोअर करू ठेवा. या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, खनिज आणि अॅमिनो अॅसिड असते. जे आपल्या त्वचेला आतमधून हाइड्रेट करते. तुम्ही तांदूळचे पाणी कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहऱ्याला लावू शकता. तुम्ही तांदूळच्या पाण्याचा वापर टोनरच्या रुपातही करू शकता.


आणखी वाचा :
चमकदार त्वचेसाठी घरच्याघरी असा बनवा मटार फेसपॅक
खूप वेळ झोपल्याने डार्क सर्कल्सची समस्या दूर होते? वाचा काय म्हणतात एक्सपर्ट्स
थंडीत पायांना हे तेल लावा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.