भगवान विष्णूंना समर्पित असलेली मुख्य तिथी म्हणजे, ‘एकादशी’. दर महिन्याला दोन एकादशी येतात. एकादशीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. लवकरच पौष महिन्यातली आणि २०२५ सालातली शेवटची एकादशी तिथी येत आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ‘पुत्रदा एकादशी’ म्हटले जाते. पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते. पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात येते. पुत्रदा एकादशी ही वर्षातल्या महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे. (Ekadshi)
यंदा पौष महिन्यातली पुत्रदा एकादशी ही मंगळवार, 30 डिसेंबर रोजी येत आहे. ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे. पौष पुत्रदा एकादशी तिथी ही मंगळवार, ३० डिसेंबर सकाळी ७:५० वाजता सुरु होत आहे. तर एकादशी तिथी बुधवार, ३१ डिसेंबर सकाळी ५:०० वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार, ३० डिसेंबर रोजी पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. ज्या लोकांना मूल होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात. एकादशीच्या दिवशी भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. (Putrada Ekadshi)
पुत्रदा एकादशीचे महत्त्व
पुत्रदा एकादशीच्या दिवशी नवरा-बायकोने व्रत करण्याचे महत्व आहे. तसेच विधीपूर्वक आणि नियम पाळून पूजा करावी. त्यामुळे संतान प्राप्तीची शक्यता वाढते. यासोबतच भगवान विष्णू आणि शिव आपल्या भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. एकादशीचे व्रत केल्याने लोकांचे दुःख आणि पीडा समस्या, त्रास दूर होतात अशी मान्यता आहे. जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे. (Marathi)

पुत्रदा एकादशी पूजा विधी
एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा-लसूण खाऊ नये. द्वादशीला उपवास सोडावा. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता. स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधीवत पूजा करा. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, रोली, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या. (Latest Marathi News)
पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा. रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे. ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण, कांदा विरहित अन्न खावे. यासह, मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे. दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे. व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही, त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे. यासह, खोटे बोलणे, अनैतिक कृत्ये करणे, राग-लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे. एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते, त्यामुळे वांगी, सुपारी, मांस-दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. या दिवशी कांस्य भांड्यात अन्न खाऊ नका. (Top Marathi Headline)
श्री विष्णु मंत्र
ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
क्लेश नाशक श्री विष्णु मंत्र:
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणत क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः।
विष्णु गायत्री मंत्र:
नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि ।
तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॥
पुत्रदा एकादशी कथा
युद्धिष्ठर म्हणाला हे परमेश्वरा! एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली. आता मी विनंती करतो की, पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते. त्याची विधी काय याबद्दल सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले हे राजन! श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या दिनी विष्णूसह लक्ष्मीची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते. तसेच तो विद्वान आणि धनवान होतो. हे व्रत का केले जाते जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत होतो. त्याला संतान प्राप्ती नव्हती. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते. तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दु:खी असायची. राजाकडे अफाट संपत्ती होती. धन, हत्ती, घोडे, धान्य सगळं होते परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते.
मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल, माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा. मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा. आपल्याला संतान व्हायला हवी असे राजाला नेहमी वाटायचे. त्यासाठी काही तरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत. याविचारात राजा नेहमीच असायचा. (Marathi Top Stories)
राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला. परंतु, आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा-फुलाना न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्तसंचार करत होते. हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता. राजाला जंगलात येऊन बराच कालावाधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता- ‘मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राम्हण देवताला भोजन करून तृप्त केले तरी ही माझ्या वाट्याला दु:खच का आले असावे?’ (Top Marathi News)
विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा इकडे-तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते. हंस व मगर विहार करत होते. सरोवराच्या चहुबाजुंनी ऋषींचा आश्रम होता. त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला. राजाला शुभशकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे, तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते. पुर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र, धनप्राप्ती होत असते. (Latest Marathi News)
=========
Dream Meaning : स्वप्नात एखादा व्यक्ती आनंदी दिसल्यास याचे संकेत काय? जाणून घ्या अर्थ
प्रत्येक महिलेने आयुष्यात वाचावीत ही ५ पुस्तके, जगण्याला मिळेल नवी दिशा
=========
राजाला पाहाताच ऋषीचे म्हटले – ‘हे राजन! आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा. हे ऐकताच राजाने त्यांना विचारले. महाराज आपण कोण आहात, येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय? ऋषीमुनींनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यात आलो आहे. ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला ‘ऋषीदेवता मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा, मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या.’ (Top Trending Headline)
ऋषीमुनी म्हणाले -‘हे राजन! आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल. ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महलात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
