Home » भारतातील ‘हा’ आहे Reverse Waterfall

भारतातील ‘हा’ आहे Reverse Waterfall

by Team Gajawaja
0 comment
reverse waterfall
Share

भारतातील अशी काही ठिकाणं आहेत जी आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे फार प्रसिद्ध आहेत. तेथील निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर एक वेगळीच मजा सुद्धा अनुभवायला मिळते. त्यापैकीच एक ठिकाण हे महाराष्ट्रात आहे.जर तुम्ही एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेला असाल किंवा सध्या पावसाळ्यात जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या समोर विविध पर्याय येतात. परंतु महाराष्ट्रात असा एक झरा आहे जो प्रवाहाच्या उलट दिशेने वाहतो. यामागील मुख्य कारणं असे सांगितले जाते की, गुरुत्वाकर्षण. हा झरा पाहण्यााठी पर्यटकांची फार मोठी गर्दी होते. (Reverse Waterfall)

महाराष्ट्रातील हा झरा नाणेघाटात आहे. कोकणाचा समुद्र तट आणि जुन्नर दरम्यान हे. तुम्ही जर मुंबईहून नाणेघाट झऱ्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला १२० किमीचा प्रवास करावा लागेल. तर पुण्यातून तुम्हाला तो १५० किमी आहे. या झऱ्याला नाणेघाट झरा किंवा रिवर्स वॉटरफॉल असे ही म्हटले जाते.

खरंतर हा झरा उलट दिशेने वाहण्याचे कारण गुरुत्वाकर्षण सांगितले जाते. खरंतर गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की, वरुन पडलेली कोणतीही गोष्ट ही जमीनीवरच येऊन पडते. मात्र हा झरा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाहतो. उंचावरुन खाली कोसळणारा झरा उलट दिशेने म्हणजेच खाली पडण्याऐवजी वरील दिशेला जातो. याच कारणास्तव दूरवरुन पर्यटक हा झरा पाहण्यासाठी आवर्जुन येतात. या झऱ्या बद्दल वैज्ञानिक असे म्हणतात की, या ठिकाणी वारा फार वेगाने वाहतो, त्यामुळेच पाणी हे वरच्या दिशेने फेकले जाते.

जर तुम्हाला रिवर्स वॉटरफॉल पहायचा असेल तर जुन्नरला जावे लागेल. यासाठी तुम्हाला कल्याणहन बस मिळेल. रस्ते मार्गने जात असाल तर अगदी सहज नाणेघाट रिवर्स वॉटरफॉल पाहू शकता. येथे झऱ्यासह ट्रेकिंगचा ही आनंद लुटला जातो.नाणेघाट ट्रॅक घाटघर जंगलाचा एक हिस्सा आहे. जर तुम्हाला ट्रेकिंगची फार आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग आणि कल्याण वरुन ही येथे येऊ शकता. खासकरुन पावसाळ्यात येथील निसर्गाच्या मोहात तुम्ही नक्कीच पडाल. (Reverse Waterfall)

हेही वाचा- Eshima Ohashi Bridge ची सफर

कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल
-कोणत्याही रिस्की ठिकाणी जाण्यापासून दूर रहा.दाखवलेल्या मार्गानुसारच जा.
-घसरण असलेल्या ठिकाणी सावकाश जा, खासकरुन पावसाळ्यात.
-डोंगरकडा किंवा नदीच्या येथे स्टँट करण्याचा विचार ही करु नका.
-पावसाचा जोर पाहूनच तुमच्या ट्रिपचा प्लॅन करा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.