Home » RBI कडून रेपो रेट मध्ये वाढ केल्यानंतर गृहकर्ज आणि कार लोनचा EMI किती टक्क्यांनी वाढणार?

RBI कडून रेपो रेट मध्ये वाढ केल्यानंतर गृहकर्ज आणि कार लोनचा EMI किती टक्क्यांनी वाढणार?

by Team Gajawaja
0 comment
Repo Rate
Share

महागाईवर तोडगा काढण्यासाठी आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आजच रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत आता बँकेकडून कर्ज घेणे सुद्धा महागले आहे. यामुळे गृहकर्ज, कारसाठी लोन घेतल्यास तुमच्या ईएमआय मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. भारतीय रिजर्व बँकेने घोषणा केली आहे की, आता रेपो रेट (Repo Rate) वाढून ५.४० टक्क्यांवरुन ५.९० टक्के झाला आहे.

खरंतर सर्व बँका व्याजाचे दर ठरवण्यासाठी रेपो रेटच्या आधारावर बेंचमार्कचा वापर करतात. त्यासाठी जर रेपो रेट वाढल्यास बँका सुद्धा आपल्या लोनवरील व्याजदर वाढवतात. तर रेपो रेट मध्ये घट झाल्यास कर्ज स्वस्त होते. यंदा पॉलिसी दरात वाढ झाल्याने होम लोनचे दर आता ८.५५ टक्क्यांच्या पार जाणार आहे. अशातच लोकांना घर खरेदी करण्यासाठी सुद्धा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Repo Rate
Repo Rate

किती वाढणार होम लोनचा EMI?
रेपो रेटमध्ये वाढ केल्यासंदर्भातील एक उदाहरण पाहूयात. असे मानूयात सोहम नावाच्या व्यक्तीने ८.०५ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी २१ लाख रुपयांचे होम लोन घेतले आहे. आता सोहमच्या कर्जाचा ईएमआय १७५८४ रुपये असेल आणि संपूर्ण काळात त्याला ४२,२०,२१० रुपये मोजावे लागणार आहेत.

तर सोहमने कर्ज घेतल्याच्या एका महिन्यानंतर आता आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांनी वाढ केली. यासाठी बँकेच्या दरात सुद्धा ०.५० टक्क्यांनी वाढ झाली. आता मानूयात सोहमचा मित्र साई हा सुद्धा त्याच बँकेतून कर्ज घेत आहे. आता साईला बँकेला ८.५० टक्क्यांऐवजी ८.५५ टक्क्यांचा व्याजदराने कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. (Repo Rate)

हे देखील वाचा- आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा मिळणार पासपोर्टसाठीचे पोलीस क्लियरेंस सर्टिफिकेट

आता साई २१ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षासाठी घेत असेल. पण त्याचा ईएमआय हा १८,२४२ रुपयेच आहे. अशा प्रकारे राजेशचा होम लोनवरील ईएमआयपेक्षा ६५८ रुपये अधिक साईला द्यावे लागतील. याच कारणास्तव सोहमच्या मित्राला २० वर्षात एकूण ४३,७८,१०२ रुपये मोजावे लागणार आहेत. ही रक्कम राजेशच्या रक्कमेपक्षा १५७,८९२ रुपयांनी अधिक आहे. तर व्याज दर वाढल्यान सोहमला आपल्या सध्याच्या ईएमआयवर साई प्रमाणेच ६५८ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. तर हेच गणित कार किंवा अन्य कर्जासंदर्भात ही लागू असेल. म्हणजेच सर्व लोन महागले आहेत आणि इंटरेस्ट रेट वाढल्याने सध्याच्या कर्जाचा ईएमआय सुद्धा वाढेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.