Home » Winter Care : थंडीत टाचांना पडलेल्या भेगांमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय करूनच बघा

Winter Care : थंडीत टाचांना पडलेल्या भेगांमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय करूनच बघा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Winter Care
Share

हिवाळा म्हणजे सर्वात आल्हादायक ऋतू. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू अतिशय उत्तम समजला जातो. मात्र या ऋतूचे देखील काही त्रास आहेत. हिवाळा ऋतू सुरु झाल्यानंतर अनेक त्रास जाणवायला लागतात. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर कोरडी हवा असते. याच कोरड्या हवेचा परिणाम त्वचेवर होतो आणि ओठ फुटणे, त्वचा खेचल्यासारखी होणे किंवा कोरडी होणे यांसारख्या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे हिवाळ्यात बहुतांश लोकांच्या टाचांना भेगा पडणे देखील सामान्य बनले आहे. तळपायाची त्वचा कोरडी पडल्यामुळे तसेच डीहायड्रेशनमुळे पायांना भेगा पडतात. (Winter Care)

त्वचा जेव्हा सुखू लागते त्यामधील आर्द्रता कमी होते. यामुळे पायांमधील भेगा अधिक रुक्ष आणि कडक होतात. हा त्रास अगदी त्वचेला भेगा पाडून त्यामध्ये जखम देखील होते. याचे मुख्य कारण आहे शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता. ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी3, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीची कमतरता असते त्यांना टाच फुटण्याची समस्या जास्त असते. व्हिटॅमिन ई आणि सी कोलेजन वाढवण्यास मदत करतात. ही दोन्ही जीवनसत्त्वे त्वचेची काळजी घेतात. खनिजे, झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडच्या कमतरतेमुळेही त्वचेत कोरडेपणा येऊ लागतो. (Health)

शरीरात हार्मोन्सचे असंतुलन असेल तर त्याचा परिणाम त्वचेवरही होतो. ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे किंवा इस्ट्रोजेन सारखे हार्मोन्सचा त्रास होतो, त्यांच्या टाचांनाही तडा जाऊ लागतो. काहीवेळा जेव्हा समस्या गंभीर बनते तेव्हा टाचांमध्ये भेगा पडतात आणि रक्तस्त्राव सुरू होतो. अशावेळेस आपण कधी कधी कितीही महागड्या क्रीम्स वापरलात तरीही आपल्याला त्याचा अपेक्षित फायदा होत नाही. यासाठीच आज आपण यावर काही घरगुती उपाय जाणून घेऊया. (Marathi)

खोबरेल तेल
झोपण्यापूर्वी तुमच्या टाचांवर कोमट नारळाच्या तेलाची मालिश करा, त्यानंतर सुती मोजे घालून झोपा. असे केल्याने रात्रभर तेल तुमच्या पायाला राहते, आणि कोरड्या पडलेल्या तुमच्या टाचांना खोलवर मॉइश्चराईज्ड करून जळजळ शांत करते.

रात्री झोपताना मोजे घाला
जर तुमच्या टाचांना भेग पडली असेल तर शक्य तितका वेळ ओलसर ठेवणे महत्त्वाचे आहे. पेट्रोलिअम जेली लावल्यानंतर पायात मोजे घाला, रात्री झोपताना कमीतकमी २ ते ३ तास मोजे घाला ज्यामुळे भेगा बऱ्या होण्यास मदत होईल. (Winter Care News)

अनवाणी पाय जमिनीवर ठेऊ नका.
भेगा झाल्या असतील तर तर चुकूनही पाय थंड जमिनीवर ठेवू नका. मुख्य अनवाणी पाय जमिनीवर ठेवू नका, कारण असे केल्याने भेगांमध्ये संसर्ग होऊ शकतो. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी पायात मोजे किंवा चपला घालाव्यात. (Marathi News)

मध आणि कोमट पाण्यात पाय भिजवा
कोमट पाण्यात २ चमचे मध मिसळा आणि तुमचे पाय २० मिनिटे त्यात भिजत ठेवा. मध नैसर्गिक ह्युमेक्टंट म्हणून काम करते, खडबडीत आणि कोरड्या टाचांना मऊ करते. (Todays Marathi HEadline)

Winter Care

कोरफड जेल
ताजे कोरफडीचे जेल थेट टाचांवर लावा. त्यानंतर मोजे घाला. हे काम रात्री झोपण्यापूर्वी करा, जेणेकरून तुमची त्वचा दुरुस्त होण्यासाठी सकाळपर्यंतचा वेळ मिळेल. (Marathi News)

केळीची पेस्ट लावा
एका पिकलेल्या केळीची गुळगुळीत पेस्ट बनवा आणि ते आपल्या टाचांना लावा. १५-२० मिनिटे राहू द्या, त्यानंतर स्वच्छ धुवा. मग पायांना मॉइश्चरायझ करा.

योग्य आहार घ्या
त्वचा आणि पायांच्या टाचांना भेगा पडण्यापासून रोखण्यासाठी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई समृद्ध आहार घेत रहा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गाजर, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करून याचे सेवन करा. हे आपल्या त्वचेला आतून पोषण देईल आणि ती कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करेल. तसेच हिवाळ्यात घट्ट किंवा कडक शूज घालणे टाळावे. आपल्या पायांना आरामदायक आणि मऊ शूज घाला, जेणेकरून भेगा पडलेल्या टाचांवर दबाव येणार नाही आणि त्वचेचे संरक्षण होईल. (Top Marathi Headline)

शिया बटर
टाच खूपच कोरडी आणि दुभंगलेल्या अवस्थेत असेल तर तर तीव्र हायड्रेशनसाठी झोपण्यापूर्वी शिया बटर चोळा. हे जीवनसत्त्वे आणि फॅटी ऍसिडने भरलेले आहे जे तडे गेलेल्या त्वचेची दुरुस्ती करतात.

व्हॅसलीन आणि लिंबाचा रस
लिंबाच्या रसाचे काही थेंब पेट्रोलियम जेलीमध्ये मिसळा आणि टाचांना लावा. आणि रात्रभर पायात मोजे घालून झोपा. असे केल्याने पाय सकाळपर्यंत मुलायम झालेले तुम्हाला दिसून येतील. (Top Stories)

नियमित पाणी पिणे
थंडीच्या दिवसात आपल्याला जास्त तहान लागत नाही यासाठी या दिवसांमध्ये कमी पाणी पिले जाते. अशावेळी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त पाणी प्या, कारण यामुळे तुमच्या त्वचेला आतून ओलावा मिळतो आणि ती कोरडी होण्यापासून वाचते. तसेच हिवाळ्यात गरम पाणी टाळावे. कोमट पाण्याचा वापर करा, जेणेकरून त्वचेचा नैसर्गिक ओलावा कायम राहील. (Latest Marathi News)

=========

Health : तुम्हाला श्वास घेताना त्रास होतो का? मग असू शकतो ‘हा’ आजार

Sleeping : तुम्ही देखील तोंड उघडे ठेऊन झोपता? संकेत आहे मोठा आजाराचा

=========

ऑलिव्ह ऑइल मसाज
पायांच्या भेगा दूर करण्यासाठी तळपायांना रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. हे तेल खोल मॉइश्चरायझिंग आणि बरे करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. (Top Trending News)

तांदळाच्या पिठाचा स्क्रब
तांदळाचे पीठ, मध आणि दूध वापरून पेस्ट तयार करा. कोरडी त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी हळूवारपणे स्क्रब करा, नंतर स्वच्छ धुवा आणि मॉइश्चरायझ करा. ही पद्धत स्पष्टपणे गुळगुळीत टाचांसाठी मृत त्वचा काढून टाकते. (Social News)

(टीप: वरील लेख सामान्य माहिती आणि घरगुती उपायांवर अवलंबून आहे. कोणतेही उपाय करताना आणि अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. )

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.