Home » माया संस्कृतीचे अवशेष

माया संस्कृतीचे अवशेष

by Team Gajawaja
0 comment
Maya city
Share

मेक्सिको आणि अमेरिकेच्या काही भागात माया (Maya city) संस्कृती होती, असे सांगण्यात येते. यासंदर्भात अनेक पुस्तकेही आहेत. मात्र अलिकडील काही वर्षात मेक्सिकोच्या वेगवेगळ्या भागात याच माया संस्कृतीशी साधर्म्य असणारे अवशेष सापडत आहेत. गेल्यावर्षी मेक्सिकोच्या जंगलात एक भव्य असे मंदिर सापडले होते. हे मंदिर माया संस्कृतीमधील असल्याचे स्पष्ट झाले. या मंदिराबद्दल अधिक संशोधन होत असतांनाच मेक्सिकोच्या जंगलात पुन्हा 1000 वर्ष जुने रहस्यमय माया शहर सापडले आहे. मुख्य म्हणजे, येथे 50 फूट उंच पिरॅमिडही आहे. तसेच मोठ्या खेळपट्याही सापडल्या आहेत. यामुळे माया संस्कृतीच्या प्रगतीच्या टप्प्यांसंदर्भात अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे, तसेच माया संस्कृतीमधील अनेक रहस्ये उघड होणार आहेत.

गेल्या काही वर्षापासून मेक्सिकोच्या विविध भागात माया संस्कृतीचे अवशेष मिळत आहेत. यामुळे मेक्सिकोच्या जंगलात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम घेण्यात येत आहे. यादरम्यान मेक्सिकोच्या जंगलात 1000 वर्ष जुन्या माया सभ्यता शहराचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांमध्ये 50 फूट उंच पिरॅमिडही आहे. घनदाट जंगलात सापडलेले हे शहर जिथे आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताही नाही. या शहरात सापडलेल्या अवशेषांमुळे संशोधक आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण माया संस्कृती किती विकसीत होती, याचा पुरावा यातून पुन्हा एकदा मिळाला आहे. आत्तापर्यंत जंगलात गडप झालेल्या या शहरात एक विशाल खेळपट्टीही सापडली आहे. या खेळपट्टीसोबत सापडलेली खेळाची साधने पाहून तज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.(Maya city)

 

प्राचीन माया (Maya city) संस्कृतीही अतिशय प्रगत होती. या संस्कृतीमधील शहरे ही आत्तासारखी विकसीत होती. मोठ्या इमारती, विस्तृत मैदाने, शिक्षणसंस्कृती, हे सर्व या माया संस्कृतीत होते. मात्र माया संस्कृतीची लिपी ही आत्तापर्यंत गूढ मानली गेली आहे. कारण संपन्न, समृद्ध असलेल्या या माया संस्कृतीतील मोठा खजिना माया संस्कृतीमधील मंदिरांमध्ये दडवल्याचा काही पुस्तकात उल्लेख आहे. यामुळेच माया संस्कृतीतील अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला जातो, असे सांगण्यात येते. या माया संस्कृतीची मेक्सिकोमध्ये भरभराट झालेली होती. याच संस्कृतीचे अवशेष अनेकदा मेक्सिकोच्या घनदाट जंगलात मिळत आहेत. गेल्या वर्षापासून या संदर्भात मेक्सिको सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. या समितीतील तज्ञांनाच हे माया सभ्यतेचे हरवलेले शहर सापडले आहे. हे शहर 1000 वर्षे जुने असून त्यात 50 फूट उंच पिरॅमिडही सापडला आहे. यात प्राचीन खेळपट्टीही सापडली आहे. हे विशाल शहर आणि तेथील व्यवस्था पाहून या समितीतील तज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच आता हे शहर जिथे सापडले आहे, त्या संपूर्ण परिसरात नव्यानं शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या घनदाट जंगलात अन्यही काही अवशेष असल्याचा संशय या तज्ञांना आहे.

आता जे माया (Maya city) संस्कृतीचे शहर सापडले आहे त्या शहरात अनेक पिरॅमिड सारखी रचना आहे. भव्य इमारती आणि असंख्य दगडी स्तंभही आहेत. शिवाय दंडगोलाकार संरचना आहेत. त्यावरुन या भागात एकेकाळी हजारो नागरिक रहात असून त्यांची घरे असल्याची माहिती पुढे आली आहे. या शहरातील एक पिरॅमिड इतका उंच होता की हाच पिरॅमिड पहिल्यांदा शोध पथकाला दिसला, त्यानंतर आसपासचा भाग काळजीपूर्वक शोधण्यात आला. या पिरॅमिडच्या बाजुला होम करण्यासाठी करण्यात येणारे चौथरे मिळाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धार्मिक समारंभासाठी वापरण्यात येणारे खेळाचे मैदानही येथे सापडले आहे. ही माया वस्ती 250 ते 1000 AD च्या दरम्यानची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

========

हे देखील वाचा : ‘या’ मंदिरात श्रीकृष्णाचा आहे वास…

========

या शोध मोहीमेचे प्रमुख पुरातत्वशास्त्रज्ञ इव्हान स्प्रेज यांनी सांगितले की, या जागेचे नाव ओकोमटुन असून या प्रदेशाच्या पुरातत्व नकाशावरील शेवटचे मोठे ‘ब्लॅक होल’ म्हणून या शहराकडे बघितले जात होते. ओकोमटुन शहर जिथे सापडले आहे तो भाग म्हणजे, मेक्सिकोचे आखात आणि कॅरिबियन समुद्रादरम्यान आहे. हा परिसर घनदाट अरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात साधी पायवाटही नाही. 2023 मध्ये येथेच अन्य एका शहराचा शोध लागला होता. या भागात सापडलेल्या इमारतींमध्ये मातीची भांडी आणि सिरॅमिक वस्तूंसारख्या कलाकृतींही सापडल्या. त्यानंतर संशोधकांनी हा सर्व भाग ताब्यात घेतला, आणि आता त्याच शहराच्या बाजुला अन्य भव्य असे शहर सापडले आहे.

अमेरिकेची प्राचीन माया (Maya city) सभ्यता ग्वाटेमाला, मेक्सिको, होंडुरास आणि युकाटन द्वीपकल्पात विकसीत झाली होती. माया संस्कृती 300 AD ते 900 AD च्या दरम्यान अतिशय संपन्न अवस्थेत होती. मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास आणि एल साल्वाडोर हे या संस्कृतीनं व्यापलेले देश होते. 11 व्या शतकापासून माया संस्कृतीचा ऱ्हास सुरू झाला आणि 16 व्या शतकात संपूर्ण माया संस्कृती काळाच्या पडद्याआड गेली.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.