Relationship Tips : नव्या व्यक्तींना भेटताना किंवा बोलताना काहींना भीती वाटते. यावेळी मनात अनेक प्रश्नही उद्भवले जातात. जसे की, कसे बोलू, कसे बोलण्यास सुरुवात करू किंवा समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल का? पण ही स्थिती तुमच्या एकट्यासोबत होत नाही. बहुतांशजण भीतीपोटी नवी नाती तयार करण्यास घाबरतात. हीच भीती दूर करणे फार महत्वाचे आहे. नवी नाती तयार केल्याने आत्मविश्वास वाढला जातो. पुढील काही टिप्स फॉलो करून नव्या लोकांसोबत संवादाला सुरूवात करू शकता.
हसून सुरुवात करा
एखाद्या व्यक्तीसोबत बोलण्यास सुरुवात करताना थोडे हसा. यामुळे आत्मविश्वास थोडा वाढला जातो. काहीवेळेस शब्दांआधी आपले शरीर समोरच्या व्यक्तीला तुम्ही कसे रिअॅक्ट करतेय हे कळते.
सोपे प्रश्न विचारा
संवाद सुरू करण्यापूर्वी ऋतू, ठिकाण किंवा एखादा सिंपल टॉपिक काढा. जसे की, एखाद्या ठिकाणची प्रसिद्ध गोष्ट काय असे प्रश्न विचारू शकता.
समोरचा व्यक्ती बोलतोय त्याकडे लक्ष द्या
समोरचा व्यक्ती काय बोलतोय याकडे लक्ष द्या. याशिवाय तुम्ही देखील त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी होण्यास प्रयत्न करा.
कॉम्प्लिमेंट द्या
समोरच्या व्यक्तीला त्यांच्या लूक किंवा बोलण्यावरुन कॉम्प्लिमेंट द्या. यामुळे समोरच्या व्यक्तीला फार चांगले वाटेल. याशिवाय संवादाच्या सुरुवातीला सकारात्मक वातावरण तयार होईल.
=======================================================================================================
हेही वाचा :
वजन कमी करण्यासाठी डब्रो डाएट म्हणजे काय?
कडक उन्हामध्ये चक्कर येत असल्यास घाबरू नका करा हे काम
=======================================================================================================
थोडा ह्यूमरही गरजेचा
जर तुम्ही एखादा जोक किंवा मजा-मस्ती म्हणून काही केले तरीही संवादामध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो. अशातच तुमचे व्यक्तीमत्व खुलून दिसेल. (Relationship Tips)
आय-कॉन्टॅक्ट महत्वाचा
आय-कॉन्टॅक्ट करणे फार महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या बोलण्याकडे समोरचा व्यक्ती व्यवस्थितीत लक्ष देईल. याशिवाय आत्मविश्वासही वाढला जातो.
प्रॅक्टिस करा
दररोज स्वत:ला प्रॉमिस द्या की, कमीत कमी दिवसातून एका नव्या व्यक्तीसोबत संवाद साधा. यामुळे हळूहळू बोलण्याची भीती कमी होऊ लागते.