Relationship Tips : ज्यावेळी तुम्ही प्रेमात असता तेव्हा पार्टनरकडून तुम्हाला रेड फ्लॅग किंवा अन्य काही प्रकारचे फ्लॅग लावले जातात. पण रेड फ्लॅगच्या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास याचा रिलेशनशिपवर पुढे जाऊन परिणाम होऊ शकतो. अशातच जाणून घेऊया पार्टनरच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगतात तुम्ही चुकीच्या रिलेशनशिपमध्ये आहात.
तुला दुखवायचे नाही
जर पार्टनर तुम्हाला वारंवार असे बोलत असेल तुला दुखवायचे नाही तर समजून जा निश्चित रुपात तुम्हाला दुखवणार आहे. यावेळी सर्वाधिक मोठा गैसमज असा होतो की, पार्टनरच्या अशा बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या काही चुकांकडे दुर्लक्ष करतो.
तुझ्याशिवाय कोणीही नाही
पार्टनर तुम्हाला सातत्याने टोमणे मारुन तुझ्याशिवाय कोणीही नाही असे म्हणत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण हे संकेत तुम्ही चुकीच्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे असू शकतात. पार्टनरला वाईट वाटेल म्हणून त्याला प्रत्येकवेळी समजून घेणेही चुकीचे आहे. स्वत:बद्दलच्या पार्टनरसमोर काही मर्यादा तयार करा.
ही तुझी समस्या आहे, माझी नव्हे
पार्टनर तुम्हाला ही तुझी समस्या आहे, माझी नव्हे असे म्हणत असल्यास तर चुकीच्या नात्यात असल्याचा संकेत आहे. यामध्ये पार्टनर जबाबदाऱ्या घेण्यापासून अंग काढतोय असे दिसून येते. (Relationship Tips)
तुझीच चुकी आहे
जर तुमच्याकडून एखादी चूक झाल्यास त्यावेळी पार्टनरने तुम्हाला समजून घेण्याऐवजी रागवत असल्यास तर हे योग्य नाही. अशा स्थितीत पार्टनरने तुमची बाजू समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.