Home » ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा पार्टनरसोबत संबंध जोडण्यास कामी येतील ‘या’ टिप्स

ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा पार्टनरसोबत संबंध जोडण्यास कामी येतील ‘या’ टिप्स

by Team Gajawaja
0 comment
Relationship tip for patch up
Share

Relationship tip for patch up- रिलेशनशिपमध्ये भांडण, वाद होणे या सर्वसामान्य गोष्टी आहेत. परंतु काही जणांना वाद किंवा भांडण झाल्यानंतर स्वत:चेच खरं करायचे असते अशा लोक रिलेशनशिपमध्ये जास्त काळ टिकत नाहीत. त्यांचे कालांतराने ब्रेकअप होते. आपण जर समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेतले. समजून घेतले आणि त्यानंतर कृती केली तर सर्वकाही गोष्टी सुरळीत होऊ शकतात. मात्र समोरच्या व्यक्तीचे काहीच ऐकून न घेता सरळ ब्रेकअप केले तर भावना या दुखावल्या जातात. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा आपल्याला आपलीच चूक लक्षात येते तेव्हा पुन्हा आपल्या पार्टनरकडे आपल्याला जावेसे वाटते. अशातच तुमचे सुद्धा ब्रेकअप झालेय आणि आता पुन्हा एकदा एक्स पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये यायचे असेल तर काय करावे हे कळत नसेल तर थांबा. कारण आम्ही तुम्हाला याचबद्दलच्या काही खास टिप्स देणार आहोत.

-सोशल मीडियात ब्रेकअपबद्दल सांगू नका
आजकालचे तरुण-तरुणी प्रत्येक गोष्ट सोशल मीडियात शेअर करतात. अशातच तुमचे ब्रेकअप झाले असेल आणि त्याबद्दल तुम्ही सोशल मीडियात ती गोष्ट शेअऱ केल्यास त्याचा तुम्हाला त्रास होईलच. पण पुन्हा एकदा त्याच पार्टनर सोबत रिलेशनशिपमध्ये येताना तुम्हाला त्या बद्दल पोस्ट करता थोडे विचित्र वाटेल. त्यामुळे ब्रेकअप झाले असले तरीही त्याबद्दल जास्त कोणाला सांगू नका. आपल्या खासगी आयुष्याची प्रायव्हसी तुम्हाला जपता आली पाहिजे.

-लगेच कोणाला डेट करु नका
जर तुमचे ब्रेकअप झाले असेल आणि तुम्ही लगेच नव्या रिलेशनशिपमध्ये येऊ पाहत असाल तर तुम्हाला तुमच्या एक्स पार्टनरबद्दल आणि ब्रेकअप बद्दल ही विचारले जाईल. पण नव्या पार्टनरला डेट करताना तुम्हाला एक्स-पार्टनरची आठवण येत असेल किंव तुम्ही त्याला पूर्णपणे विसरला नसाल तर थोडा स्वत:साठी वेळ घ्या आणि पुन्हा एकदा एक्स बद्दल विचार करा. ज्या काही चुका झाल्या आहेत त्यावर सविस्तर बोला आणि तुमचे प्रॉब्लेम्स सोडवा. त्यामुळे ब्रेकअपनंतर लगेच कोणाला डेट करण्यापासून दूर रहा.

हे देखील वाचा- आयुष्यात सर्वकाही असून ही आनंदी वाटत नाही? अशावेळी नक्की काय केले पाहिजे

-ब्रेकअपचे कारण जाणून घ्या
जेव्हा तुमचे ब्रेकअप होते तेव्हा ते नक्की कोणत्या कारणावरुन झालेय हे पार्टनरला विचारणे विसरुनच जातो. वाद अधिक टोकाला गेला किंवा आपले पटले नाही म्हणून ब्रेकअप करणे हे चुकीचे आहे. असेच असेल तर ब्रेकअप का केले हा प्रश्न पार्टनरला विचारणे सहाजिकच आहे. कारण आपण समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत काही महिने, वर्ष व्यतीत करतो आणि ब्रेकअपची गोष्ट आली की ती अशीच धुडकावून देऊ शकत नाही. त्यामुळे जरी तुमची हिंमत होत नसेल तरीही पार्टनरला ब्रेकअप मागील कारण विचारुन घ्या. जर तुम्हाला ते कारण पटलं तर आयुष्यात पुढे जा. अन्यथा कारण पटलं नसेल तर त्याला ते का पटले नाही हे सुद्धा स्पष्ट करा.

-पॅचअप करण्यासाठी एक्स पार्टनरला जबरदस्ती करु नका
ब्रेकअपनंतर काही लोक पॅचअप करण्यासाठी आपल्या एक्स पार्टनरला जबरदस्ती करतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला असे वाटते की, आपल्यावर दबाव टाकला जात आहे. असे होत असेल तर तुमचे पॅचअप कधीच होणार नाही. त्यामुळे असे करण्यापासून दूर रहा.(Relationship tip for patch up)

-अपशब्दांचा वापर करु नका
काही वेळेस तरुण-तरुणी रागात येऊन पार्टनरला वाट्टेल ते बोलतात. त्यामुळे त्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे ब्रेकअप जरी झाले तरीही अपशब्दांचा वापर करु नका. असे झाल्यास तुमचे पॅचअप कसे होईल?

-चुकीची कामे करण्यापासून दूर रहा
ब्रेकअपनंतर लोक चुकीचा मार्गांकडे वळतात. त्यामुळे तुमचे सुद्धा ब्रेकअप झाले असेल तर वेळ द्या. दारुची लत किंवा दुखभरी गाणी ऐकणे सोडून द्या. या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाचा वेळ फुकट जाईलच पण पार्टनर ही तुमच्याकडे पुन्हा परतण्याची शक्यता अधिक कमी होईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.