तुम्ही पार्टनरपासून हळूहळू वेगळे होत आहात आणि तुम्हाला याचा अंदाज सुद्धा नाही… तर तुम्ही काय कराल? हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. पण बहुतांशवेळा हे रिलेशनशिपमध्ये दिसून आले आहे. खासकरून नवरा-बायकोच्या नात्यात. खरंतर आपल्या आयुष्यात भावना आणि आत्मसन्मानाचे फार महत्त्व असते. नात्यात जर एकोपा असेल तर आयुष्य हे आनंदित जाते.(Relationship detachment)
नवरा-बायकोचे नाते सुद्धा असेच काहीसे असते. जे सुरुवातीला एकमेकांसोबत प्रेमाने आणि ईमानदारीने वागणे. पण नंतर एकटेपणा त्या नात्यात जाणवू लागतो. जेव्हा तुमचा पार्टनर हळूहळू तुमच्याशी बोलणे कमी करतो तेव्हा ऐकटेपणा वाटू लागतो. रिलेशनशिपमध्ये इमोशनल डिटॅचमेंटचे नक्की काय संकेत आहेत हे पाहूयात.
नात्यात डिटॅचमेंट महणजे काय?
असा व्यक्ती जो स्वत: ला आपल्या पार्टनरपासून आपण वेगळे झालो आहोत असे अनुभवतो. त्याचसोबत तो इमोशनल डिटॅचमेंटचा शिकार होतो. मनोवैज्ञानिक याला कोणताही आजार असे नाव देत नाही. पण जेव्हा एक व्यक्ती जेव्हा डिप्रेशनचा शिकार होतो तेव्हा त्याचे नाते आधीसारखे राहत नाही. भावनात्मक संबंध हे तुमच्या दररोजच्या आयुष्यावर, तुमच्या नात्यावर परिणाम करतात.
पार्टनरला तुमच्याशी काहीही घेणं-देणं नसणे
जेव्हा तुम्ही पार्टनरला दिवसभरात तुम्ही काय केले याबद्दल सांगत असता आणि पार्टनर त्याकडे जेव्हा दुर्लक्ष करतो तेव्हा समजून जा त्याला तुमच्यात अधिक इंटरेस्ट नाहीयं. याच वेळी जर तुम्ही पार्टनरशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न कराल तर तो तुमच्यापासून दूर जाईल.(Relationship detachment)
सेल्फ केअर महत्त्वाचे
जर पार्टनर तुमची जराही परवाह करत नसेल आणि त्याच्या गरजांना प्राथमिकता देत असेल तर समजून जा तुमच्या नात्यात सर्वकाही ठिक सुरु नाहीयं. नात्यात सर्व गोष्टी पार्टनरच्या आवडीनुसार होतात. त्याला काहीही फरक पडत नाही तुम्हाला कसे वाटत आहे.
इमोशनल डिटॅचमेंटपासून सेल्फ केअरसाठी काय करावे?
इमोशनल डिटॅचमेंटचा आपल्या नात्यावर सखोल परिणाम होतो. त्यामुळे यापासून दूर राहण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत कनेक्ट राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही पार्टनरला समोरुन काही गोष्टी सांगू शकत नसाल तर त्याला मेसेज करुन तुमच्या मनातील भावना सांगा. जेणेकरुन तुमचे मन हलके होईलच पण या समस्येपासूनही तुम्ही दूर रहाल.
हेही वाचा- ‘हे’ संकेत सांगतात तुम्ही चुकीच्या नात्यात आहात