जेव्हा एखादा आपला जवळचा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करतो तेव्हा आपल्याला वाईट वाटते. याबद्दल आपण खुप वेळ विचार करत राहतो की, त्यांनी आपल्याला ब्लॉक का केले आहे? काही लोक अशी सुद्धा असतात जे आपल्या मित्रपरिवाराला फोन करुन याबद्दल सांगतात किंवा स्टेटस अपलोड करतात. त्यामुळे लोक स्वत:हून त्यांना या बद्दल विचारतात. या व्यतिरिक्त काही लोक अशी असतात जे समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याआधीच त्यांना ब्लॉक करतात. पण असे करणे चुकीचे आहे. यामुळे काही गोष्टी बिघडू शकतात. अशातच आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्या तुमच्या कामी नक्की येतीलच. पण एखाद्याने सोशल मीडियात ब्लॉक केल्यानंतर ती स्थिती कशी हँन्डल करायची हे सुद्धा कळेल. (Relationship advice)
रिअॅक्शन देण्यापूर्वी खात्री करुन घ्या
जेव्हा आपल्याला वाटेल एखाद्याने सोशल मीडियात ब्लॉक केले आहे किंवा अनफ्रेंन्ड केलं आहे तेव्हा त्यावेळी कोणताही विचार न करता राग व्यक्त करु नका. असे केल्याने जे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ते कळणार नाही. ब्लॉक करण्यामागील नक्की कारणं काय हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर एखादी रिअॅक्शन देण्यापूर्वी खात्री करुन घ्या. यामागे काही कारणं सुद्धा असू शकतात.
संपर्क करण्याची वाट पहा
तुम्ही रिअॅक्शन देण्याऐवजी ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे तो तुम्हाला संपर्क करतोय का याची वाट पहा. जर तुमच्या दोघांमध्ये काही गैरसमज झाले असतील तर ते बातचीत करुन सोडवा.
बदला घेण्याची भावना मनात ठेवू नका
जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करेल तेव्हा आपल्या मनात त्याच्या बद्दल राग निर्माण होतो. त्या व्यक्तिबद्दल आपण नकारात्मक विचार करु लागते. जेव्हा अशी स्थिती निर्माण होतो तेव्हा असे काहीही करु नका ज्यामुळे तुमची इमेज डाऊन होईल. (Relationship advice)
हेही वाचा- ऐकटेपणामुळे येईल आजारपण, वेळीच सावरा
स्वत:हून बोलण्याचा प्रयत्न करा
एखाद्याने तुम्हाला ब्लॉक किंवा अनफ्रेंन्ड केल्यास आणि तुम्हाला त्या व्यक्तीशी नाते मोडायचे नसेल तर तुम्ही आधी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्याला दुखावले का याची सुद्धा खात्री करुन घ्या. यासाठी तु्म्ही तुमच्या क्लोज फ्रेंन्ड किंवा एखाद्या नातेवाईकाची मदत घेऊ शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्याने ब्लॉक केले तर त्याचा उल्लेख सर्वांसमोर करणे टाळा. तसेच यावरुन तुम्ही मोठा वाद ही करु नका.