Home » माहेरच्या व्यक्तींशी नवऱ्याचे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

माहेरच्या व्यक्तींशी नवऱ्याचे नातेसंबंध घट्ट करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

by Team Gajawaja
0 comment
Share

लग्नानंतर माहेरी नवं वधुचा फार आदर केला जातो. माहेरची मंडळी तिला आधीपेक्षा अधिक यावेळी आदर आणि प्रेम देतात. पण जेव्हा नवरा तिच्यासोबत माहेरी येतो तेव्हा त्याचे एखाद्या पाहुण्याप्रमाणे आदरातिथ्य केले जाते. त्याला सन्मान दिला जातो. परंतु माहेरच्या माणसांना नवऱ्याचा स्वभाव हा पूर्णपणे माहिती नसतो. त्यामुळेच ते कधीच मुलीच्या माहेरच्यांशी मोकळीकपणे रमत नाहीत. त्यामुळे नवऱ्याला माहेरच्या माणसांशी कसे जवळ आणावे याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. पण कधीकधी तो पूर्णपणे यशस्वी होत नाही. अशातच माहेरच्या व्यक्तींशी नवऱ्याचे नातेसंबंध कसे सुधारायचे याच संदर्भातील काही खास टीप्स पाहूयात. (Relationship advice)

-उघडपणे बोला
काही वेळेस नवऱ्याच्या मनात तुमच्या माहेरच्या मंडळींबद्दल काही चुकीची भावना किंवा गैरसमज निर्माण होतात. अशातच नवऱ्याशी उघडपणे आणि स्पष्टपणे या बद्दल दूर करा. त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तो तुमच्या माहेरच्या मंडळींसोबत अधिक जवळ येईल.

-नवऱ्याचे weakness बोलून दाखवू नका
काही महिला आपल्या नवऱ्याच्या केवळ चुका आणि त्यामध्ये काय उणिवा आहेत हे सांगत राहतात. यामुळेच माहेरच्या मंडळींच्या नजरेत नवऱ्याबद्दलची एक वेगळी इमेज तयार होत. यामुळे नवऱ्याच्या उणिवा कधीच सांगू नका. यामुळे माहेरची माणसं सुद्धा त्याला कधीच काही बोलणार नाहीत.

-चुगली करू नका
ही समस्या प्रत्येक घरात असते. सासरी होत असलेल्या या कारणामुळे बहुतांश महिला याबद्दल आपल्या माहेरी सांगतात. यामुळे सासरच्या मंडळींची इमेज बिघडते तर नवऱ्याबद्दल ही विचार बदलले जातात. त्यामुळे चुगली करू नका.

-नातेवाईकांचा आदर करा
जर तुम्हाला माहेरच्या मंडळींसह नवऱ्यासोबतचे नाते उत्तम बनवण्यासाठी तर सर्वात प्रथम सासरच्या मंडळींशी नातेसंबंध सुधारा. अशातच नवऱ्याच्या सर्व नातेवाईकांचा आदर करा. त्यामुळे तुमचा नवरा सुद्धा माहेरच्या मंडळींना पूर्ण आदर देईल. (Relationship advice)

हेही वाचा- नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर बायकोने असे सांभाळावे घर

या काही टीप्स तुम्ही लक्षात घेता तुम्ही नवऱ्याला माहेरच्या मंडळींसोबत नातेसंबंध उत्तम करण्यासाठी वापरू शकता. मात्र हे सुद्धा लक्षात ठेवा की, नात्यात विश्वास असेल आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची भावना असेल तर असे नाते दीर्घकाळ टिकते. याउलट नात्यात एकमेकांच्या घरातील परिवारातील मंडळींच्या चुका काढत राहिल्यास वाद अधिक वाढला जाईल. अशातच असे नाते फारकाळ टिकणार नाही. याच मुद्द्यावरुन तुमच्या नात्यात सतत वाद होत राहतील. नवरा तर माहेरच्या मंडळींचा आधीसारखा आदर ही करणार नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.