नातेसंबंध उत्तम करण्यासाठी आपल्याला कोण ना कोणतरी सल्ले देत असतात. असे करावे, तसे करू नये. त्यांचे हे सल्ले कधीकधी कामी येतात. परंतु ते नेहमीच कामी येतील असे नाही. यामुळे तुमचे नवऱ्यासोबतचे उत्तम संबंध बिघडू शकतात अथवा तुमचे नाते मोडले जाऊ शकते. अशा स्थितीपासून बचाव करण्यासाठी पुढील काही सल्ले जे नातेवाईक तुम्हाला देतात ते कधीच ऐकू नका. (Relationship advice)
मुलं जन्माला घाला सर्वकाही ठिक होईल
जेव्हा नात्यात वाद होत आहेत असे नातेवाईकांना कळले तर ते लगेच विविध सल्ले देऊ लागतात. अशातच ते असा सुद्धा सल्ला देतात की, मुलं जन्माला घाला तेव्हा सर्वकाही ठिक होईल. जबाबदाऱ्या आल्या की नातेसंबंध सुधारले जातात. मात्र खरंतर या सल्ल्यामुळे नात्यात दूरावा अधिक वाढू शकतो. मुलं कधी जन्माला घालायचे हा निर्णय एकमेकांनी घ्यायला हवा. ना नातेवाईकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार. त्यामुळे नातेवाईकांच्या या सल्ल्यावर डोळेबंद करून विश्वास ठेवू नका.
घरातील काम पुरुष मंडळींची नव्हे
जर नातेवाईक पुरुष मंडळींना घरातील कामे न करण्याचा सल्ला देत असतील हे अगदी चुकीचे आहे. अशातच नात्यात वाद होऊ शकतात. बायकोला कामात मदत केल्याने त्यांचा खालीपणा होत नाही.नेहमीच समजून घ्यावे की, नाते तुमच्या दोघांचे आहे. त्यामुळे एकमेकांना मदत जरूर करावी. तसेच तुमच्यामधील जे काही वाद आहेत ते नातेवाईकांना कधीच सांगू नयेत. (Relationship advice)
सेल्फ रिस्पेक्टसाठी खालीपणा नको
नातेवाईक तुम्हाला असा सुद्धा सल्ला देतात की, सेल्फ रिस्पेक्टसाठी कोणासमोर झुकू नको. अशा प्रकारच्या सल्ल्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. उलट नातेसंबंध यामुळे अधिक बिघडले जाऊ शकतात. लहान-लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते.
सासरच्या मंडळींपासून दूर रहा
जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत सासरच्या मंडळींबद्दल काही सांगत असाल तर ते तुम्हाला आधी सल्ला देतील की, त्यांच्यापासून वेगळे रहा. असे केल्याने सर्वकाही ठीक होईल. परंतु त्यांचा हा सल्ला तुमचे नातेसंबंध बिघडवू शकतो हे लक्षात ठेवा.
हेही वाचा- पार्टनर उदास असेल तर खुश करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी
नवऱ्याला कंट्रोल करण्यास शिक
कधीकधी नातेवाईक असा सल्ला देतात की, नवऱ्याला कंट्रोल करायला शिकले पाहिजे. मात्र असे कधीच करू नका. प्रत्येकाला आयुष्य जगण्याचा हक्क दिलेला असतो. त्यामुळे तु्म्ही कोणालाही कंट्रोल करू शकत नाही. असे करण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात वाद अधिक वाढले जाऊ शकतात.