सध्याच्या काळात तरुणांसह प्रत्येक वयोगटातील लोकांना गुंतवणूकासाठी खुप पर्यात आहेत. अशातच बहुतांश जण एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे पसंद करतात. कारण कमी वयात मोठ्या रक्कमेच्या संपत्तीत गुंतवणूक करणे एक स्मार्ट ऑप्शन आहे. व्यावसायिक किंवा स्थानिक संपत्तीत गेल्या काही वर्षांपासून उत्तम रिटर्न्स मिळत आहेत. त्यामुळे प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याला लोक पसंद करतात. आपल्या करियरची सुरुवात करणारे तरुण सुद्धा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतात आणि भविष्यात उत्तम रिटर्न्स मिळवतात. (Real estate investment)
प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत. त्यामध्ये घर-प्लॉट किंवा संपत्ती खरेदी करण्याव्यतिरिक्त खरेदी केल्याशिवाय ही अन्य माध्यमातून गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. तर जाणून घेऊयात रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे स्मार्ट पर्याट आणि कशा पद्धतीने कराल गुंतवणूकीची तयारी त्याबद्दल अधिक.
गुंतवणूक सल्लागारांशी वाढवा संपर्क
रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या सेक्टर आणि प्रॉपर्टी संदर्भातील अधिक माहिती असावी. त्यामुळे रियल इस्टेट सल्लागारांशी संपर्क करणे किंवा आपल्या नेटवर्कला वाढवणे उत्तम मार्ग असू शकतो. जेणेकरुन वेळोवेळी गुंतवणूक करण्यासंदर्भातील नव्या पर्यायांची माहिती मिळू शकते.
प्रॉपर्टी खरेदी करुन भाड्याने द्या
घर खरेदी करणे हे गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय आहे. मात्र तरुणांसाठी घर खरेदी करण्यासाठी मात्र डाऊन पेमेंट करावे लागते त्यासाठी पर्याप्त पैसे जमा करणे हे एक आव्हानच आहे. मात्र जेव्हा तुम्ही एकदा का घराचे मालक होता तेव्हा तुम्ही ती संपत्ती एका रुपाने भाड्याने सुद्धा देऊन कमाई करु शकता.
प्रॉपर्टी खरेदी करण्याशिवाय करा गुंतवणूक
घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याऐवजी अचल संपत्तीत गुंतवणूक करण्याचे अन्य काही ऑप्शन आहेत. ज्याचा तरुण गुंतवणूकीसाठी लाभ घेऊ शकतात. हे आकर्षक आणि सोप्पे आहे, कारण बहुतांश तरुणांकडे घर खरेदी करण्यासाठी एक रक्कमी पैसे नसतात. आरईआईटी, रियल इस्टेट फंड किंवा मॉर्गेज बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही उत्तम रिटर्न्स मिळवू शकता. (Real estate investment)
हे देखील वाचा- ७००० कोटींची कंपनी खरेदी करण्यासाठी नकार देणाऱ्या जयंती चौहान आहेत कोण?
पोर्टफोलियओ करा डाइवर्सीफाय
तरुण गुंतवणूकदार कर्मशियल, रिटेल आणि रेसिडेंशियल अचल संपत्तीत गुंतवणूक करण्यासाठी पोर्टफोलिओत विविधता आणली पाहिजे. कर्मशियल रियल इस्टेट रिटर्नच्या प्रकरणी रेसिडेंन्शियल प्रॉपर्टीजला मात देण्यासाठी ओळखले जातात. परंतु रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी रिसर्च करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन गुंतवणूक करणे मुश्किल होणार नाही. पण तरुण जेवढ्या लवकर गुंतवणूक करतील तेवढ्या दीर्घकाळासाठी उत्तम रिटर्न मिळण्याची शक्यता वाढते.