१९७३ साली अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया भादुरी (Jaya Bhaduri) यांचा एक चित्रपट आला होता ‘अभिमान’ ! या चित्रपटात दोघेही गायक असतात. यात अमिताभ यांचं नाव सुबीर होत आणि जया भादुरींचं नाव उमा. उमा ही सुबीरपेक्षा उत्तम गात असते. दोघे जेव्हा एकत्र गाणी गातात, तेव्हा उमाची जास्त प्रशंसा होत असते, तिचे हजारो FANS तयार होतात. मात्र यामुळे सुबीरच्या मनात ईर्ष्या निर्माण होते. तिचं यश बघून सुबीर अस्वस्थ होतो. भांडण होतात आणि दोघे नंतर एकमेकांपासून दूरू होतात. आता ही गोष्ट तशी फिल्मी जरी वाटत असली तरी भारताच्या एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यात घडलेली खरी गोष्ट आहे, त्यांचं नाव पंडित रवि शंकर ! (Pandit Ravi Shankar)
रवि शंकर यांची पहिली पत्नी अन्नपूर्णा देवी त्यांचं मूळ नाव रोशनारा खान ! असं म्हणतात, त्यांच्या रुपात एका मुस्लीम घरात साक्षात सरस्वतीनेच जन्म घेतला होता. पण रवि शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यात ताटातूट का झाली ? दोघांच्या खाजगी आयुष्यात आणि संगीतविश्वात नेमकं काय घडलं होत, जाणून घेऊया. (Social News)
पंडित रवि शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांचं लग्न १९४१ साली झालं होतं. अन्नपूर्णा या प्रसिद्ध सरोद वादक अलाउद्दीन खान यांच्या कन्या आपल्या वडिलांचा हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिकचा वारसा पुढे चालवत त्या सूरबहार हे वाद्य वाजवण्यात पारंगत झाल्या. मुळात सूरबहार हे वाद्य सितारपेक्षा वजन आणि वाजवायला कठीण असतं. मध्य प्रदेशच्या मैहर येथील आश्रमात ते आपल्या संगीताची तालीम द्यायचे. याच तालमीत रवि शंकरसुद्धा आपल्या सतार वादनासाठी आले. ज्यावेळी रविशंकर त्याठिकाणी आले होते, तेव्हा अन्नपूर्णा १३ वर्षांच्या होत्या. रविशंकर यांचे भाऊ उदय शंकर हे प्रसिद्ध नर्तक होते. त्यांनीच रोशनारा म्हणजे अन्नपूर्णा यांचं लग्न रविशंकर यांच्याशी जुळवून दिल आणि लग्नानंतर त्या हिंदू झाल्या. (Pandit Ravi Shankar)
यानंतर रवि शंकर सितार आणि अन्नपूर्णा या सूरबहार असे वाद्य घेऊन एकत्र परफॉर्म करायला लागले. मात्र सेलेब्रिटी झाल्यानंतर आपली पब्लिक लाईफ सांभाळण्यात त्यांना अनेक समस्या येऊ लागल्या. अन्नपूर्णा हे नातं टिकवण्याचा पुरेपूर प्रयतन करतच होत्या. अन्नपूर्णा यांना मिळणारी प्रसिद्धी रवि शंकर यांना खटकत होती. असं म्हटलं जात की, जेव्हा दोघे परफॉर्म करायचे, तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर लोकांचा घोळका अन्नपूर्णा यांच्याभोवती असायचा. त्यांचीच FAN FOLLOWING सर्वाधिक होती. रसिक त्यांचेच ऑटोग्राफ जास्त घेत होते. अन्नपूर्णा जीनियस होती, असं सगळेच म्हणायचे. यामुळे रविशंकर यांच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. याच कारणामुळे दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. (Social News)
यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रविशंकर यांचा मान राखण्यासाठी अन्नपूर्णा देवी यांनी एक निर्णय घेतला. १९५६ साली त्यांच्यातला वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी सरस्वती देवीच्या समोरच शपथ घेतली की, मी यापुढे कधीही पब्लिक PERFORMANCE करणार नाही. आणि त्या आपल्या शब्दावर अखेरपर्यंत ठाम राहिल्या. यानंतर रवि शंकर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडले, त्या म्हणजे सुकन्या राजन अन्नपूर्णा आणि रविशंकर यांचा एक मुलगाही होता, त्याचं नाव शुभेंद्र शंकर तो जन्मापासून कमजोर होता. दोघांच्या वादात त्याची योग्य काळजी घेतली गेली नाही. तो सितार आणि नृत्य शिकला, पण १९९२ साली त्याचं निधन झालं.रवि शंकर अन्नपूर्णा यांना सोडून अमेरिकेला गेले. त्यामुळे अन्नपूर्णानेही आपला एक शिष्य ऋषीकुमार पांड्यासोबत लग्न केलं. तर रवि शंकर आणि सुकन्या लग्नबंधनात अडकले. रवि शंकर आणि अन्नपूर्णा यांची शेवटची भेट होती १९८८ ची यानंतर दोघे कधीही एकमेकांना भेटले नाहीत. या संपूर्ण काळात रवि शंकर यांना जगभरात भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण अन्नपूर्णा यांचं TALENT झाकलं गेलं, ते कायमचं. (Pandit Ravi Shankar)
=======
हे देखील वाचा : Paper Mache : काश्मिरच्या कलाकारांची कला जगभर
Coconut Oil : आणि खोबरेल तेलाचे कोडे सुटले !
=======
पण त्यांनी संगीताची तालीम देण सुरूच ठेवलं. नंतर त्यांच्या तालमीत पंडित हरिप्रसाद चौरासिया, निखील BANERJEE, नित्यानंद हल्दीपूर, अमित रॉय असे अनेक दिग्गज तयार झाले. २०१८ साली वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचं निधन झाल. रवि शंकर यांनी जरी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नेलं असलं तरी अन्नपूर्णा देवी यांच्या संगीत सोडल्यामुळे भारताच्या संगीत क्षेत्राला जे नुकसान झालं, त्याची भरपाई कदाचित कधीच होऊ शकणार नाही. (Social News)