कोकणातील दापोली आणि खेडला जोडणाऱ्या सीमेवर एका किल्ला आढळला आहे. रामगड असे या किल्ल्याचे नाव असून दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी त्याचा शोध लावला आहे. दापोलीतील पालगड या गावाच्या पूर्वेस दापोली-खेड याच्या सीमेवर समुद्र सपाटीपासून हा किल्ला जवळजवळ ३९० मीटर उंचीवर वसला आहे. रामगड किल्ल्याच्या शोधामुळे इतिहासातील आणखी पानं उलगडली जाणार असल्याचे बोलले जात आहे.(Ratnagiri Ramgad Fort)
खोटेखानी असलेल्या या रामगड किल्ल्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तर वास्तुरचनेच्या शास्रीय पुराव्यानुसार रामगड हा अपरिचित दुर्ग असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. या किल्ल्याचे सॅटेलाइट फोटो सुद्धा काढले गेले आहेत. या फोटोंमधून त्याच्या बांधकामाचे काही अवशेष ही मिळाले आहेत.
रामगड हा घेरापालगडचा जोडकिल्ला असल्याने आजपर्यंत त्याचे स्थान नक्की कुठे आहे हे कळले नव्हते. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. त्यामधील पहिला किल्ला हा सिंधुदुर्ग येथील देवगड येथे आहे. तर आता हा दुसरा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आढळून आला आहे. घेरापालगडासोबत हा किल्ला सुद्धा बांधला गेला असावा असा अंजाद व्यक्त केला जात आहे. या किल्ल्याचे उल्लेख इ.स. १७२८ पासून असल्याचे आढळून येते.किल्ल्याच्या सर्वेक्षणात रामगड किल्ल्याचा दरवाजा, त्याला असलेले दोन संरक्षक बुरुज, तटबंदीतील चार बुरुजांसह इमारतींचे अवशेष, काही थडगी, भांड्यांचे तुकडे सापडले आहेत. किल्ल्याचा तटबंदी आणि दरवाजा पूर्णपणे ढासळला गेला आहे.
रामगडाचा किल्ल्याचा उल्लेख घेरापालगड सोबत झाला असून तो रामदुर्ग असा येतो. रत्नागिरीतील रामगड सिद्दीच्या ताब्यात असावा आणि तो सिद्दीवरील मोहिमेत परिसरातील रसाळगडासोबत पेशव्यांच्या ताब्यात आला असावा असे एका पत्रातून समजते. हे पत्र १८१८ मधील असल्याचे सांगितले जात आहे.(Ratnagiri Ramgad Fort)
हे देखील वाचा- काश्मिरमध्ये पुन्हा ‘शारदा माता मंदिरात’ भाविकांचा जयघोष
रामगड किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली असेल याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. परंतु पालगडासोबत हा किल्ला बांधला गेला असावा असा अंदाज संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी म्हटले आहे. तसेच गावकऱ्यांशी याबद्दल बोलल्यानंतर त्यांना या किल्ल्याबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यांनी संदीप परांजपे यांना दुसरा गड दाखवला. त्यासंदर्भात अधिक सखोल संदर्भ जोडले आणि प्रत्यक्ष जेव्हा पाहिल्यानंतर मिळालेल्या शास्रीय पुराव्यांच्या आधारे रामगड हा दुर्ग असल्याचे समोर आले.