सूर्यदेवाच्या पूजेसाठी माघ महिना खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात रथसप्तमीचा महत्त्वाचा सण साजरा केला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. यावर्षी रथसप्तमी ही २५ जानेवारी रविवार रोजी साजरी होत आहे. या दिवशी भगवान सूर्याला सकाळी अर्घ्य दिले जाते. रथसप्तमीचा दिवस हा मकरसंक्रांतीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे रूप आहे. धार्मिक मान्यतेनुसार सप्तमी तिथीला सूर्य देवाचा अवतार प्रकट झाला होता म्हणून रथ सप्तमीचा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस सूर्य जयंती म्हणून देखील साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी राहाते. (Ratha Sapatmi)
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्याची पूजा केल्याने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. शिवाय रथसप्तमीला काही जण आरोग्य सप्तमी, माघ जयंती, अर्क सप्तमी, पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती आदी नावांनी देखील ओळखले जाते. मकर संक्रांतीपासून महिला हळदीकुंक करून विविध प्रकारचे वाण एकमेकींना देतात. हे हळदू कुंकू मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे. या दिवशी महाराष्ट्रामध्ये दूध ओतू घालण्याची देखील प्रथा आहे. महाराष्ट्रासोबतच देशातील इतर राज्यांमध्ये देखील रथसप्तमीला सण साजरा केला जातो. (Marathi)
बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात. उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावांनी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात देखील रथसप्तमीला हा सण खूप आनंदाने साजरा होतो. संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसांचे विशेष महत्व आहे. सूर्याची उपासना पूजा या दिवशी करण्याचे महत्त्व आहे. दक्षिण भारतातील समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन “ब्रह्मोत्सव” साजरा केला जातो. दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो. भारताचे विविध प्रांत बिहार,झारखंड,ओडिसा, मध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. (Todays Marathi HEadline)

माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात. अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. (Latest Marathi News)
सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणार्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. `रथसप्तमी’ ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. (Top Marathi Headline)
रथसप्तमी या दिवसाला वैज्ञानिकदृष्ट्या देखील मोठे महत्व देखील आहे. रथसप्तमीपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थात पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असताना, जेव्हा पृथ्वीची उत्तर धृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा त्याला उत्तरायण म्हटले जाते. उत्तरायण हे साधारणपणे दरवर्षी २१ मार्च ते २१ जूनपर्यंत असते. आणि दक्षिणायन हे २२ सप्टेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत असते. रथसप्तमीपासून वातावरणात देखील बदल होतात. थंडी कमी होऊन हळूहळू तापमान वाढायला लागते आणि वसंत ऋतूची सुरुवात होते. (Top Stories)
एका पौराणिक कथेनुसार, स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती. मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल? “म्हणून त्यांनी देवाला विचारले.” तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले, त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात. याचा अर्थ ‘सात घोड्यांचा रथ’ असा होतो. (Top Trending News)
========
Rathsaptami : सूर्य देवांच्या उपासनेचा दिवस असलेली रथसप्तमी कधी आहे?
Vasant Panchami : देवी सरस्वतीला समर्पित असलेली वसंत पंचमी कधी आहे?
========
सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात. रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात. रथसप्तमीचे महत्व रथसप्तमीला सूर्याची पूजा केल्याने शाश्वत फळ मिळते. तसेच सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात. या दिवशी सूर्याकडे पाहून सूर्याची स्तुती केल्याने त्वचारोग दूर होतात आणि दृष्टी सुधारते. हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने केल्याने पिता-पुत्रांमध्ये प्रेम टिकून राहते. (Social News)
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
