Home » रामलल्लाच्या दागिन्यांवर दुर्मिळ हिरे माणिक

रामलल्लाच्या दागिन्यांवर दुर्मिळ हिरे माणिक

by Team Gajawaja
0 comment
Ramlalla Jewellery
Share

अयोध्येमधील भव्य मंदिरात भगवान राम विराजमान झाले आहेत. बालरुपातील भगवान रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी होत आहे.  रामलल्लांच्या चेह-यावरील मधुर हास्य बघून तासंनतास रांगेत उभे राहिलेल्या रामभक्तांना मोठा आनंद होत आहे. प्रभू रामांचे हे अलौकीक सौदर्य बघण्यासाठी असेच लाखो भक्त रोज अयोध्यनगरीत दाखल होत आहेत.  या रामभक्तांमध्ये प्रभू रामांच्या रुपाची चर्चा होत आहे.  प्रभू रामांना घालण्यात आलेले कपडे आणि  दागिनेही यांचीही चर्चाही आता होत आहे. (Ramlalla Jewellery)

रामलल्लांना घालण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये अनेक मौल्यवान हिरे, मोती, माणिक, सोने यांचा वापर करण्यात आला आहे.  तब्बल 15 किलो सोने, 18.5 हजार नैसर्गिक हिरे, 3.5 हजार माणिक आणि 600 पाचूपासून हे दागिने बनवण्यात आले आहे.  रामांसाठी विशेष करुन पन्नाचे खडे मागवण्यात आले होते.  हे सर्व दागिने आपल्या हातांनी तयार करण्याचे भाग्य लखौनोमधील हरसहयमल श्यामलाल ज्वेलर्स यांना मिळाले.  रामायणाचा अभ्यास करुन त्यांनी हे दागिने तयार केले आहेत.  दिल्लीमधील डिझायनर मनीष त्रिपाठी यांनी रामलल्लांच्या कपड्यांचे काम केले.  त्यानुसारच रामलल्लांचे दागिनेही ठरवण्यात आले आहेत.  (Ramlalla Jewellery)

22 जानेवारी रोजी दुपारी 12: 30 नंतर रामलल्लांचे रुप करोडो रामभक्तांपुढे आले, आणि सर्वांचेच डोळे आनंदाश्रूंनी भरुन गेले.  रामलल्लांच्या चेह-यावरील मंद हास्यानं सर्वांचीच मने जिंकली.  रामाचे ह मनमोहक रुप आणि त्याला असलेली दागिन्यांची साथ यांची चर्चा सर्वत्र आहे.  प्रभू रामांसाठी दागिने तयार करण्याचे भाग्य मिळाले ते, लखौनोच्या  हरसहैमल श्यामलाल ज्वेलर्स यांना.   श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे 1 जानेवारीला या ज्वेलर्सचे अंकुर अग्रवाल यांच्याबरोबर संवाद साधला.  ते स्वतः श्रीमद्वाल्मिकी, श्रीरामचरितमानस आणि प्रभू  रामावरील पौराणिक ग्रंथाचे अभ्यासक आहेत.  त्यांनी केलेल्या संशोधनाचा वापर या दागिन्यांचे डिझाईन करण्यासाठी झाला.

रामायणातील भगवान रामाचे जे वर्णन तयार केले आहे, तसेच दागिन्यांचे डिझाईन त्यांनी तयार केले होते.  रामजन्मभूमी ट्रस्टने त्याला मान्यता देऊन अगदी पंधरा दिवसांच्या मुदतीत हे दागिने करण्याचे आव्हान दिले.  प्रभू रामांवरील नितांत श्रद्धेमुळे अग्रवाल यांनी हे आव्हान स्विकारले, आणि मनमोहक दागिन्यांनी प्रभू रामांना सजवले.  (Ramlalla Jewellery)

या दागिन्यांमध्ये डोक्याचा मुकुट, हार, कपाळावरचा टिळक, अंगठी, कंबरेची पट्टी, हातातील बांगड्या आणि कानातल्या कुड्या यांच्या समावेश आहे.  शिवाय भविष्यात होणा-या अनेक सणांसाठी वेगवेगळे दागिनेही तयार करण्यात येणार आहेत.  श्यामलाल ज्वेलर्सचे अंकुर अग्रवाल यांनी 12 दिवसात हे सर्व दागिने तयार केले.   यातील सर्वात मोठा दागिना म्हणजे, रामलल्लांचा मुकूट.  हा मुकुट खूप अप्रतिम आहे.

या मुकुटासाठी 1 किलो 700 ग्रॅम सोन्याचा वापर झाला आहे.  मुकुटात 75 कॅरेट हिरा, 175 कॅरेट पन्ना, 262 कॅरेट माणिक आणि माणिक आहे. प्रभू राम हे सूर्यवंशी आहेत. सूर्यवंशी यांचे प्रतिक म्हणून मुकुटात सूर्याचे चिन्हही लावण्यात आले असून दोन हिरे बसवण्यात आले आहेत. मुकुटात मोर आणि मासेही बनवण्यात आले आहेत. मुकुटाला तीन पंखे आणि मध्यभागी एक मोठा पन्ना आहे.  मुकुटात 75 कॅरेटचे हिरे जडवलेले आहेत. 262 कॅरेट रुबी बसवले आहे. याशिवाय 135 कॅरेट झांबियन एमराल्ड म्हणजेच जगातील दुर्मिळ पन्ना बसवण्यात आला आहे.  

याशिवाय प्रभू रामांच्या माथ्यावरील टिळक 16 ग्रॅम सोन्याचा आहे. त्याच्य मध्यभागी तीन कॅरेटचे हिरे आणि दोन्ही बाजूला सुमारे 10 हिरे आहेत. या टिळकाच्या मध्यभागी एक विशेष माणिक आहे.  याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, रामनवमीच्या दिवशी ठीक 12 वाजता सूर्याची किरणे खालून टिळकांवर येतील आणि पुढील 5 मिनिटांत वरच्या दिशेने मुकुटाकडे सरकतील.  त्यावेळी सर्व गर्भगृहात या हि-यांची किरणे पसरणार आहेत.  

रामलल्लाच्या बोटांवर पन्नाची अंगठी आहे. या अंगठीचे वजन अंदाजे 65 ग्रॅम आहे. त्याच्या उजव्या हातात 26 ग्रॅम सोन्याची अंगठीही आहे. रामललाच्या गळ्यात सोन्याची विजयमालाही घातली आहे.  विजयमाला रामांच्या मानेपासून पायापर्यंत आहे.  विजयमालेवर वैष्णव परंपरेतील सर्व शुभ चिन्हे आहेत.  त्यामध्ये सुदर्शन चक्र, पद्मपुष्म, शंख आणि मंगल-कलश यांचा समावेश आहे.   रामलल्लांच्या गळ्यातील दुस-या एका हारमध्ये 500 ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.  त्यात  सुमारे 150 कॅरेट माणिक आणि 380 कॅरेट पाचू जडवले गेले आहेत. हाराच्या मध्यभागी सूर्यवंशाचे प्रतीक आहे. सूर्यदेवाचे रत्न असलेल्या चिन्हाच्या मध्यभागी रुबी आहे.  (Ramlalla Jewellery)

=============

हे देखील वाचा : अमृता राव ते तनुश्री दत्तांसह या कलाकारांनी घेतलाय बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय 

=============

रामलल्लांचा कमरपट्टा हा  750 ग्रॅम सोने आणि  70 कॅरेट हिरे आणि 850 कॅरेट,  माणिक आणि पन्ना यांच्यापासून तयार झाला आहे.  या कपमपट्ट्याला पाच अगदी नाजूक घंटा लावण्यात आल्या आहेत. माणिक आणि मोत्यांच्या सहाय्यांनं हा पाच घंटांचा झुमका कमरपट्ट्याची शोभा वाढवित आहे.  रामलल्लांचे धनुष्य आणि बाणही सोन्याचे आहेत.  त्यासाठी 1 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे.(Ramlalla Jewellery)

रामलल्लांना पहिल्या दिवशी 14 दागिने घालण्यात आले होते.  त्यासाठी अडीच तास लागले.  आता रामनवमीच्या दिवशीही रामलल्लांचा खास शृंगार करण्यात येणार आहेत.  

सई बने 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.