Home » कधीही न मावळणारं फुल दीपिकाला देण्यासाठी रणवीरने केलं भलतंच  साहस…

कधीही न मावळणारं फुल दीपिकाला देण्यासाठी रणवीरने केलं भलतंच  साहस…

by Team Gajawaja
0 comment
Ranveer vs. Wild With Bear Grylls
Share

प्रेमात पडल्यावर आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब दिला की, प्रेमाची कबूली दिली असे मानण्यात येते. पण अभिनेता रणवीर सिंगची मात्र गोष्टच वेगळी आहे. तो कपड्यांच्या बाबतीत हटके फॅशन करतो, तर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी काही हटके करणारच ना?
रणवीर त्याच्या पत्नीवर, दीपिकावर जीवापाड प्रेम करतो. आपल्या लाडक्या बायकोला एक खास फूल देण्यासाठी रणवीरनं एक मोठं साहस केलं आहे. हे फुल मिळवण्यासाठी चक्क कोल्ह्यांबरोबर, अस्वलांबरोबर लढला, खोल दऱ्यांमध्ये फिरला आणि उंच कड्यांवर चढला..हे फूलही खूप खास आहे. कारण ते कधीच मावळत नाही.(Ranveer vs. Wild With Bear Grylls)


रणवीरच्या म्हणण्यानुसार त्याचं दीपिकावर खूप प्रेम आहे आणि ते कधीच कमी होणार नाही. हे खास फूल रणवीरला कुठे मिळालं आणि त्यासाठी त्यांनी काय काय पराक्रम केला, हे आपल्यालाही पहाता येणार आहे. रणवीर सिंग आता बेअर ग्रिल्ससोबत, ‘रणवीर वर्सेस वाइल्ड विथ बीयर ग्रिल्स’ या शोमध्ये येत आहे. या शोचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्यावर रणवीरच्या चाहत्यांचा लाईक्सचा पाऊस पडत आहे(Ranveer vs. Wild With Bear Grylls)


बेअर ग्रिल्सच्या प्रसिद्ध कार्यक्रमामध्ये मध्ये रणवीर सिंग सहभागी झाला आहे. या कार्यक्रमाचा ट्रेलर नेटफ्लिक्सने रिलीज केला आहे. या कार्यक्रमामध्ये रणवीर एकापेक्षा एक साहस करताना दिसणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सिंगापूरपासून होणार आहे. यात रणवीर जबरदस्त स्टंट करत अस्वल, कोल्हे तर कधी अतिशय विषारी सापांचा सामना करणार आहे. खोल गुहेत जाणार आहे. हे सर्व रणवीर आपल्या प्रिय पत्नीला, दिपिकाला एक फूल देण्यासाठी करणार आहे.(Ranveer vs. Wild With Bear Grylls)

या फुलाची खासीयत म्हणजे ते कधीच मावळत नाही. याबद्दल रणवीर सांगतो, लोक आपल्या प्रेमिकेला चंद्र-तारे देण्याचे आश्वासन देतात. मी दीपिकासाठी एक फूल आणणार आहे. हे फुल माझ्या प्रेमासारखे आहे, ते कधीही मावळणार नाही.
या ट्रेलरमध्ये रणवीरने कार्यक्रमामध्ये ज्या अतरंगी गोष्टी केल्या आहेत, त्याची झलक दिसते. रणवीर उत्साहाने माती उचलून डोक्याला लावतो, पण बेअर ती माती नसून अस्वलाची विष्ठा असल्याचे सांगतो, तेव्हा रणवीरचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे.(Ranveer vs. Wild With Bear Grylls)

====

हे देखील वाचा – वाटलं नव्हतं रणदीप येईल; पण तो आला आणि त्याने त्या प्रसंगातही सर्वांची मनं जिंकली.. 

====

रणबीर बेअरबरोबर बोलताना ‘बंबय्या’ हिंदीचा पुरेपुर वापर करतोय. कड्यावर चढताना तो बेअरकडून जय बजरंग बलीही बोलून घेतोय. नेटफ्लिकस्चा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ हा टॉप रेटींगचा कार्यक्रम आहे. 8 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रणवीरचा ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ हा अंदाज बघता येणार आहे. (Ranveer vs. Wild With Bear Grylls)

बेअर ग्रिल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीही एका शोमध्ये सहभागी झाले होते. यासह विक्की कौशल, अजय देवगण, अक्षय कुमार, रजनीकांत यासारख्या अभिनेत्यांनीही शोमध्ये भाग घेतला आहे. आता रणवीर अजून काय काय करतोय हे बघायचं तर 8 जुलैपर्यंत वाट बघायला हवी.

-सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.