अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं एका भारतीय विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला, त्या व्हिडिओची कॅप्शन वाचून सर्वत्र खळबळ उडाली आहे. तिनं स्वतःहून अमेरिका सोडली. अशा कुठल्याही व्यक्तिला अमेरिकेमध्ये थारा नाही, ज्याची विचारसरणी अतिरेकी असेल, असे लिहून जो व्हिडिओ अमेरिकेनं शेअर केला आहे, ती विद्यार्थिनी भारतीय आहे, आणि उच्चविद्याविभूषीत आहे. या विद्यार्थिनीचे नाव आहे, रंजना श्रीनिवासन. रंजना ही अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पीएचडी करत असल्याची माहिती आहे. मात्र रंजना काही अतिरेकी विचारसरणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आली असून ती हमासची समर्थक असल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं केला आहे. (Ranjana Srinivasan)
गेल्यावर्षी कोलंबिया विद्यापीठात केलेल्या आंदोलनात पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. या आंदोलनात विद्यापीठाचे मोठे नुकसान झाले होते. या विद्यार्थ्यांवर त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र आता अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यावर कोलंबिया विद्यापीठातील हमास समर्थक विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय कोलंबिया विद्यापीठातील प्रशासनावरही कारवाई सुरु झाली असून अमेरिकन सरकारकडून देण्यात येणारी मदत थांबवण्यात आली आहे. या सर्वात भारतीय विद्यार्थिनी रंजना श्रीनिवासन ही चर्चेत आली आहे. रंजना ही कोलंबिया विद्यापीठातील या हमास समर्थकांच्या संपर्कात होती, आणि तिथे झालेल्या आंदोलनात तिची प्रमुख भूमिका होती. ही रंजना श्रीवास्तव आता अमेरिका सोडून भारतात आली आहे का, याची विचारणा कऱण्यात येत आहे. शिवाय भारतात आल्यावरही रंजना तिच्या हमास समर्थकाच्याच भूमिकेवर ठाम रहाणार असेल, तर भारत सरकार या बाबत काय भूमिका घेणार हा प्रश्नही विचारण्यात येत आहे.
हमास ही पॅलेस्टिनी भूभागातील सर्वात प्रमुख इस्लामिक अतिरेकी संघटना आहे. इस्रायलच्या विरोधात ही संघटना लढत आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला करुन 1200 इस्रायली नागरिकांना ठार मारले. शिवाय 250 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले. यात या दहशतवाद्यांनी अनेक तरुणींवर अत्याचार करत त्यांची हत्याही केली आहे. तेव्हापासून इस्रायलनं गाझापट्टीवर आक्रमण सुरु केले आहे. या सर्वाविरोधात हमास समर्थकांनी अमेरिका, युरोपमध्ये आंदोलन सुरु केले. त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. कोलंबिया या विद्यालयात झालेल्या आंदोलनानं जगाचं लक्ष वेधलं गेलं. या आंदोलनात विद्यापीठातील हॅमिल्टन हॉलवर ताबा घेत हॅमिल्टन हॉलचे नाव बदलून हिंद हॉल असे ठेवण्यात आले. (Ranjana Srinivasan)
गाझामध्ये रहाणारी हिंद ही सहा वर्षाची मुलगी युद्धात मरण पावली, तिचे नाव विद्यार्थ्यांनी या हॉलला दिले. या सर्व प्रकाराची कोलंबिया विद्यापीठाच्या न्यायिक मंडळाने चौकशी करत आरोपी विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली आहे. यामध्ये अन्यही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना अमेरिकेच्या बाहेर काढण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थिनीही असल्यामुळे भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. रंजना हिचा व्हिसा रद्द करण्यात आला. याची माहिती मिळतात रंजनाने अमेरिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिचा एअरपोर्टवरील व्हिडिओ अमेरिकन परराष्ट्र विभागानं जाहीर करत आम्हाला रंजना स्वतःहून निघून गेल्याचा आनंद आहे. अशीच विचारसरणी असलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे अमेरिकेत थारा नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या सर्वातून रंजना श्रीनिवासन अमेरिका सोडून कुठे गेली हा प्रश्न विचारण्यात येत आहे. (International News)
=============
हे देखील वाचा : Atal Bihari Vajpayee : अटलजी आणि ८०० मेंढया?
Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?
=============
रंजना ही भारतीय नागरिक आहे. अमेरिका सोडून ती भारतात आली का, हा प्रश्न आहे. मात्र हमासच्या विचारानं प्रेरित असलेल्या रंजनाने भारतातही हमासला समर्थन दिल्यास तिच्याविरोधात काय कारवाई करता येईल, असे प्रश्न सोशल मिडियावर विचारले जात आहेत. रंजना श्रीनिवासनची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम आहे. तिने कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ आर्किटेक्चर, प्लॅनिंग अँड प्रिझर्वेशनमधून शहरी नियोजनात एम.फिल पदवी घेतली आहे. तसेच रंजनाने हार्वर्ड विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइनमधून मास्टर ऑफ डिझाइन आणि सीईपीटी विद्यापीठातून बॅचलर ऑफ डिझाइनची पदवी घेतली आहे. रंजना सध्या कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेट करत होती. तिला अमेरिकेत एफ-1 विद्यार्थी व्हिसावर प्रवेश देण्यात आला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 5 मार्च रोजी तिचा व्हिसा रद्द केला. 11 मार्च रोजी रंजनी स्वतःहून अमेरिकेतून बाहेर पडली, तसा तिचा व्हिडिओच शेअर करण्यात आला आहे. आता ही रंजना नेमकी अमेरिका सोडून कुठे गेली, याचा शोध सुरु आहे. (Ranjana Srinivasan)
सई बने