Home » रंगीला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत

रंगीला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत

by Team Gajawaja
0 comment
Shyam Rangeela
Share

देशभरात सूर्याचा पारा जसा चढलेला आहे, तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचीही मोठी रणधुमाळी उडालेली आहे. या लोकसभेमध्ये काही मतदारसंघ हे प्रतिष्ठित झाले आहेत. त्यातला प्रमुख मतदारसंघ म्हणजे, वाराणसी. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बिनविरोध निवडून देण्यात मानस वाराणसी मतदारसंघात व्यक्त होत असतांनाच एक नाव पुढे आले आहे ते म्हणजे, श्याम रंगीला याचे.  स्टँड अप कॉमेडियन असलेला श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्याच्या कॉमेडीमधून नक्कल करीत असतो. (Shyam Rangeela)

स्वतः श्याम रंगीलानं यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन ही माहिती दिली आहे.  श्याम रंगीलानं या व्हिडिओमध्ये मोदींच्या आवाजाची नक्कल करत मी मोदींना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. वाराणसीच्या नागरिकांची इच्छा आहे, म्हणूनच या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगून श्याम रंगीलानं लोकांकडेच पैशाची मागणी केली आहे.  मला पैशाची मदत करा मगच मी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवेन अशी त्याने गळही घातली आहे.  काहीही करुन प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा जे प्रयत्न करतात, त्यापैकीच एक नाव म्हणजे, श्याम रंगीला आहे. 

स्टॅंडअप कॉमेडीच्या नावावर या रंगीलानं पंतप्रधान मोदींची नक्कल केली, त्यांच्यावर टीका केली. फारकाय दिल्लीचे मुख्यमंत्री, अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आपमध्येही प्रवेश केला. आता हाच रंगीला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. यामागे त्याचा उद्देश फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे.  (Shyam Rangeela)

स्टँडअप कॉमेडियन श्याम रंगीलाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यावर हा रंगीला म्हणजे कोण, याचा प्रश्न पडला. हा रंगीला नावारुपाला आला तोच नरेंद्र मोदी यांच्या आधाराने. राजस्थानमधील हनुमान गड येथील रहिवासी असलेला श्याम रंगीला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीसाठी ओळखला जातो. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा आपली ओळख निर्माण केली. 

श्याम रंगीलाने कॉमेडी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाचा फायदा घेतला. त्यांच्यासारखीच बोलण्याची लकब आणि हावभाव करत त्यांनी मोदींची मिमिक्री करण्यास सुरुवात केली. पेट्रोलचे वाढलेले दर, पीएम मोदींची जंगल सफारी, श्याम रंगीला मोरांना चारतानाचे व्हिडिओ अशातून रंगीलानं मोदीची नक्कल करत लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्याला लोकप्रियतेपेक्षा अनेकवेळा टिकेलाच सामोरे जावे लागले आहे. (Shyam Rangeela)  

जयपूर वनविभागानं याच श्याम रंगीलाला वनसफारीमध्ये नियम मोडण्यासाठी ११ हजारांचा दंड ठोकला आहे. यावेळीही तो पंतप्रधानांची नक्कल करणारा व्हिडिओ करत होता. या व्हिडिओत त्यांनी जंगलात गाडीतून खाली उतरून नीलगायींना हाताने चारा घालतांना दाखवले. अशाप्रकारे जंगलात खाद्य देणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. त्याचा व्हिडिओ करुन तो दाखवल्यानं वनविभागानं त्याला ताकीद देत दंडवसूली केली आहे.  

=============

हे देखील वाचा : सौदी अरेबियामधील महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी 

=============

त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आपण चाहते असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबत रंगीला युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचाही चाहता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की ते दोघेही कॉमेडियन होते. त्यानंतर ते राजकारणात येऊन नेते झाला. रंगीलाचेही हेच उदिष्ट आहे. त्यामुळे त्यांनी आप या पक्षात प्रवेश केला. २०२३ मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत त्याला आपकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र रंगीलाचा यासाठी विचार झाला नाही. (Shyam Rangeela)  

या सर्वात श्याम रंगीला ज्या कॉमेडीमुळे नावारुपाला आला आहे, त्या कॉमेडीपासू मात्र दूर गेल्याचे चित्र आहे.  सध्या कोणत्याही चॅनेलमधील शो मध्ये आपल्याला बोलवत नसल्याची खंत रंगीलानं व्यक्त केली आहे.  पंतप्रधान मोदींसाठी २०१४ मध्ये त्यांनी मत मागितले होते, असा दावाही त्याचा आहे. तेच मोदी आता महागाईसाठी निमित्त ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात उभा असल्याचा रंगीलाचा दावा आहे. अर्थात आप पक्षात प्रवेश केलेल्या रंगीलाला आपनं वाराणसीतून तिकिट दिलेले नाही.  तर तो अपक्ष म्हणून लढणार आहे. 

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.