प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत आता रामायण विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात येत आहे. 21 एकर जागेवर उभे रहात असलेल्या या विश्वविद्यालयात रामायण आणि अन्य धार्मिक ग्रथांचे अध्ययन करण्यात येणार आहे. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या या भव्य विश्वविद्यालयाचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. भारतीय सभ्यता, संस्कृती आणि अध्यात्माच्या अभ्यासासाठी अयोध्येत रामायण विद्यापीठाची निर्मिती करण्यात येत आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महर्षी विद्यापीठ ट्रस्टसोबत उत्तरप्रदेश सरकारनं सामंजस्य करार केला असून या ट्रस्टने विद्यापीठासाठी 21 एकर दिली आहे. या रामायण विश्वविद्यालयात रामचरितमानसाचे अध्ययन करण्यात येणार आहे. याशिवाय भगवान रामाचे जीवन, संस्कृती, धर्मग्रंथ इत्यादींशी संबंधित तथ्यांवर अभ्यास आणि संशोधन केले जाणार आहे. याशिवाय हिंदी आणि संस्कृत भाषांचे शिक्षणही या विद्यापीठातून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वेद, रामायण, उपनिषद, योग, ध्यान आणि आयुर्वेद आदी विषय शिकवले जाणार आहेत. (Ramayana University)
रामायण विद्यापीठाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 500 विद्यार्थ्यांना प्रेवश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था विद्यापीठाच्या आवारातच करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना त्यांचे वेद, आणि संस्कृत भाषेबाबत किती ज्ञान आहे, याचाही आधी पडताळणी करण्यात येणार आहे. भारतामधील वेद, उपनिषदे आणि धार्मिक ग्रंथ यामध्ये अमुल्य असे ज्ञान आहे. ज्ञानाचा हा खजिना जतन करायचा असेल तर त्यासंदर्भात योग्य माहिती असणा-या तरुणांची गरज आहे. यामुळेच रामायण विद्यापिठाची निर्मिती कऱण्यात येत आहे. यातून शिकलेले विद्यार्थी हे आपल्या संस्कृतीच्या या अनमोल ग्रंथांचे जतनही करतील आणि त्यातील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवतील असा उद्देश आहे. रामायण विद्यापीठातून तयार झालेले विद्यार्थी जगभरातील लोकांना प्रभू रामांचे जीवन आणि तत्त्वे सांगणार आहेत. यामध्ये हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या अभ्यासही करण्यात येणार आहे. त्यामुळे उदात्त हिंदू संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून येणा-या विद्यार्थ्यांनाही या रामायण विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे. (Social News)
रामायण विद्यापीठात प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला जाणार असला तरी या विद्यापीठात सर्व आवश्यक आधुनिक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्राचीन ग्रंथ आणि आधुनिक विज्ञानाची येथ सांगड घालण्यात येणार आहे. रामायण विद्यापीठाच्या बांधकामाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. या विद्यापीठाच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले आहे. यातील बहुतांश झाडे ही आयुर्वेदात सांगलेली औषधी झाडे आहेत. त्यामुळे या विद्यापीठाच्या आवारात एक आयुर्वेद औषधींचे उद्यानही भविष्यात तयार होणार आहे. रामायण विद्यापिठातील आणखी एक वैशिष्ट म्हणजे, या विद्यापिठाचे भव्य असे वाचनालय. या वाचनालयाला महर्षी वशिष्ठ यांचे नाव देण्यात येणार आहे. महर्षी वशिष्ठ हे सप्तऋषींपैकी एक आहेत. महर्षी वशिष्ठ हे राजा दशरथाचे राज गुरुही होते. त्यांच्याच नावानं रामायण विद्यापीठात भव्य असे वाचनालय उभारण्यात येत आहे. (Ramayana University)
बहुमजली अशा विद्यापीठातील इमारतीच्या तळमजल्यावर वाचनालय असणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या तळमजल्यावर इंटरनॅशनल आर्ट गॅलरी असणार आहे. यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित अनेक दुर्मिळ कलाकृती ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यापीठाच्या पहिल्या मजल्यावर रामलीला हॉल असणार आहे. यामध्ये रामलीला या कलेबद्दल सर्व माहिती असणार आहे. शिवाय या हॉलमध्ये रामलीलाही सादर होणार आहे. अयोध्येत येणा-या भाविकांना ही रामलीला पहाता येणार आहे. याशिवाय विद्यापीठामध्ये इंटरनॅशनल आर्ट गॅलरी, ऑडिओ-व्हिडिओ आर्ट गॅलरी आणि डॉर्मिटरी उभारण्यात येत आहे. (Social News)
======
हे देखील वाचा : अयोध्येत पुन्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा
======
यामुळे विद्यापीठाला भेट देणा-या परदेशातील नागरिकांनाही रामायण आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील घटनांची माहिती घेता येणार आहे. 2022 मध्ये या रामायण विद्यापीठाचे बांधकाम सुरु झाले असून आता ते 90 टक्के पूर्ण झाले आहे. पुढच्या वर्षात या विद्यापीठाचे कामकाज सुरु होईल, असे प्रशासनानं स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विद्यापीठात नव्या वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यापीठात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील, त्यांची आधी सामान्य चाचणीही घेण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच उत्तर प्रदेश सरकारतर्फे यासंदर्भात निवेदन जाहीर करण्यात येणार आहे. (Ramayana University)
सई बने